अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ?
काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो
आता विचारु नका "ती" कोण म्हणुन
तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता
आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता
पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे
असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा.. विषयांतर नको..
तर मी करत राहीलो समर्थन रात्रभर आठवणींचे
आणि "ती " मला समजावत राहीली महत्व अंताचे
पहाट होता होता ती हलकेच निघुन गेली
आणि मला तिच्या म्हणण्याची प्रचिती आली
तिचेच खरे होते अंतच चांगला आठवणींपेक्षा
कारण तो असतो प्रत्येक गोष्टीला तिला मला सगळ्याना
नसतो फक्त आठवणीना..
तुम्हाला हे सगळे वेडेपणाचे वाटत असेल
काय म्हणायचेय नक्की मला कळत नसेल
घाबरु नका मी वेडा नाही आणी कवि तर त्याहुन नाही
काही दिसतेय तुम्हाला काही ह्यात भाषा काव्य अलंकार
पण जाणिव करुन घेतलीत तर जाणवेल एका वेदनेचा विखार
मग समजेल तुम्हालाही बेरीज मी रात्रभर मोजलेल्या चांद्ण्याची
आणि जाणवेल ओलही चिंब भिजलेल्या पापण्यांची
चला! उजाडेल आता..चेहरा हसरा केला पाहीजे
"येणारा प्रत्येक दिवस ईश्वराने दिलेले दान असते..
त्याला हसतमुखाने सामोरे जा" म्हट्लय कुणीतरी..
पण त्याच दानाने आता मन अन शरिर दोन्हीही थकलंय
आता फक्त दान देणारयाचे हात घ्यायचे बाकी आहेत