नमस्कार,
या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो.
असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या. तेव्हा देवीला त्या पालेभाज्यांचा नैवेद्य ऋषिमुनिंनी दाखवला आणि त्याचा प्रसाद घेतला.
तोच कुलधर्म पाळण्यासाठी पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
घरात सुबत्ता नांदण्यासाठी, कुटुंबात समृद्धी येण्यासाठी, या पौर्णिमेला म्हणजे येत्या मंगळवारी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखविण्यात येतो.
आपला,
(पुराणिक) धोंडोपंत
प्रतिक्रिया
20 Jan 2008 - 6:52 pm | स्वाती राजेश
आम्हाला इथे(परदेशात बसून) तुमच्या मुळे माहिती मिळते.
तुमचा ब्लॉग पण पाहिला. उत्क्रुष्ट आहे. कोकणातील फोटो खूपच मस्त.
माहिती सुद्धा खूप उपयोगी आहे.
20 Jan 2008 - 10:11 pm | ऋषिकेश
छान माहिती. ही महिती दिल्याबद्दल आभार
विकीवर शोधले असता शाकंभरी देवी बद्दल बरीच माहिती मिळाली ती इथे वाचता येईल.
-ऋषिकेश
20 Jan 2008 - 10:26 pm | विसोबा खेचर
मस्त रे!
आपला,
(पौर्णिमाप्रेमी) तात्या.
20 Jan 2008 - 10:34 pm | सुनील
नाहीतरी पालक माझा आवडता! त्यानिमित्ताने मंगळ्वारी पालकाचीच भाजी करावी म्हणतो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.