श्री शिवस्तुती

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
22 Feb 2009 - 3:48 pm

अति शितल मृदू शांत
चंद्र्मा तो ललाटी
जटी जया उगम पावे
जन्हवी पुण्यदाती
लेपुन तनू भस्मा
स्वात्मनंदा विराजी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी

अणू रणू व्यापणारी
लोचने तीन दिव्य
करी धरी ड्मरू
आणि त्रिशुळ भव्य
अति धवल दिव्य कांति
तेजसी ती प्रकाशी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी

अर्धांगी आदी शक्ती
वाम अंगास ज्याच्या
जगत वंद्य पुत्र
गणपती स्कंदराजा
देखणा करी प्रपंचा
शिव विरक्त योगी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी

अविरत जपी रामा
भक्त श्रेष्ठा दयाळा
शरण तव येता
उद्ध्ररसी कृपाळा
सहज तरूनी जाइ
प्राथ्रितो जो शिवाला
नमन तव करीतो
शंकरा विश्वनाथा

नृत्यनिपुण नटराजा
मोहसी तू जगाला
तांडव परि करीता
विश्व जाते लयाला
करून हरण प्राणा
निजधामासी नेसी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

22 Feb 2009 - 9:44 pm | कलंत्री

शिवरात्रीच्या मूहुर्तावार शिवस्तूती वाचायला आवडली.

प्रदीप's picture

23 Feb 2009 - 8:49 am | प्रदीप

म्हणतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2009 - 9:46 pm | llपुण्याचे पेशवेll

शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शिवस्तुतीने सुरुवात. छान वाटले.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

ढ's picture

23 Feb 2009 - 11:44 am |

छानच!

आवडलं खूप!!

(#o छे! भलत्याच प्रतिसादाखाली दिली गेली प्रतिक्रिया! असो...)

भावना पोचल्याशी कारण!

नीलकांत's picture

22 Feb 2009 - 11:00 pm | नीलकांत

शिवशंकर हा माझा आवडता देव. त्यामुळे शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शिवस्तुतीने सुरुवात. छान वाटले.

नीलकांत

धमाल मुलगा's picture

23 Feb 2009 - 11:31 am | धमाल मुलगा

शिवशंकर हा माझा आवडता देव.

:) नीळूभाऊ, आमचापण बरं का!

छान वाटलं शिवस्तुती वाचुन.

-(नंदी) ध मा ल.

अवांतरः मला कोणी रावणरचित शिवस्तोत्र देऊ शकेल काय? आणि ते त्या विविक्षित चालीत कसं म्हणायचं ते शिकवू शकेल काय? :?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

धमाल मुलगा's picture

23 Feb 2009 - 12:08 pm | धमाल मुलगा

कोटी कोटी धन्यवाद शेखरभौ :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

प्राजु's picture

23 Feb 2009 - 6:01 am | प्राजु

वरती सर्वांनी म्हंटल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला हे काव्य वाचून बरं वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

23 Feb 2009 - 10:55 am | जागु

महाशिवरात्रीच्या दिवशी स्तुती वाचायला मिळाली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.