काव्यप्रसववेदना

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जे न देखे रवी...
20 Feb 2009 - 10:53 pm

सूचना ः या कवितेतील (अस्मादिक सोडून) सर्व पात्रे, कल्पना, घटना, प्रसंग काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा.

वाटलं आपण पण कवी होऊ
आणि चारदोन ओळी खरडू

जमल्या तर जमतील, न जमल्या तर फसतील
हसले लोक, तर हसतील; त्यांचेच दात दिसतील

हाती घेतला कागद अन्‌ बसलो लिहायला
तास लागला कशावर लिहावे, तेच ठरवायला

हा विषय की तो, गंभीर की विनोदी
लिहिताना विषयांची भलतीच झाली चोंदी

धाडस केलं शेवटी अन्‌ लिहिलं स्वतःवर
मन म्हणालं, प्रतिभेला जरासं सावर

म्हटलं आजकाल कुणीही उठतं अन् होतं कवी
मलासुद्धा त्यासाठी प्रतिभा कशाला हवी?

लिहावं काहीबाही अन्‌ टाकावं कुठेही
रिकामटेकड्यांच्या प्रतिक्रियांची काही कमी नाही!

विचार करता करताच एक कविता पाडून झाली
म्हटलं प्रसववेदनांविनाच प्रतिभा "बाळंत' झाली!

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Feb 2009 - 11:46 pm | प्राजु

प्रसवलं काव्य एकदाचं. छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

20 Feb 2009 - 11:49 pm | अनामिक

अभिजित.. सॉरी... इथे प्रतिसाद न देताच विडंबन पोस्ट पण केले.
कविता मस्तंच आहे. आवडली!

-अनामिक

सहज's picture

21 Feb 2009 - 7:25 am | सहज

प्रामाणीक प्रयत्न आवडले.

पुढल्या वेळेला मिपावरील परसिद्ध दाई, दागदर यांचा सल्ला घ्या. अन द्या लवकर पेढे/बर्फी दुसर्‍याचे ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2009 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे

हसले लोक, तर हसतील; त्यांचेच दात दिसतील

आमाला हासवु नका राव! http://www.misalpav.com/node/6131#comment-92190

प्रकाश घाटपांडे