अनुभव मासिक

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
20 Feb 2009 - 7:56 pm

युनिक फिचर्स चे अनुभव या मासिका चा प्रवास मी जवळुन पाहिला आहे. युनिक फिचर्स चे डॉ सुहास कुलकर्णी हे माझे मित्र. त्यांनी जेव्हा फिचर्स चालु केल (१९८८ )त्यावेळी ती अंधारात उडीच होती. ज्योतिषावरचे माझे सुरुवातीचे लेख युनिक फिचर्स द्वाराच प्रकाशित झाले होते. सुरुवातीला अगदी निवडक लोकांना प्रायोगिक तत्वावर हे मासिक दिले जात होती. जसजसा प्रतिसाद मिळत गेला तसे ते वाढत गेले. आज अनुभव हे एक वाचलच पाहिजे असे या सदरात आले आहे. या वेळेच्या अंकात त्यांनी वाचकांना लिहिते करण्यासाठी आवाहन केले आहे. आपण सर्वांनी जर आपले लेखन पाठवले तर छापले जाईलच असे नाही पण एक वाटचाल नक्कीच चालु होईल. प्रथम वाचक म्हणुन नंतर लेखक म्हणुन. इथे अनेक ताकदवान लेखक आहेत पण ते प्रिंट मिडिया पासुन दुर असतात आन प्रिंट मिडियाही त्यांच्या पासून दुर असतो. हे आता थांबायला हव. चला तर मग टंकणी हातात घ्या. अनुभवला इथे भेट द्या

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Feb 2009 - 8:03 pm | प्राजु

घाटपांडे सर..
खूप खूप धन्यवाद. एक उत्तम व्यासपीठच आहे हे.
नक्की लेखन पाठवण्याचा प्रयत्न करेन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

20 Feb 2009 - 8:11 pm | विकास

युनिक फिचर्सचे वृत्तपत्रात छापून आलेले लेख वाचले आहेत. मात्र हे मासिक वाचलेले नाही. नक्की पहातो.

यशोधरा's picture

20 Feb 2009 - 8:22 pm | यशोधरा

उत्तम माहिती आणि दुवा. धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

20 Feb 2009 - 11:43 pm | भडकमकर मास्तर

धन्यवाद काका...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/