जागली रात्र हिरवी
सांज कोवळी लाजली
झोपला गं दिनमणी
चंद्रकला हि फाकली
गुज काजवे करती
क्षितिजाही सैलावली
धुंदी तव लोचनी
गात्रे सारी मस्तावली
चाहुल तुझी सजणी
रातराणी धुंदावली
प्राजक्त गातो अंगाई
बघ पश्चिमा उजळली
सखे रात ही जागवु
चल तनुत आगळी
नको आता दिरंगाई
नीज नयनी जागली
विशाल
प्रतिक्रिया
20 Feb 2009 - 2:45 pm | अभिष्टा
कल्पना चांगल्या आहेत तरीही ----
सांजेला दिवस कलायला लागतो तेव्हा सांज कोवळी म्हणण्यापेक्षा सावळी बरं वाटेल. कोवळी उषा किंवा सकाळ असते. तसेच, कवितेचा शृंगार रस असताना मधेच 'प्राजक्त गातो अंगाई' असे वात्सल्याचे शब्द खटकतात.
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.