आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेताना
चुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेताना
तिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांत
जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना.
आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरताना
थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना
हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता
आज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना.
मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना
मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना
कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना
मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.