तु पांघरशी नभ निळे
मज मोहवे वदन सावळे
खुळावले नयन जुळे
सख्या न माझे मला आकळे
लट भाळी केश कुरळे
पाहुनी ते मम चित्तही चळे
तुज पाहता अहं गळे
पान्हावली मुरली खुण कळे
यमुनातीरी आनंदमेळे
वृंदावन झाले आज बावळे
शाम सावळा रास खेळे
कामधेनु सोडी मुक्त आचळे
जाती घटिका आणि पळे
कालपाश अन कंठी आवळे
नाम तुझे मनी सावळे
हवा कशाला तो स्वर्ग ना कळे
विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
19 Feb 2009 - 11:44 am | मृगनयनी
जाती घटिका आणि पळे
कालपाश अन कंठी आवळे
नाम तुझे मनी सावळे
हवा कशाला तो स्वर्ग ना कळे
खूप सुन्दर.....
:)
मनामध्ये अत्यंत पवित्र भाव जागृत झाले.
आपणही श्रीकृष्णावर काव्य रचता, हे पाहुन अंमळ बरे वाटले.
:)
अजुन येऊ देत.
प्रतीक्षेत,
मृगनयनी. :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
19 Feb 2009 - 8:15 pm | प्राजु
अतिशय सुंदर रचना.
क्लास!!!
प्रेम आणी भक्ती... पर्फेक्ट डिवोशनल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/