मराठी शाळेचे भारुड

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जे न देखे रवी...
15 Feb 2009 - 11:44 am

कदाचित मूळ कवीने आजच्या मराठी शाळांची अवस्था बघितली असती तर हेच विचार व्यक्त केले असते असे वाटते.
एकनाथ महाराजांची क्षमा मागुन.
मराठी शाळेचे भारुड
शाळा नको ग बाई
मला फळा नको ग बाई
तुटकी बाके
मोडके पंखे
अगं.....दुरुस्त करुन घे की
दुरुस्तीला पैसा नाही
मला शाळा नको ग बाई
पोरे लिहीतात आनी ,पानी
शिक्षकांचीच अशुद्ध वाणी
अस्स....मग चांगले शिक्षक बोलव की
विश्वस्ताना वेळच नाही
मला शाळा नको ग बाई
मैदानावर मॉल वाल्याची नजर
संस्थापकांच्या नातवाला
कोटींचे गाजर
अरेच्चा......बोंबल की जोरात
पण जीभेला धारच नाही
एका जनार्दनी सोडवी शाळा
मराठीचा संपला लळा
ह्हो.................
मला शाळा नको ग बाई
मला फळा नको ग बाई
जाता जाता: बघा तुम्हाला ह्यात आणखी काही घालता आले तर.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

15 Feb 2009 - 12:08 pm | प्रमोद देव

प्रभूदेवा! आपण आता कवीही झालात!
कविता आवडली.

अवलिया's picture

15 Feb 2009 - 12:20 pm | अवलिया

हम्म.........चालु द्या

--अवलिया

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 12:29 pm | पिवळा डांबिस

मराठी पालक संत्यस्त्र...
जालावर रडती विवस्त्र....
पण मुलांना धाडिती अन्यत्र....

फोक उठवाया जागा न्हायी...
मला शाळा नको गं बाई.....
:)

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 12:44 pm | विनायक प्रभू

ह्याला म्हणतात नावाला जागणे

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 12:49 pm | विसोबा खेचर

आयला मास्तर! लै भारी भारूड बर्र का! :)

आपला,
(प्रभूमास्तरांचा विद्यार्थी) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Feb 2009 - 3:47 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत. लै भारी.

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2009 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

भारुडी प्रभुंचे भारुड झक्कास जमले आहे.

अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

15 Feb 2009 - 1:36 pm | नितिन थत्ते

मराठी पालक संत्यस्त्र...
जालावर रडती विवस्त्र....
पण मुलांना धाडिती अन्यत्र....

फोक उठवाया जागा न्हायी...
मला शाळा नको गं बाई.....

+१०० सहमत

(मुलीला मराठी शाळेत पाठवून आप्तांच्या टवाळीस अंगावर घेणारा)
खराटा

सर्किट's picture

15 Feb 2009 - 1:41 pm | सर्किट

पण मराठी शालेत आजकाल कुनी जातच नै

सहज's picture

15 Feb 2009 - 3:48 pm | सहज

इथे असलेल्या दिग्गजांकडे पाहुन वाटते की मराठी माध्यम व पाचवी किंवा आठवी पासुन गणित, शास्त्र इंग्रजी मधे हा उपाय चांगला आहे. उगाच इंग्रजी फक्त इंग्रजी डोक्यात घुसत आहे.

खाजगी शाळा, एडमीशनची मारामार व डोनेशनची डोके गरगरवणारी रक्कम ऐकुन म्युन्सीपाल्टीची शाळा हा पर्याय समोर येणार काहीच वर्षात. सरकारने बंद तर नाही ना केल्या त्या शाळा? मास्तर, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवणे याकरता काय करता येईल? अनिल अवचट यांनी बहुतेक आपल्या मुलींना सरकारी शाळेत घातले होते ना?

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 4:58 pm | विनायक प्रभू

काही बंद पडल्या आहेत. काही वाटेवर आहेत. काही नावापुरता चालु आहेत. काळजी वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे काही जुन्या मराठी शाळा पण ह्याच वाटेवर मार्गक्रमण करत आहेत.

रेवती's picture

15 Feb 2009 - 5:46 pm | रेवती

आवडली कविता. आजकालच्या शाळांचे योग्य वर्णन.
माझी शाळा पुण्यातील चांगली शाळा म्हणून ओळखली जायची.
दहावीनंतर बर्‍याच वर्षांनी कुठलीशी कागदपत्रे आणायच्या निमित्ताने शाळेत जाणं झालं आणि आश्चर्याचा धक्का बसला.
शाळेत शिकवणार्‍या बाईंची (साहजीकच) नवी टीम होती. साधी राहणी कुणाचीच नव्हती.
अशुद्ध मराठी बोलणे, जरीच्या साड्या, अंगभर वेगवेगळे दागिने.
त्यादिवशी कोणताही समारंभ नसताना असे वातावरण होते.
अशी राहणी असणार्‍या बाई मुलींना काय सांगणार?
मी शाळेत असताना नटण्यामुरडण्याला फारसे प्रोत्साहन कधीच नव्हते.

रेवती

अघळ पघळ's picture

16 Feb 2009 - 1:01 am | अघळ पघळ

>>अशुद्ध मराठी बोलणे, जरीच्या साड्या, अंगभर वेगवेगळे दागिने.

अहो ताई, भाषेच्या बाबतीत शुद्ध अशुद्ध असे काहीच नसते हो.
माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या -
आनि शुद्ध की आणि?
आणि ते कुनी ठरवले?

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2009 - 6:04 pm | प्रकाश घाटपांडे

लई भारी भारुड इनायक भाउ!

पोरे लिहीतात आनी ,पानी

अहो नी काही अशुद्ध नाई

एकनाथ महाराजांची क्षमा मागुन.

इडंबनात क्षमा करावीच लागते. ती काय इटंबना नाई. नाही त केशवसुतांनी केशवकुमारांवर गरळ ओकली असती.
प्रकाश घाटपांडे

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 6:03 pm | विनायक प्रभू

पुणे येथे पण उणे.
मी मुंबई ह्या कॉस्मोपॉलीटीन सिटीबद्दल बोलत होतो.
पुण्यात पण जर हे असेल तर अरेरे.

लिखाळ's picture

16 Feb 2009 - 4:16 pm | लिखाळ

वा .. भारुड दमदार आहे..
सध्याच्या शाळा कशा आहेत माहित नाही..पण मी शाळा सोडताना भारुडातल्या स्थितीची चाहुल लागली होती.. त्यावरुन कल्पना करु शकतो..

मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि मातृभाषेतल्या शिक्षणाचा दर्जाही उंचावला पाहिजे.
-- लिखाळ.

प्रभु साहेब,
भारुड छान आहे. शहरी भागातील शाळांची अवस्था आता अशी होत आहे हे खरे पण गावातील शाळा आधी पासूनच अशा आहेत . शहरी पालक तरी जागरुक असतात, घरी अभ्यास करून घेतात. ग्रामीण मुलांची अवस्था पाहवत नाही.
बाकी भारुड छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2009 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रभुसर, भारुड आवडले !

अवांतर : शिक्षण संस्थाचालकांबद्दल काहीही बोलणार नाही ! :(