या पाखरांस आता
आहे निघून जाणे
हे शब्द सूर सरले
ओठी न येई गाणे
छेडीत रोज तारा
येई जुळून गीत
ह्रद्यातूनी भरोनी
येई फूलून प्रीत
सार्या स्मृती सुखाच्या
दाटून आज आल्या
गेली उडून पिल्ले
डोळ्यात प्रेमधारा
रे माझिया पिलांनो
हा जीव गुंतला रे
डोळ्यात आज माझ्या
बघ प्राण साठला रे
फिरता नभांगणात
परतून येथ या रे
वेड्या जीवास माझ्या
रे एक साद द्या रे
हे वेड या मनाचे
तुंम्हास रे कळावे
अन् शब्द सूर ताल
पुन्हा जुळून यावे
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 5:23 pm | राघव
काही ओळी छान आहेत.
राग मानू नका पण एक सांगावेसे वाटते -
तुमच्या कवितेला लय आहे, पण- रे, हे, या, हा असे शब्द शक्यतो टाळावेत. यांच्यामुळे ओळी सहज आलेल्या वाटत नाहीत. जुळवल्यासारख्या वाटतात. पु.ले.शु.
मुमुक्षु
13 Feb 2009 - 9:52 pm | प्राजु
अर्थही सुंदर आहे.
मुमुक्ष यांनी जे लिहिले आहे त्याच्याशी सहमत आहे मी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/