आणि श्रृती धन्य जाहल्या...

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
10 Feb 2009 - 4:18 pm

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न सन्मान आज (मंगळवारी) प्रदान करण्यात आला आहे. स्वरांची भक्ती आणि गुरूची कृपा कोणत्याही पुरस्कारहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे या पुरस्काराबाबत भीमसेनजींना काय वाटत असेल, हे सांगणे कठीण आहे. परंतु या सन्मानामुळे अवघ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सन्मान झाल्याची संगीत रसिकांची भावना आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीच भारतरत्न सन्मान त्यांना प्रदान करायला हवा होता. पण त्यांच्या सचिवामार्फत भीमसेनजींचा गौरव करण्यात आला, ही बाब खटकणारी आहे. असो.
भीमसेनजींनी हा सन्मान स्वीकारला असेल, त्यावेळी श्रृतींनाही धन्य झाल्याचे परमोच्च समाधान मिळाले असेल!

संगीतअभिनंदन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2009 - 4:38 pm | बिपिन कार्यकर्ते

मला वाटतं की सचिव वगैरे ही बाब गौण आहे. काही सरकारी अडचणी असतील. आपल्याला माहीत नाही. पंडितजी एवढे मोठे आहेत की कोणी ठरवूनसुद्धा आणि काहीही केलं तरी त्यांचा अपमान करू शकणार नाही.

आणि तसंही त्यांना भारतरत्न इतक्या उशीरा दिलं गेलं हीच बाब खरं तर खटकते.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

10 Feb 2009 - 7:09 pm | विसोबा खेचर

भीमसेनजींनी हा सन्मान स्वीकारला असेल, त्यावेळी श्रृतींनाही धन्य झाल्याचे परमोच्च समाधान मिळाले असेल!

सहमत आहे...

(अण्णांचा प्रेमी) तात्या.