वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना..
तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे!
आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा..
तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे..
येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, "आई"
तुजलाच अर्पितो मी भवदु:ख मम उरीचे..
आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी?
मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे..
आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो!
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!!
काही दिवसांपासून श्रीविठ्ठलाची मूर्ती सतत डोळयांपुढे येत होती. कुठे फोटो दिसेल, कुठे एखादा अभंग ऐकू येईल, कुणी वारकरी भेटेल.. एक ना दोन..! त्यातून स्फुरलेल्या या ओळी. वाचून बघितल्यावर मात्र ह्याच ओळी विठुराया प्रमाणेच आपल्या आईसही लागू पडतात हे दिसले..
मुमुक्षु
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 2:52 pm | नितिन थत्ते
१ नो कॉमेंट्स
२ तुमचे वय काय हो?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
10 Feb 2009 - 3:00 pm | अवलिया
अतिशय सुंदर भावपुर्ण ओळी...
आई काय आणि विठुमाउली काय.. आपल्या लेकरांची काळजी करतात.
त्यांचे ऋण फेडणे ही खुप अवघड गोष्ट आहे.
सुंदर... अजुन येवु द्या असेच..
आणि हो... वयात काही नसते असे कोणीतरी म्हटले आहे. नसेल म्हटले तर मी म्हणतो.
--अवलिया
3 Feb 2011 - 7:25 pm | मूकवाचक
वयात काही नसते असे कोणीतरी म्हटले आहे. नसेल म्हटले तर मी म्हणतो. (+१)
10 Feb 2009 - 3:30 pm | सालोमालो
या ओळी थोड्याशा तुटक वाटतात.
आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा..
बाकी छान!
सालो
10 Feb 2009 - 4:18 pm | लिखाळ
आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो!
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!!
अरे वा ! छानच.
-- लिखाळ.
10 Feb 2009 - 9:06 pm | प्राजु
अतिशय भावपूर्ण...
आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो!
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!!
सुरेख...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Feb 2009 - 7:53 am | राघव
सगळ्यांचे मनापासून आभार :)
मुमुक्षु
11 Feb 2009 - 12:08 pm | श्रीकृष्ण सामंत
कविता खूप आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Feb 2009 - 10:46 pm | विसोबा खेचर
नि:शब्द!
बर्याच दिवसांनी एक अत्यंत उच्च दर्जाची, प्रासादिक कविता वाचायला मिळाली आणि खूप खूप समाधान वाटले! मुमुक्षूराव, मी आपला ऋणी आहे!
आपल्या काव्याचा चाहता!
तात्या.
12 Feb 2009 - 10:59 pm | चतुरंग
उत्स्फूर्तता कळतेच आहे! सुंदर रचनेबद्दल अभिनंदन.
(मी या.वि.क.ना. का.न. :) )
चतुरंग
14 Jun 2020 - 4:03 pm | प्राची अश्विनी
अप्रतिम..
आणि सद्ध्या वारी नाही तर अजूनच काळजाला घर पाडते कविता..
14 Jun 2020 - 5:54 pm | गणेशा
आनंद शोधताना फिरुनी इथेच येतो!
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!!
भारी...
---
तुझ्याच आठवांचे गीत माझ्या मनात आई..
तीच चंद्रभागा सुरांची..अन तू माझी विठाई...
- शब्दमेघ