पेशवे बाजीराव तिसरे यांच्या "एकांत"कवितेवरून मनात एक विचार आला. खरेच माणसाला या धक्काधक्कीच्या जीवनात एक दिवस दिला आणि त्याला सांगितले तुला काही हवे ते तू कर... हा दिवस तुझा एकट्याचा.
तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल?
तुमची राहिलेली कामे, इच्छा पुर्ण कराल? कि एकांत पणाचा कंटाळा येईल?
मला अशावेळी वॉकमन मधून (इतरांना त्रास होऊ नये म्हणून) कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकायला आवडेल.
प्रतिक्रिया
19 Jan 2008 - 12:26 am | सुनील
सकाळी फर्मास चहा बनवून घेईन आणि मग एखादे छानसे पुस्तक घेऊन वाचेन.
नंतर महाजालावर थोडी टिचका-टिचकी करेन.
दुपारच्या जेवणासाठी एखादी फर्स्ट्-क्लास पाककृती बनवून फस्त करेन. त्यांनंतर वामकुक्षी साठी अर्धा तास म्हणून पडेन आणि दोन्-एक तासांनी उठेन.
संध्याकाळी एक फेरफटका मारून आल्यावर, रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा एखादी डिश बनवेन.
मग त्या डिशला साजेशी वारूणी बरोबर घेऊन त्या डिशचा आस्वाद घेईन.
शेवटी, टीव्ही वर एखादा डोक्याला ताप न देणारा कार्यक्रम बघत झोपून जाईन.
(स्वच्छंदी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Jan 2008 - 12:28 am | विसोबा खेचर
तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल?
सकाळी निवांतपणे उठेन. भरपेट नाष्टापाणी झाल्यावर झकासपैकी तानपुरा लावून तोडी किंवा रामकली किंवा कोमल रिषभ आसावरी ची मैफल जमवेन..
त्यानंतर मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ व नंतर ताज्या मासळीचं गरमागरम भरपेट जेवण. नंतर झकाससं तंबाखूपान व त्यानंतर गोविंदाचा एखादा मारामारी असलेला मसाला हिंदी चित्रपट!
मग जरा तासभर झोप काढून मित्रमंडळींना जमवून मुलतानी पासून अगदी मारव्यापुरिया पर्यंतची मैफल जमवेन.
मैफल आटपली की पुन्हा एकदा थंडगार पाण्याने अंघोळ, नंतर जरा दिवाबत्ती वगैरे करून रामरक्षा आणि थोडासा माफक पर्वचा!
मग संध्याकाळी थोडंसं उशिरा, आवडत्या स्त्री सोबत सुखदु:खाच्या गप्पा मारत निवांतपणे दोन पेग विदेशी मद्य किंवा मग झक्कपैकी अत्तरबित्तर लावून,छानसे कपडे करून मुंबईतील एखाद्या कोठ्यावर विदेशी मद्याचे घुटके घेत घेत, सोबत हुक्का ओढत, जीव ओवाळून टाकावा अश्या एखाद्या तवायफेचं गाणं ऐकेन...!
क्या बात है! साला दिवस असावा तर असा!
खल्लास...:)
आपला,
(ऐय्याश!) तात्या.
19 Jan 2008 - 8:21 am | स्वाती महेश
मलापण अशावेळी वॉकमन लाउन ए.आर. रेहमानची गाणी ऐकायला आवडेल
21 Jan 2008 - 12:39 pm | ध्रुव
एक दिवस सुट्टी आणि काहीही डोक्याला त्रास होणार नसेल तर...
सकाळी सकाळी पहाटे उठुन मोटारसायकल काढायची. जवळच्या बॅगेमध्ये एक कॅमेरा, (पाण्याची) बाटली घ्यायची आणि जंगलाच्या दिशेने सुटायचे. पहाटे पहाटे कुठेतरी डेरा टाकुन मस्त फोटो काढायचे. मग साधारण दुपारी मिसळपावखायचा, मस्त गार गार पाणी पिउन ताणुन द्यायची.
संध्याकाळी परत कुठल्यातरी टेकडीवर जाउन सुर्यास्त बघायचा, तिथेच तंबु टाकून मस्त रात्री तारे बघत बघत झोपायचे.
बास..... दिवस असावा तर असा. डोक्याला त्रास नाही कोणाचाच.... , कशाचाच... :)
--
ध्रुव
21 Jan 2008 - 12:42 pm | विसोबा खेचर
ध्रुवा,
तुझा दिवस आपल्याला आवडला, एकदम पसंद पडला. मस्त रंगवला आहेस....
साला, माझ्या कल्पनेतील दिवस कॅन्सल करून तुझ्यासोबत तुझ्या कल्पनेतल्या दिवसात एखाददा रमीन म्हणतो! :)
तात्या.
21 Jan 2008 - 12:56 pm | ध्रुव
असे किती तरी दिवस मनात घर करुन आहेत. कोकणात जायचे, सकाळी समुद्रावर लोळायचे, मग अंघोळ करायची मस्त आमरस हाणायचा, दुपारी छान बाहेरच्या झोपाळ्यावर पडी टाकायची. काहीच करायचे नाही, नुसते बसायचे... :) अरे एक ना दोन.... किती आणि काय काय करु असे वाटते. पण लगेच लक्षात येते की हे करायचे असेल तर त्याला लागणारे कष्ट नको का करायला. आणि मग कामाला लागायचे. :)
--
ध्रुव
21 Jan 2008 - 4:52 pm | धमाल मुलगा
तात्या, एकदम गुलछबु आईडियाची कल्पना आहे हा॑!
मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन.
आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!!
अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!!
मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला.
आsss हा... स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय?
मरुदे तो "PM" आन् बसूदे तो "Client" बो॑बलत.
-(भटक्या) धमाल.
22 Jan 2008 - 7:43 am | वरदा
मला सुनील ची कल्पना आवडली...फक्त ती दुपारची झोप जरा ३-४ तास करा मला खूप झोपायला आवडतं...
22 Jan 2008 - 9:13 am | चतुरंग
सकाळी सकाळी 'रुपाली'त २ प्लेट गरमागरम उप्पीट चेपणे, नंतर फक्कडसा चहा.
घरी येऊन झकासपैकी आण्णांचे अभंग सोडायचे. मग बाकी आन्हिके आटपणे.
नंतर निवांत वाचत, गाणी ऐकत बसणे.
दुपारी छानसा वरण-भात-तूप-मीठ-लिंबू असा वाफाळता बेत! (च्यायला, तोंडाला पाणी सुटलं!)
हलकीशी वामकुक्षी झाल्यावर डेक्कनला जाऊन इराण्याचा चहा (कॅफे सनराइ़ज, ते त्या चहात काय घालतात हे मला न उलगडलेलं एक कोडं आहे, आपला चहा कधीच तसा होत नाही!)
मग तशीच स्वारी चांगल्या पुस्तकाच्या दुकानात. भरपूर पुस्तके चाळणे, मनाजोगी असली तर विकत घेणे.
नंतर मित्रांना जमवून डेरा टाकणे. मनसोक्त गप्पा झाल्यावर नवीन कुठल्या हॉटेलात धाड मारायची ते ठरवून हल्ला बोल. भरपेट जेवण, नंतर छानसं पान.
मग पुन्हा एकदा गप्पांचा अड्डा. जाम झोप यायला लागली की मगच घरी. (आ हा हा....क्या बात है - कधी जमेल असं!!)
किंवा -
सकाळी सकाळी - बॅकपॅक, कॅमेरा, पाणी, गॉगल, दुर्बीण - गाडी खडकवासल्याकडे. तिथला जलाशय बघून तसाच सिंहगड पायथा. मि.पा.चापून गडावर स्वारी.
जराशी धुक्याची सकाळ असेल तर गडावर अप्रतीम दृश्य दिसतं. (मागं एकदा भर पावसाळ्यात गेलो होतो तेव्हा लांबून पाऊस येताना बघितला होता - ते दृश्य चकित करणारं असतं - ५-१० मैलावरुन पाऊस असा सरकत-सरकत आपल्यापाशी येतो आणि बघताबघता आपल्याला कवेत घेतो. फारच भन्नाट!)
संध्याकाळच्या सुमारास घरी - अशा ठिकाणी जाऊन आलं की बाकी शहरी गोष्टी तुच्छ वाटतात त्यामुळे घरी.
निवांत आमटी भात चापून पुलंची व्यक्तिचित्रे ऐकत निद्रादेवीच्या आधीन!
स्वाती तुझ्या ह्या एका कल्पनेमुळे माझी ही मानसिक सफर तरी पूर्ण झाली - शतशः धन्यवाद!
चतुरंग
22 Jan 2008 - 10:23 pm | स्वयम्भू (not verified)
मझे मला हवे तसे दीवस मी भरपुर जगलोय. पण पुन्हा सन्धी मीळाल्यास ह्यात्ला इथे नमूद करतोय तो एक दीवस मला पुन्हा जगय्ला आवडेल.
भल्या पहाटे ऊठाय्च आणी बाईक काढून माझ्या सर्वात आवडत्या रोड वर नीघाय्च. हा रोड म्हनजे जुना मुम्बई - पुणे महामार्ग. अप्रतीम रस्ता आहे हो. आणी वीक डेज ना तर ह्या रस्त्यावर चीट्पखरूही नसतं. चहुकडे हीरवा नीसर्ग, झकास वेडी वाकडी वळणं, मस्तं रस्ता. अशी मजा येते की सन्गता सोय नही.
मुम्बई - पुणे महामार्गाला लागायच्या आधी अवर्जून करय्ची गोष्ट म्हणजे पनवेल ला दत्त स्नेक्स इथे चरणे. इथली तरी मारलेली मीसळ खाउन जीव त्रुप्त झाला (जो कधी होत नाहीच) की मग त्यावर अजुन १-२ वडा पाव आणी सबूदाण्याची खीचडी चापयची म्हणजे लोनावळा येइ पर्यन्त भूक लागत नही. पोटोबा भरला की मग त्या वर चहा आणी सीगारेट म्हणजे ब्रह्मानन्दी टाळीच.
मग प्रवसाला सुरुवात कराय्ची. उगाच वेगात जाय्च नही. ५०-६० च्या वेगात, नीसर्गाच सौन्द्र्य डोळ्यात साठवत साठवत प्रवास कराय्चा. जर फार लवकर नीघाला असाल तर सुर्यदेव अवतरताना बघायला मीळतील. वारा चेहेर्यावर घेत घेत लोणावळ्याला पोचाय्च. तीथे जास्त वेळ दवडाय्चा नाही. उभ्या उभ्याच चोकोलेट फज चापाय्च, थोडा वाटण्यासाथी वीकत घ्यय्च नी परत फीराय्च. परतीचा प्रवास मत्र न थम्बता कराय्चा. (अश्यानी दुपार्च्या झोपाय्च्या वेळे पर्यन्त घरी पोचता येत.)
सधाराण मुम्बई ला पोचे पर्तन्त १२ वजलेले असतात. त्या नन्तर तडक कुलाबा मधल्या केफे मोन्डेगार मध्ये जाय्च, एक झक्कस गारेगार बीयर घशाखली उतरवाय्ची. अत्मा त्रुप्त झाला की मग जेवणा साठी वळाय्च बेलर्ड पीअर मधल्या केफे ब्रीटानीया कडे. इथल्या सर्खा अन्डा मसाला आणी केरेमल कस्डर्ड जगात कुठेही मीळत नही. इथे चापून झाल की मग तड्क घरि पोचय्च. (सधारण सडे चार वाजलेले असतात) आणी हो, वाटेवर ग्रान्ट रोड ला मेरवान मधून मावा केक पार्सल घ्यायला वीसरू नका.
घरी पोचल की मग सरळ तणून द्यय्ची. सात ला वगेरे उठाय्च. कट्टयावर जाय्च नी परत याय्च.
घरी आल की आई च्या मागे लगून तीला भात, कान्द्याची आमटी, बटट्याची सुकी भाजी, कान्दा भजी नी त्या सोबत तकातले पोह्याचे पापड असा बेत कराय्ला लवाय्चा. आणी ह्या सगळ्याचा यथेच्छ समाचार घेउन मग शेवटी नीद्रा देवी ची आराधना सुरु कराय्ची.
असा दीवस मी लवकरच पुन्हा एक्दा जगेन.
आपला,
स्वयंभू
28 Jan 2008 - 5:19 pm | केशवराव
स्वाती,
' मला पंख असते तर.....' टाईप कल्पना रम्य निबंध लिहील्यागत लिहीत नाही.
महिन्यातून १ दिवस या साठी रिक्त ठेवतो.
भल्या सकाळी [५.३०-६.००] 'कॅलीबर क्रोमा' [हमारा बजाज] काढायची , किक मारली कि १०० -१२५ कि.मी. रपेट. [ वय वर्षे ६० ] अलीबागहुन रायगड, लोणावळा,कर्जत,शिवथर घळ ,मुरूड असे भटकायचे. कुणी बरोबर आले तर ठिक नाहितर अकेला! [पुर्वी आमच्या बाईसाहेब नक्की यायच्या ,आता तिला नाही जमत.]
बरोबर वॉकमन; सतार, सरोद, बासरी च्या केसेटस . पाण्याची बाटली, कॅमेरा, बायनॉ. बस!
वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई. झोडायचे. मुरूडला गेलो तर मस्त ताडी / माडी आणि शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .]
संध्याकाळी परत. दुसर्या दिवशीच्या कामासाठी सज्ज !
31 May 2008 - 6:09 pm | गिरिजा
छानच..
आणि
तर सहीच्चे!!
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
29 Jan 2008 - 1:14 am | प्राजु
कोकणांत समुद्र दिसेल अशा ठीकाणी घर बांधायचं स्वप्न आहे माझं. आजूबाजूला १-२ आंबा, नारळ, काजू.. इ. (हे जर पूर्ण झाले असेल तर) मी सकाळी लवकर उठून तडक कोकणांत जाईन ( बरोबर कोणी नको, नवरा सुद्धा..!).
माझी दोन्ही कुत्री आणि मांजर सोबत घेईन नक्की. त्यांच्यासोबत .. मनसोक्त समुद्रावर हिन्डेन. वाचायला भरपूर पुस्तके, ऐकायला सुंदर गाणी. आणि प्रत्येक वेळी फुल मग भरून चहा..
मग दुपारी, तिथेच कोकणातली फणसाची भाजी, तांदूळाची भाकरी, ताक, कोकमचं सरबत. आणि त्या जाड्या उकड्या तांदळाचा भात, कुळथाचं पिठलं, नाचणीचा पापड, किंवा भाजलेली सालपापडी. वा.. वा... क्या बात है.
संध्याकाळी, चिकन किंवा माशाचं जेवण. माझ्यासोबत माझं मांजर आणि कुत्री यांचीही चैन.
रात्री अंगणात बाजल्यावर चांदणं पहात निवांत झोप. काय हवं अजून???
स्वाती, मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन.
- (कोकणी) प्राजु
29 Jan 2008 - 12:07 pm | ध्रुव
मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन.
अगं, पण याची वाट बघण्यापेक्षा काहीतरी (वेळ) प्लॅन करून आधीच आपल्या इच्छा पुर्ण करुयात :)
--
ध्रुव
29 Jan 2008 - 1:16 pm | किशोरी
मस्त सकाळी आवरुन पॅराग्लायडींग,वॉटर-स्पोर्टस असतील तिथे जाऊन आकाशात उडायच,पाण्यात खेळायच धमाल करायची मग दुपारी मित्रपरिवाराबरोबर थालीपीठ,मसालेभात अस अस्सल मराठी जेवण
वेळ मिळालाच तर एखाद्या डान्स क्लासला जाऊन नवीन डान्स प्रकार शिकायचा
मग एखाद्या बोटीवर जायच,छान २-३ तास एकटेच बोटीवर मस्त गाणी ऐकत निसर्गाचा आस्वाद घ्यायचा
मन अगदी शांत होऊन जाईल,दिवसभर मुक्त जगायच कशाचीही पर्वा न करता (दुसरया दिवशी काम..नको)
एक दिवस जरा कमी पडतो आहे,स्वातीजी अजुन जरा एक-दोन दिवस वाढवा ना!!!!
29 Jan 2008 - 3:41 pm | इनोबा म्हणे
डोंगर दर्यांमधे मी जास्त रमतो. कारण तिथे एकांत जास्त मिळतो....
माझी इच्छा आहे जगातल्या कोणत्यातरी एका कोपर्यात जिथे माणूस नावाचा प्राणी शोधून ही सापडायचा नाही अशा ठिकाणी रहावे. डोंगर दर्यांमधे,झाडा झूडपांमधे अगदी नैसर्गीक जिवन जगावे. समाजाचे किचकट नियम नको आणि प्रपंचातली ओढाताण नको. मी आणि फक्त मीच... मनसोक्त उनाडक्या कराव्या... पक्ष्यांचा कलकलाट, झाडांचे सळसळणे आणि नदीच्या खळखळाटातले संगीत मनसोक्त ऐकावे...आणि हवे तेव्हा,हवे तिथे ताणून द्यावी.
(रानरेडा) -इनोबा
31 May 2008 - 2:42 pm | नि३
तो दीवस.....मला
माझ्या गावी ..माझ्या घरी घालवायला आवडेल
त्या दीवशी मी..
सकाळी ५.०० वाजता उठेल ..आईची देवघरात पुजा सुरु झालेली असणार त्या माऊलीचे ते थोडे देवमंत्र ऐकुन .. थंड-गरम मीश्रीत पाण्याने आंघोळ करुण ताजेतवाने होईल..नंतर आईच्या हातचे गरमागरम पराठे आणी पोळ्यांच। चुरा त्यावर एक ईलायची ,अद्रक आणी नीव्वळ दुधाची अशी एक पेलाभर चाय असा नाष्टा करुन आजोंबासोबत शेतीवीषयक गप्पा करत मराठी लोकमत पेपर वाचत बसायचे..
तेवढ्यात माझे खास मीत्र अज्या(खोंडीन),सतीश(बाबा),उम्या,अभी(कानपुरी),गोलु(ढ्क्कण) हातात बॅट आणी टेनीस बॉल घेऊन तयार अरे नितिन चल लवकर यार मॅच चा टाईम झाला ....अरे आलो चलो...
त्या वीशाल टीम बरोबर मॅच ना आपली आज त्यांना कोनत्याही हालतीत धुळ चारवायची बघ ....मस्त २-३ तास मॅच झाली की आईच्या हातचे माझे आवड्ते जेवण ..गरमागरम रोडगे ..मीसळ दाळ ..लींबु ..कोथींबीर .पापड ..लोणचे आणी गुलाब जामुण आहाहा.........
नंतर ( झोपायचे छे.. माझ्या त्या आवड्त्या एका दीवसातला एक्..एक क्षण मह्त्वाचा त्यात माझे मौल्यवाण ३-४ तास झोपेत वाया घालवायचे ??कदापी नाही) सु.शीं च एखाद मी न वाचलेल कींवा जाई अथवा दुनियादारी हे पुस्तक वाचत बसायचे....
संध्याकाळी ५ च्या दरम्यान मोटारसायकल बाहेर काढावी आणी मस्त निसर्गाचा आनंद घेत शेतात पोचावे ...संपुर्ण शेतात गच्च भरुन
आलेली संत्र्याची झाडे बघत पुर्ण शेतात एक चक्कर मारावी .......
७.०० -७.३० वाजता बाजारात जावे ... तेथे ठरल्याप्रमाणे एक -एक मित्र जमा होत राहील तोपर्यंत असलेल्यांबरोबर एक चहा मारायचा
साधारण ८.०० वाजता सर्व जमा झाले की बाईक्स घेऊन नीघाली स्वारी गावाबाहेरच्या ढाब्यावर ....
रेसींग करत ...गाड्या पळवायच्या ताकदीने ....
ढाब्यावर गप्पा ,चर्चा ,जोक्स(नॉन व्हेज )नुसती धमाल , ऑर्डर ...
१० कींगफीशर , २ ओल्ड मंक ,२ बॅगपायपर ,४ सोबत मसाला पापड ,चणे,भजे,खारा....
काजु करी ,दाल तड्का,कोल्हापुरी करी,पनीर बटर मसाला,पालक पनीर,नान ,तंदुर रोटी....
जेवन झाले की एक चमन चटनी पान ,मीठा पान.............
आनी नंतर ...एक छानशी ...मंद वेगात मोटरसायकल वरन थोडादुर्.ट्रीप..तेथुन परत फिरून ...थेट घरी बीछ्यानात...............
ह्म्म्म्म्म
---नितिन.
(पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)
31 May 2008 - 4:03 pm | मन
मस्त एका आडरानातल्या शांत्-प्रसन्न मंदिरात येणारे अज्ञात बासरीचे सूर ऐकत होइन भेभान.
मग होइन एक मांजर, जाउन पुन्हा एकदा आईला छळणार, दुधा-दह्याची भांडी उपडी करणार.
ती मला पकडायला धावणार (खरोखरचं मांजर समजुन) आणि अचानक मूळ रुपात प्रकट होउन धमाल उडवुन देणार.
मग मी होइन अदृश्य आणि जाइन बॉसच्या घरी, शिंचा तो सदैव खार खाउन का असतो, ते शोधीन.
ह्याच्या पर्सनल लाइफ मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते शोधीन.
मग होइन मी एक पोपट् हिरवेगार पंख, लालचुटुक ओठ असलेला पोपट.
मुक्त, स्वच्छंद पोपट्. अजुन कधीही पिंजर्यात न आलेला पोपट.
उंचावरुन उडाताना, माणसं छोटी छोटी दिसताना नक्की वाटतं कसं ते पाहिन. एखाद्या उंच दरिच्या
मधोमध स्वैर उड्ण्याची मजा घेइन. अल्गद अधांतरी तरंगत राहेन कित्येक वेळ.
मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात.
एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन.
जाता जाता, अदृष्य रुपानं थेट मैदानात उतरुन ऐन बहरात असलेला सचिन कशी फटकेअबाजी करतो, ते
थेट मैदानात उतरुन पाहिन. अगदि त्याच्या बाजुला उभं राहुन!
आणि मग जाइन मी माझ्या ग्यानबा नाय तर तुकोबा कडं .
तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन.
तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त.
अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच संपलं कि ह्या इच्छात!
अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच पुर्ण झालं कि ह्या इच्छात!
बस्स..........
फार हावरट नाही.इतकच हवय.
आपलाच,
मनोबा
31 May 2008 - 4:24 pm | विसोबा खेचर
मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात.
एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन.
वा! सुंदर...!
31 May 2008 - 4:58 pm | मदनबाण
तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन.
तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त.
व्वा हे फार आवडल.....
(तल्लिन होण्यास आतुर)
मदनबाण.....
31 May 2008 - 8:03 pm | शितल
माझ्या जवळच्या मैत्रीणि बरोबर कुणकेश्वरला जाईन तीच्याशी मस्त गप्पा टप्पा, स्॑दीप खरे या॑ची गाणी सतत कानाला सुखावतील अशी व्यवस्था करून समुद्र किनार्यावर पहाटेच जाईन आणि मनसोक्त लाटा पहात बसेन,मला लाटा॑चा आवाज खुप आवडतो. आणि तेथुन जवळच असलेल्या शिव म्॑दीराच्या घ॑टेचा निनाद ऐकत वाळु तुन शिप॑ले गोळा करत दुपार पर्यत राहीन, परत घरी येऊन मस्त आ॑बा, फणस, चुलीवर भाजलेले काजु आणि गरम गरम ता॑दळाचे उकडीचे मोदक खाईन आणि परत समुद्र किनार्यावर अगदी सुर्य मावळल्या न॑तर ही चा॑दणे दिसेस पर्यत राहीन.
1 Jun 2008 - 9:00 am | गणा मास्तर
मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन.
आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!!
अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!!
मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला.
आयला माझ्या मनातले लिहिलय. माचीवरुन बोंबा ठोकल्या की वज्रगड उर्फ रुद्रमाळावरून मस्त प्रतिध्वनी ऐकू येतो!!!
पावसाळा असेल तर आणखीनच झकास. जाताना कात्रज घाटातुन जायचे आणि येताना दिवे घाटातुन यायचे.
2 Jun 2008 - 10:37 am | ऋचा
बाईक काढायची पाण्याची बाटली घ्यायची आणि कोणतही ठीकाण न ठरवता नुसतं भटकत रहायचं....
भुक लागली की खायच आणि पुढे जायचं