पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
8 Feb 2009 - 6:06 am

घेतली मिठीत आम्ही
मेघातली त्या वीज ती
ठाउक हे होते जरी की
आंम्हास हो जाळेल ती

जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती मिठीत
कौतुक त्याचे आंम्हास हो

चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली

कविताआस्वाद