आलो शरण तुला...
कितीक प्रमाद घडले माझे
मार्ग दाखवी खरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
तुझी कृपा नर जन्मी घातले,
सुख दु:खाचे दिवस दाविले.
क्रुतघ्न मी पण तुला विस्मरे,
क्षमा करी लेकरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
संसाराचे पाश तोडता,
इथे मोहवी विकारवशता.
मन गुंतावे चरणी तुझीया,
लोभ सरावा पुरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
उदासीनता मनास व्यापी,
रुदन येतसे पश्चातापी.
भवपन्थातुनी मला सोडवी,
करूनी अवघी त्वरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
प्रतिक्रिया
4 Feb 2009 - 7:37 pm | अंकुश चव्हाण
क्रुपया काही चुका जाहल्या असल्यास अजाण आणि अज्ञानी बालक समजुन समजावुन सांगा. थेट शब्दांचे शरसंधान करु नका, माझे शब्द सामर्थ्य तुमच्या इतके गडगंज नाही.