लावणी-प्रणयरातीला कुठ चालला

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
3 Feb 2009 - 8:52 pm

रात चांदण टिपूर सांडल
वार्‍याचा बी साज नवा
प्रणयरातीला कुठ चालला
शृंगाराला सोडून या

नथनी पैंजण दूर ठेवल
कशास त्यांची भीड उगा
प्रणयाच्या या साजापुढती
सोन्याचाही साज फिका

हाती माझ्या हात सख्याचा
अन् फुललेली रात हवी
नभांगणातील लाख चांदणी
प्रीत बघुनी जळल मनी

प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी
अस सामोर जाव रातीला
रोजच व्हावी रात नवी

कविताआस्वाद