घालीत साद फुलवित रात
स्वप्नात सखी ती येते
लाजून जरा हासून जरा
देहात मिसळुनी जाते
ती स्वप्नपरी ती
ती धुंद कळी ती
ती रातराणी ती माझी
ती मुग्ध बासरी
मंद हासरी
प्रिया सखी फुलराणी
श्वासात गंध ओठात चंद्र
मग रात धुंद ही होते
प्रणयास रंग रेशमी संग
मग कळी फुलुनि येते
ती स्वप्नपरी ती ---
जागती रात धुंदीत गात
कसली पहाट मग होते
जुळवीत सूर नादात चूर
स्वप्नात रोज ती येते
ती स्वप्नपरी ती ---
प्रतिक्रिया
2 Feb 2009 - 11:28 pm | लिखाळ
छान कविता...
-- लिखाळ.