-२३००० ते +२००९

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
2 Feb 2009 - 9:41 am

कधी कधी नशिब चांगले असते. लोकल मधे चक्क खिडकीची जागा मिळते. सकाळी साडेसात वाजता दादरच्या एका शाळेत जायचे होते. बसल्या बसल्या डूलकी लागली.
गाडी सुरु कधी झाली ते कळालेच नाही.
Nowadays there is a decline in moral degradation. हे वाक्य कानावर आले आणि खड्बडुन जागा झालो. च्या मारी गाडी मंगलोर ला पोचली की काय असा दाट संशय आला. बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता. मला अचानक जागा झालेला बघुन त्याने म्हटले,"सॉरी हं" तुमची झोपमोड केली.
मी गप्प राहीलो.
"पण मी म्हणतो ते खरे आहे की नाही". आणखी एक शीटी . आता मात्र राहवेना. "तुम्हाला मॉरल डीग्रेडेशन कमी झाले तर प्रॉब्लेम काय"? -मी. त्याला त्याची चूक लक्षात आली. " नाही हो मला असे म्हणायचे होते की परस्पर संबंधात नीती मुल्यांना अर्थ राहीला नाही आजकाल. मी काही बोलणार इतक्यात त्याच्या बाजूची 'कडक इस्त्री" वाफाळली." माझ्या माहीती प्रमाणे गेल्या २३००० वर्षात ह्या परिस्थीत काहीही फरक पडलेला नाही". ( डायरे़क्ट महाभारत) असे आहे बघा , द्रौपदीला पाच नवरे असताना तीला कर्णाची इच्छा झालीच का नाही? आणि स्वर्ग प्रवेश झाला नाही. मग तीला 'सती सावित्री' का म्हणायचे? आणि ' पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करणा-या आणि संसाराला हातभार लावणा-या स्त्रीने ऑफिसमधे एखादे अफेअर केले तर लगेच नितीमत्तेची आरडाओरड होते." मी लगेच 'कुकर' कडे बघीतले.
आता हा बाबा गोंधळलेला होता. पण तो पण आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. त्याने लगेच कसला तरी "स्टॅटीस्टीकल डेटा" द्यायला सुरुवात केली. आणि गाडी दादरला पोचेपर्यंत वाद काही संपला नाही. माटूंगा येता येता एका कागदावर दोघांनाही एका कागदावर मराठी साईट्सची नावे दीली. आणि उतरताना म्हटले " वाफेवर उत्तम उपाय". उतरताना कडक इस्त्रीने आपण 'पलीकडे' लेखक असल्याची माहीती दीली. लै भारी आयटम याची देहा बघितल्याचे समाधान मिळाले. असो.
......................................................................................
कार्यक्रम संपल्यावर मधे ३ तास वेळ होता. आता दादर ते परत ठाणे प्रवास करणे शक्य नव्हते. दादरला भावाकडे सकाळी सकाळी जाउन त्रास देणे प्रशस्त वाटले नाही. मग करायचे तरी काय. मग विचार केला आणि मॉर्निंग शो बघु. स्वस्त आणि मस्त. सिनेमा सुरु झाला आणि मी झोपलो एवढा सिनेमा चांगला होता. मध्यंतरात जाग आली. चहा घेण्यासाठी बाहेर आलो. चहा घेता घेता समोर एक जोडपे दिसले. त्यातला बाप्या एकदम ओळखीचा. आमच्याच कॉलनीत राहायचा. दहा वर्षापुर्वी ठाण्याची जागा विकुन डोंबिवलीला गेला होता. लग्न डोंबिवलीलाच झालेले. पत्रिका होती. पण मी जाउ शकलो नव्हतो. गळ्यात मंगळसुत्र बघितले आणि मी आपले सवयीने काय वहिनी, कसे काय म्हटले. दोघांच्याही चेहे-यावर सावल्या बघितल्यावर माझे काहीतरी चुकते आहे ह्याची जाणिव झाली. विषय न वाढवता मी पळ काढला. सिनेमा सुटल्यावर बाप्याने माझा मोबाईल नंबर घेतला.
संध्या़काळी घरी आल्यावर तो बाप्या भेट्ल्याचे बायकोला सांगितले. त्याच्यामानाने बायको जरा सावळी असल्याचे सांगताच बायकोने वेड्यातच काढले. आणि प्रकार संपुर्ण लक्षात आला.
दुस-या दिवशी बाप्याचा फोन आला. स्पष्टीकरण देण्याकरता. ते असे.
आम्ही ऑफिसमधले कुलिग. आमचे 'तसे काही नाही'. संबंध अगदी प्लेटॉनिक आहेत. उगाच गैरसमज नको. पण कुठे बोलु सुद्धा नका. उगाच शिंतोडे नकोत. वगैरे बगैरे.
माझा कुठलाही समज झाला नसल्याची आणि बघीतलेल्या प्रकाराची वाच्यता करणार नाही ह्याचे वचन मी बाप्याला दिले आणि विषय संपवला.
डोंबिवली ते दादर-मॉर्निंग शो (प्रेक्षक कमी) वा ......रे प्लेटॉनिक. हे प्लेटॉनिक नव्हते तर प्ले फॉर टॉनिक होते. असतील दोघांच्याही घरी 'इतर' प्रॉब्लेम. शोधतात समदु:खी एकमेकाना. वावगे काय त्यात. लगेच नितीमत्तेचा -ह्रास वगैरेची बकवास मी तरी करणार नाही. पण एक प्रश्न नक्की पडतो. समजा बाप्याला त्याच्या बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील.
जाता जाता: नक्की उच्चार कोणता? कलीग का कुलीग

मला मॉरॅलीटीच्या सोल्युशनपेक्षा मॉलॅरीटी ऑफ सोल्युशन मधे मेंदु चालतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

रामदास's picture

2 Feb 2009 - 9:44 am | रामदास

सकाळ झाली.

सहज's picture

2 Feb 2009 - 9:57 am | सहज

ठ्ठो!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2009 - 10:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी =)) च ...

समजा बाप्याला त्याच्या बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील.
मी तुमच्या जागी असते तर "माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला नाही, मी कुठे काही बोलणार नाही; तुझ्याबद्दलही नाही आणि तुझी बायको अशी दुसर्‍याबरोबर दिसली तर तिच्याबद्दलही नाही!", असं एक खुस्पट सोडून दिलं असतं.

म्हणूनच तर मी समुपदेशकही नाही.

(हलकट नं १) अदिती

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अवलिया's picture

2 Feb 2009 - 1:44 pm | अवलिया

मी तुमच्या जागी असते तर "माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला नाही, मी कुठे काही बोलणार नाही; तुझ्याबद्दलही नाही आणि तुझी बायको अशी दुसर्‍याबरोबर दिसली तर तिच्याबद्दलही नाही!", असं एक खुस्पट सोडून दिलं असतं.

आणि माझ्याबद्दल कुठे काही बोलशील तर याद राख....असे ही बजावुन सांगितले असते.

(बाप्या) अवलिया

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 10:06 am | विनायक प्रभू

"मॉरल पोलीस" ? रामदास शेठ

दशानन's picture

2 Feb 2009 - 9:50 am | दशानन

>>>बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील.

अहंकार दुखावला जाईल.... व घटस्फोट किंवा तीच्या हत्येची तयारी.

बाकी चित्रांना नावे मस्तच ;) वाफाळलेली इस्त्री... शिट्टी .. बाप्या.. क्या बात है !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 11:47 am | विनायक प्रभू

अगदी बरोबर.

संजय अभ्यंकर's picture

2 Feb 2009 - 10:02 am | संजय अभ्यंकर

सहमत!
~X(

मास्तरांनी, लै लोकांच्या मेंदूला कामाला लावले बघा!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

आनंद घारे's picture

2 Feb 2009 - 10:02 am | आनंद घारे

द्रौपदीच्या मनात फक्त इच्छा झाली असेल. म्हणजे असे कडक इस्त्रीने सांगितले, असे विप्र लिहितात. आपल्याला त्यातलं काही ठाऊक नाही बुवा. नाहीतर उगाच कुणी माझा निषेध बिषेध करायला नको.
आजकालची सावळी गौरांगाबरोबर सिनेमाच्या थेटरात त्यांना दिसली. " हे प्लेटॉनिक नव्हते तर प्ले फॉर टॉनिक होते." असे तेच म्हणतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

2 Feb 2009 - 10:09 am | मुक्तसुनीत

विप्र साहेब,
मला तुमचे लेख वाचताना काही प्रश्न नेहमी पडत आले आहेत. हे प्रश्न विषयाशी संबंधित नसून , तुमच्या लिखाणाच्या शैलीबद्दल , तुमच्या लिखाणातील तुमच्या स्वतःच्या भूमिकेबद्दलचे आहेत. म्हण्टले तर हे थोडे विषयांतरच होते ; पण काही लेख वाचून झाल्यावर मला जाणवलेल्या पॅटर्नमुळे , ते विचारता येतील.

तुम्ही तुमच्या खुमासदार , किंवा लोक ज्याला "क्रिप्टिक" म्हणतात त्या शैलीत कौटुंबिक संबंधांबद्दल , मुलांच्या वाढत्या वयातल्या प्रश्नाबद्दल किंवा इतर संवेदनशील विषयांवर लिहिता. त्यातून दिसणार्‍या सामाजिक विसंगंतींवर बोट ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असतो. विसंगती , अज्ञानापोटी केलेली वर्तणूक याबाबत तुम्ही भाष्य करत नाही ; पण त्यातून जे पोचवायचे ते पोचविले जाते. तर माझे प्रश्न असे की ,

- तुम्ही समुपदेशन करता तेव्हा तुमचे व्यंगाचे शस्त्र वापरता का ? वापरत असल्यास , जे जे कुठल्या ना कुठल्या "सिचुएशन"मधे अडकलेले असतील त्यांना या व्यंगामागचा उद्देश कळ्ण्याइतके ते प्रगल्भ असतील का ?

- तुमचे लिखाण हे "तुमचा अर्थ तुम्ही काढा , त्याबद्दलचे निष्कर्ष तुम्ही काढा" या स्वरूपाचे आहे. कुठल्याही प्रकारची ठोस नैतिक भूमिका तुम्ही घेताना दिसत नाही. हे उद्देशपूर्वक केलेले आहे काय ? असल्यास याचा उद्देश काय ? यातून , या संवेदनशील विषयांवर जागृती निर्माण होण्याच्या दृष्टिने काय साध्य होते ?

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 10:17 am | विनायक प्रभू

संवादामधे व्यंग अगदी कमी असते. रोखठोक बोलणे असते प्रष्नानुसार.
नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे. त्यामुळे लिहीताना त्याची काळजी घ्यावी नसते. (स्विपींग स्टेट्मेंट वगैरे वगैरे आणि त्यातुन होणारे वाद.
बोलताना फ्रेम ऑफ रेफरन्स समोर असते त्यामुळे ठोस भुमिका घेता येते.

अवलिया's picture

2 Feb 2009 - 1:20 pm | अवलिया

नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे
सहमत

--अवलिया

अवलिया's picture

2 Feb 2009 - 1:21 pm | अवलिया

तुमच्या कथेत तुम्ही कधीच हिरोच्या भुमिकेत दिसत नाही. का बरे?
--अवलिया

दशानन's picture

2 Feb 2009 - 1:21 pm | दशानन

सहमत.

तुम्ही त्या कॉमन मॅन सारखं जे घडत आहे ते फक्त बघत आहात असे वाटतं कधी कधी... व तटस्थ नजरेने त्या बद्दल लिखाण !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 1:25 pm | विनायक प्रभू

त्याहुन वेगळे काय करता येते?
आसाराम बाबा काय काय सांगतो.
उदा: स्त्री संबंध ठेउ नका. त्याला भजणारे काय लगेच ब्रम्हचारी होतात काय.
तो कितीवेळा बद्दल पण सांगतो. भक्त लोक घरी जाउन नेमके त्या उलट.
मी बाबा नाही. अगदी कॉमन मॅन आहे.

अवलिया's picture

2 Feb 2009 - 1:30 pm | अवलिया

तुम्ही आत्ता आसारामाच्या भुमिकेत आहात.
आम्हाला आसारामची माहिती हवी... तो काय करतो अशा परिस्थितीत?
देता? आहे तयारी?

--अवलिया

दशानन's picture

2 Feb 2009 - 1:32 pm | दशानन

=))

त्यांची लंगोटी सुटायची वेळ आली आहे !
क्रिमनल लेव्हलच्या केसेस चालू आहेत !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

ब्रिटिश's picture

2 Feb 2009 - 1:35 pm | ब्रिटिश

आसाराम ?
जल्ला कसा करतो राम ?

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 1:42 pm | विनायक प्रभू

मी आयकले आहे ते खास प्रवचन. ३ वेळा च्या वर परवानगी नाही असे म्हणतो भगत गणाना. ह्याला मुले कशी झाली कुणास ठाउक?
बहुतेक कुणास बोलवले असेल.
फक्त सिनेमात अशी होतात. एक गाणे म्हणायचे लगेच उलट्या सुरु.
डॉक्टर येतो. नाडी तपासतो. लगेच हाबिणंदन.

अवलिया's picture

2 Feb 2009 - 1:46 pm | अवलिया

प्रश्न टाळु नका नेहमी प्रमाणे......
मी या लेखातला आसाराम (पक्षी: विनायक प्रभु ) यांच्या बद्दल विचारले होते.

--अवलिया

सखाराम_गटणे™'s picture

2 Feb 2009 - 1:47 pm | सखाराम_गटणे™

ब्रिटनी स्पीयर्स आठवते का?
मजबुत किस्सा आहे.

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 1:53 pm | विनायक प्रभू

तीने बरेच मजबुत स्पीयर्स संभाळले आणि किंमत पण तशीच मजबुत मोजली.

सखाराम_गटणे™'s picture

2 Feb 2009 - 1:57 pm | सखाराम_गटणे™

तीने बरेच मजबुत स्पीयर्स संभाळले आणि किंमत पण तशीच मजबुत मोजली.
जैसी करणी वैसी बरणी

तीचे जे काही झाले, ते वाईट झाले.

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2009 - 12:15 am | पिवळा डांबिस

अरे तसां नाय रे अवलिया,
असां बघ, अशोककुमार नेहमी चरित्र भूमिकांमधेच बरो वाटता....
अशोककुमारचे हिरोची भूमिका असलेले चित्रपट आठ्व (ज्वेल थीफ सोडांन) आणि सांग माझां बरोबर आसां काय नाय!!!:)
तसे मास्तर आपल्या मिपावरचे जळ्ळे अशोककुमारच आसंत काय नाय?
:)

निवेदनः
आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा

आचरट कार्टा's picture

3 Feb 2009 - 1:42 am | आचरट कार्टा

अवांतर!
डांबीसकाका, ह्या बाकी झ्याक! आता कोंकणीतसून बोलूचा तं तुमचा नाव बदलूक व्हया! "पिवळो डांबीस" कराक नुको? "पिवळा डांबीस" कोंकणी बोलूक नाय!

अतिअवांतरः
ही मालवणी आसा... वेळेर सांगतंय, नायतर कोंकणी बिघडवल्यान म्हणान गाळ्यो मिळतले माका!
आजपास्ना मी हंय माका होयत तितको मालवणी बोलूचा म्हणतंय. नायच जमला तं साधोसुधो मराठी बाणो हाच आपलो!
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

मुक्तसुनीत's picture

3 Feb 2009 - 4:09 am | मुक्तसुनीत

असां बघ, अशोककुमार नेहमी चरित्र भूमिकांमधेच बरो वाटता...
जर का
विप्र = अशोक कुमार
तर
त्यांचा मिपावरला सिनेमा = शौकीन !!

कसं म्हणता ! =))

विनायक प्रभू's picture

3 Feb 2009 - 8:49 am | विनायक प्रभू

अरे देवा, विप्र म्हणाला.
अशोक कुमार काय, शौकीन काय्........अरे किती नावे ठेवाल रे बाबानो.
अशोक कुमार एक उत्तम प्रतीचा बॉक्सर होता.

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 1:19 pm | विनायक प्रभू

असे म्हणताहात तुम्ही.

ब्रिटिश's picture

2 Feb 2009 - 1:22 pm | ब्रिटिश

+२००००
problem will remain same

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 2:25 pm | शंकरराव

बसल्या बसल्या डूलकी लागली.
वाटले आता मास्तुरे स्वप्नकथा समुपदेशन सुरू करतात की काय
बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता.
=))

राघव's picture

2 Feb 2009 - 4:58 pm | राघव

तुम्ही फारच भारी लिहिता ब्वॉ... म्हंजे काही सुचतच नाही बघा. :) असो.
नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे.
खरे आहे. अन् हेही तितकेच खरे की ते शब्दांत मांडता येणेही कठीण आहे. सर्वंकष पातळीवर (general level) याची व्यख्या करणेही जवळ जवळ अशक्य आहे. कारण प्रसंगानुरूप बर्‍याच गोष्टी सापेक्ष असतात.
तरी साधारणपणे जर असा विचार केला तर -
आपल्याला विचारप्रणाली नुसार पटणारी अशी व्यक्ती कोण आहे ते बघावे , नंतर त्या व्यक्तीला आपण आत्ता जसे वागतो आहे ते आवडले असते का ते पहावे. अन् आवडले असते असे वाटले तर बिनदिक्कतपणे तसे वागावे नाही तर स्वतःच्या कृतीला पायबंद घालायचा प्रयत्न करावा.
यात मुख्य गोची अशी आहे की आपणाला स्वत:ला वैचारीक दृष्ट्या पटणारी व्यक्ती कोणती त्यावर आपली वर्तणुक अवलंबून असेल. कुणाला काय आवडेल हे सांगता येणे अशक्य आहे ;) . पण निदान असे केल्याने प्रत्येक जण स्वतःच्या विचारप्रकृती प्रमाणे सहज जीवन जगू शकेल. इतरांच्या दृष्टीने ते चूक असो वा बरोबर त्याचा फरक त्यास पडणार नाही. अन् आपण काही पापकर्म करतो आहोत ही अपराधी भावना तरी असणार नाही.

मुमुक्षु

टारझन's picture

2 Feb 2009 - 10:28 pm | टारझन

मास्तर .. मॉर्णींग शो काय .. ह्म्म्म .. ह्म्म्म ..
बाकी तुम्ही थेटरात काय वैणी म्हंटल्यावत तुमचा झालेला पोपटी चेहरा पहाण्याची विच्छा होती :)

बाकी चालू द्या...

(फार पुर्वी एकदाच मॉर्णिंग* शो ला गेलेला) टारझण

प्राजु's picture

3 Feb 2009 - 12:27 am | प्राजु

एक काम रे जरा.. तुझं ते ण बंद कर. काय होतं उगाच कानात णळ फुटल्यासारखं वाटायला लागतं.
णॉर्मल आपलं नॉर्मल माणसासारखं लिही रे जरा. :)
आवांतर : विप्रंचा लेख वाचला.. प्रतिसाद सविस्तर नंतर लिहिते. टार्‍याचा "ण" डोक्यात गेला एकदम. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2009 - 12:33 am | पिवळा डांबिस

टारू "ण" बंद करू शकणां नाय!!! तेच्या म्हणे बोटाचां हाड वाढलांसां असां तोच म्हणता!!!
माकां तर वाटतां की तेच्या नाकाचा हाड वाढलां असतंला....
म्हणान तेका न आणि ण मधलो फरकच कळणा नाय!!!!:))

जिभेचां हाड मोडलेलो,
डांबिसकाका
:)