अजय-अतुलने एकापेक्षा एक अशी सरस गाणी देउन मराठी चित्रपट संगीतात एक नवे युगच निर्माण केले आहे.
ह्या द्वयीचे सगळ्यात जास्त कौतुक ह्याचे वाटते की, त्यांनीच म्हंटल्याप्रमाणे त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलेच नाही. तरी सुद्धा त्यांचा संगीत अविष्कार इतका तालबद्ध असतो की, त्यांची कीर्ति आंध्रातही पोहोचली व त्यांनी एका तेलगू चित्रपटालाही संगीत दिले.
त्यांची गीते ऐकतांना मला रेहमानच्या "थिरुडा-थिरुडा" ह्या तामीळ गाण्यांचे संगीत आठवते. रेहमानच्या सुरुवातीच्या काळातील हा एक संगीतातील अप्रतिम नमुना होता.
राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.
प्रतिक्रिया
1 Feb 2009 - 2:00 pm | अविनाशकुलकर्णी
सहमत...मला जर तेलगु सिनेमा काढायचा ़झाला तर मी त्यांनाच संगीत द्यायला लावणार आहे.....
1 Feb 2009 - 3:11 pm | विसोबा खेचर
राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.
हेच म्हणतो. जोडी खरंच गुणी आहे..
तात्या.
1 Feb 2009 - 3:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.
असंच म्हणते.
('कोंबडी पळाली'ची फ्यान)अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
2 Feb 2009 - 3:37 pm | मनस्वी
असेच म्हणते.
('विश्वविनायक'ची फॅन) मनस्वी
4 Feb 2009 - 9:53 pm | भिडू
बँगलोर ला माझ्ह्या बाजुला काही आसाम ची पोरे रहातात . त्यांच्या पण संगणकावर 'कोंबडी पळाली' हे गाणे ऐकले.ते या गाण्यावर नाच करत होते.
म्हणजे हे गाणे किती फेमस झाले आहे ते बघा.बँगलोर(दक्षिण) मधे आसाम(पुर्व) ची मुले मराठी(पश्चीम) गाणे ऐकुन त्याच्यावर नाच करतात.
1 Feb 2009 - 3:43 pm | शक्तिमान
मन उधाण वार्याचे....
वा.. काय सुरेख गाणे आहे.
जिओ अजय-अतुल !
1 Feb 2009 - 3:47 pm | महेंद्र
या पोस्ट वर काय काथ्याकुट करणार?
चांगलं आहे संगित!
1 Feb 2009 - 8:56 pm | प्राजु
मराठी संगिताने कात टाकली यांच्या गाण्यातून असंच म्हणावं लागेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Feb 2009 - 9:55 pm | संदीप चित्रे
असेच म्हणतो
2 Feb 2009 - 5:53 am | मुक्ता
मी पण असेच म्हणते..माझा दोन वर्शाचा मुलगा पण 'मन उधाण वार्याचे' या गाण्याचा पंखा आहे.
2 Feb 2009 - 7:55 am | सहज
प्रतिसादातुन उल्लेखलेली गाणी ऐकली आहेत व आवडली आहेत. अजय अतुल संगीतकार माहीत नव्हते. धन्य त्रास जी.
स्पीकिंग ऑफ दी स्मॉल टाउन हिरोज
मधे एक अफलातुन डॉक्युमेंटरी बघायला मिळाली. "सुपरमेन ऑफ मालेगाव" मालेगाव येथील काही हौशी युवक फुल्ल टु हॉलीवुड, बॉलीवुड्ला खुन्नस इश्टाइल सिनेमा काढतात सिनेमाचे नाव "मालेगाव का सुपरमॅन" त्या हरहुन्नरी कल्पक युवकांच्या सिनेमा अथ पासुन इति पर्यंत नेणार्या प्रवासावर "सुपरमेन ऑफ मालेगाव" बनवला गेला व त्या माहीतीपटाला "द एशियन पीच" स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले.
त्यावर थोडे इथे वाचता येईल. स्पेशल इफेक्ट्स साठी केलेली कमाल येथील काही फोटोमधुन पहाता येईल. काही दिवसांपर्यंत असलेला ह्या चित्रपटातील गाण्याचा एक ऑसम व्हिडीओ आता यु ट्युब वरुन नेमका काढला गेला आहे. कोणाला कुठल्या व्हिडिओ साईट वर आढळला तर कृपया मला त्याचा दुवा द्या. तोवर हॉलीवुडला घाम फोडायला लावणार्या सुपरमॅनची एक झलक पहा
काही लोकांना मसालापट पहायला जितके आवडतात तसे मला माहीतीपट [डॉक्युमेंटरी जंकी] बघायला आवडतात त्यामुळे हा माहीतीपट बघण्यात माहीतीपट व मसाला चित्रपट दोन्ही बघीतल्याचा दुप्पट आनंद मिळाला. भारतात कधी देशी माहीतीपट दाखवतात की नाही कुठल्या चॅनेलवर?
2 Feb 2009 - 3:29 pm | मराठी शब्द
अजय-अतुलचा गणपती स्तुती/आरती वरचा एक अल्बम खूपच श्रवणीय आहे. "विश्व विनायक" असे त्या अल्बमचे नाव आहे.
2 Feb 2009 - 7:39 pm | आपला अभिजित
`उलाढाल'मधल्या `मोरया मोरया'चा उल्लेख दिसत नाही.
अजय-अतुल उत्तम गायकही आहेत.
2 Feb 2009 - 7:47 pm | मधु मलुष्टे ज्य...
अजय अतुल जोडीचे संगीत धमाल असते. 'मन उधाण वार्याचे', 'मल्हारवारी', 'वार्यावरती गंध पसरला' अशी अनेक उत्तम गाणी दिली आहेत.
मला सर्वात जास्त आवडते ते 'देवा तुझ्या दारी आलो.. मोरया मोरया' हे गाणे. ढोल ताश्य़ाचा वापर सुरेख केला आहे.
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
4 Feb 2009 - 9:39 pm | विनायक पाचलग
आम्हीएखील मोठे पंखे आहोत त्यांचे
त्यांची काही कर्ये-
विश्वविनायक
मीरेच्या गाण्यांचे अल्बुम
अग बाइ अर्रेच्या
सावरखेड एक गाव
बेधुंद अल्बुम
बेधुंद चित्रपट
चेकमेट
एक दाव धोबीपछाड
साडे माडे तीन
तुझ्या माझ्या संसाराला....
जबरदस्त
चिंब भिजलेले हे गाणे अस्णारा चित्रपट
तेलगु चित्रपट -शॉक
हिंदी-वास्तव्,गायब
जत्रा
घडलय बिघडलय
सा रे ग म प
उलाढाल
बाकी आता आमच्या संग्रहात इतकेच आहेत
आपला
अनेकांचा पंखा असणारा
विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
4 Feb 2009 - 10:05 pm | चित्रा
अजय अतुल यांचे नाव माहिती नव्हते.
मग उदे ग अंबे पण त्यांचेच असले तर आवडते.
4 Feb 2009 - 10:34 pm | अनामिक
नव्या संगीतकारांपैकी उत्तम जोडी.
त्यांची ई-सकाळवरील मुलाखत पुढच्या लिंकवर बघा.
http://beta.esakal.com/2009/01/13185859/interview-with-music-composers.html
अनामिक
4 Feb 2009 - 10:43 pm | विनायक पाचलग
उदे ग अंबे त्यांचेच
आणि त्यांची मुलाखत आपण जानेवारी च्या प्रीमीअर मध्येही वाचु शकता
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
4 Feb 2009 - 11:40 pm | चित्रा
अजय अतुल यांची मुलाखत आवडली.
त्यांनी संगितकलेचे शिक्षण घेतलेले नाही, हे ऐकून आश्चर्य वाटले - पण काही गोष्टी जन्मजात येत असाव्यात. अगबाई अरेच्चामधली त्यांची गाणी ऐकताना वाद्ये, गायकांची निवड, गाणी सर्वच आवडले होते. (आता ही गाणी परत ऐकली पाहिजेत).
5 Feb 2009 - 3:18 pm | मैत्र
चित्रपटाला त्यांचं संगीत होतं. त्यातलं शंकर महादेवनच्या आवाजातलं "एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमही" हे स्तोत्र अतिशय अप्रतिम आहे... त्यात आबेदा परवीन च्या आवाजात कबीराची/सुफी भजनं आहेत. तीही उत्तम आहेत. पण ते त्यांचं संगीत आहे का परंपरागत सुफी रचना आहेत हे माहीत नाही.
मराठीत त्यांचं मन उधाण वार्याचे सगळ्यात बेस्ट आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत नम्र(मॉडेस्ट?) अशी जोडी आहे. त्याचं बोलणं एकदम साधं असतं. आपण खूप ग्रेट काम करतोय वगैरे काही नाही. जुन्या आणि नव्या संगीतकारांबद्दल ते खूप आदराने बोलतात. ही फार मोठी गोष्ट आहे.
9 Feb 2009 - 10:43 pm | भडकमकर मास्तर
अजय अतुल भन्नाट आहेत...
... "चमचम करता है यह नशीला ..."मधले म्युझिक पीसेस अफलातून आहेत...
" आम्ही छोट्या गावातून आलो म्हणून आमचं शहरात कोणी ऐकत नाही.. आमच्यावर शहरी लोक आन्याय करतात " असं म्हणणार्यांना नेहमी अजय अतुल यांचे उदाहरण द्यावे....... गुणवत्ता असली तर कोणी कधीही मागे राहणार नाही, हेच खरे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/