वाटा

रचनाद्लाल's picture
रचनाद्लाल in जनातलं, मनातलं
16 Jan 2008 - 3:49 pm

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।

हो येथेच सुरवात , इथेच अंत

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

16 Jan 2008 - 7:22 pm | स्वाती राजेश

खूप चांगला प्रयत्न आहे.
कदाचित याही पेक्षा आपण खूप छान कविता करू शकाल.
पुढ्यच्या कवितेच्या प्रतिक्षेत...

पाहूनी त्या वळणावर आसवांना,काळोखाआड कधी गळतात वाटा।
या ओळी आवडल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2008 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणास कधी कळतात वाटावेड्या कोठून कश्या वळतात वाटा।आणि एकाकी आयुष्य ठेवुन आठवांनासोडूनी हात कधी पळतात वाटा।त्याचबरोबर....!पाहूनी त्या वळणावर आसवांना,काळोखाआड कधी गळतात वाटा।
या  ओळी विशेष आवडल्या. येऊ दे, अशाच सुंदर कविता.

मुक्तसुनीत's picture

16 Jan 2008 - 10:53 pm | मुक्तसुनीत

तुमच्या या कवितेने एका खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका आर्तमधुर मराठी गाण्याची आठवण झाली :

खिन्न या वाटा
दूर पळणार्‍या ....

गायिका : उषा मंगेशकर
काव्य : शांता शेळके
संगीत ???

कुणाला आठवते का हे गीत ? कितीतरी वर्षानी त्याची आठवण जागी झालीय् ....

प्राजु's picture

17 Jan 2008 - 12:12 am | प्राजु

आवडली कविता..

एक चांगली गझल आहे हि.

- प्राजु