गुलाबाचे काटे

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
28 Jan 2009 - 6:50 pm

तुझे माझे गुलाबाचे
जुळ्लेच नाही नाते
गुलाबाच्या गंधाहून
काट्याचीच ओढ वाटे

मैत्री मध्ये आपुल्या या
भांडणच होती फार
रुसुनिया कित्येकदा
शब्दांचीच मारामार

गुलाबाचे फुल देता
काटे तुला बोचतात
शब्द तुझे प्रेममय
रातदिन टोचतात

शब्दाविना फुलाविना
तुझे माझे आहे नाते
म्हणुनच गुलाबाच्या
काट्यांचीही ओढ वाटे

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

गौरिसन्जय's picture

31 Jan 2009 - 12:16 am | गौरिसन्जय

शब्दाविना फुलाविना
तुझे माझे आहे नाते
म्हणुनच गुलाबाच्या
काट्यांचीही ओढ वाटे. खुप र्च सुन्दर
. फार आवडल्या ह्या ओळी......!