वाविप्र

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
27 Jan 2009 - 9:44 pm

हे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. अगदी मिपावर सुद्धा. अर्थात व्यंनि मधुन. आजपण विचारला गेला. मी उतरे दिली. गेल्या ३० वर्षात ही उत्तरे मी तरी बदललेली नाहीत. प्रश्नकर्त्याने ही उत्तरे लेख लिहुन 'कर्तव्य आहे' सदस्यांचा गोंधळ दुर करावा अशी कळकळीची आणि 'कळीची' विनंती केली म्हणुन हा प्रपंच. ह्या काही उत्तराबद्दल वाद होण्याची शक्यता आहे ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. Different strokes for different folks according to frame of reference.
प्रश्नः संतती नियमनाची चांगली साधने कोणती? गोळ्यांचा त्रास होतो हे खरे आहे का?
उत्तरः लग्न झाल्यावर 'मला सगळे माहित आहे' असा आग्रह न धरता चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्या प्रमाणे मार्गक्रमण करावे. गोळ्यांचा त्रास हल्ली गोळ्यामधील हारमोनल लेवल कमी केल्यामुळे फारसा होत नाही. पण १ वर्षानंतर गॅप घ्यावी. इतर साधने वापरावीत.
प्रश्नः लग्न झाल्यावर पहिले मुल केंव्हा.
उत्तरः लग्न झाल्यावर सहसा एक वर्षानंतर 'गुड न्युज' असावी. अर्थात लग्न कितव्या वर्षी झाले हे महत्वाचे. पुरुषाचे वय साधारण ३० -३२ असेल तर जास्त प्लॅनिंग करु नये. स्त्री च्या तीशीनंतर बाळंतपण त्रासदायक होते. नियम नाही. शक्यता वाढते.
प्रश्नः दोन मुलात अंतर किती असावे.
उत्तरः एकानंतर दुसर्-याचा विचार सुद्धा करु नका. हे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात बापजाद्यानी खुप संपत्ती तुमच्या नावे सोडली असेल तर मात्र हरकत नाही. त्या स्थितीत अंतर सहसा ३ वर्ष असावे.
प्रश्नः होणार्-या मुलातील व्यंग कसे कळते.
उत्तरः 'सोनोग्राफी' मधले एक्स्पर्ट डॉक्टर सहसा १२ आठवड्याच्या आधी हे सांगु शकतात. गर्भातली व्यंगे ५ महिन्यानंतर ' कळली तर 'नशिब' ह्या उप्पर काहीही उपाय नसतो. अर्थात ६ महिन्याचा अनिधिकृत गर्भपात करणारे व्यावसयिक पण असतात. हे बरोबर का चूक हा वादग्रस्त प्रश्न आहे. मी त्यात काहीही बोलत नाही.
प्रश्नः नातेसंबंध कसे सांभाळावेत? ( लग्नाचा मस्त 'मुरंबा' कसा करावा) हा मात्र प्रबंध लिहावा लागेल एवढा मोठा प्रश्न.
उत्तरः बायकोला 'आपली जहागिर' नाही समजले तर लग्न व्यवस्थित टिकते. नवर्-याला आपल्या सर्व इच्छा पुरवणारे मशिन नाही समजणे हेही तेवढेच महत्वाचे.
होउ घातलेल्या नवरे लोकांकरता काही खास टीप्सः१. निर्बुद्ध मेहुणा किंवा मेहुणी चे न चुकता कौतुक करावे.२. बायकोच्या बिघडलेल्या स्वयंपाकावर अजिबात टीका करु नये. नाहीतर पुढच्या वेळी 'पडवळाच्या सालीचे वडे' खावे लागतात.३. सासु घरी आल्यावर कपाळाला आठ्या घालु नयेत. नंतर काठ्या खायची तयारी असल्यास हरकत नाही.४. माहेरी जाण्याबद्दल उगाच वाद घालु नये.
मधुन मधुन नवरा नवरा खेळताना अशी सुट्टी आवश्यक असते.५. बायकोचे मुल झाल्यावर सहसा वजन वाढते. असे झाल्यावर लग्नाचा आलबम किंवा कॅसेट शक्यतो टाळावीत्.६.लँडलाईन फक्त इनकमीग करताना परवानगी घ्यावी. ७. बायकोबरोबर फिरायला जातान मानेचा पॅडॅस्टल फॅन होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ८. मॉल मधे असतान खरेदीमधे उत्साहाने भाग घ्यावा.९भांडी घासायला उत्सुकता दाखवावी. आणि चांगली घासावीत. उगीच घोळ नको.१०. कपडे धुवायचे मशिन कसे वापरावे ह्याचे ट्रेनिंग घ्यावे. असे कीतीतरी.
अनुभवी लोकांकडे शेअरीग करुन आपापल्या परिस्थितीप्रमाणे वेळोवेळी बदल करावेत आपल्या वागण्यात. ह्या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही तर ' नशिब लिखा है दंड तो कैसे खायेगा श्रीखंड' ह्या म्हणीला पत्करावे.
जाता जाता: मी मिपावर नविन असताना चुकुन खव मधे माझा फोन जाहीर केला. कृपया त्याचा गैरफायदा घेउ नये ही नम्र विनंती.
सकाळी १० ते रात्री ९ हरकत नाही. त्या नंतर जरा ' खास प्रश्नांची' उत्तर देणे अवघड होते हो. आत्तापर्यंत 'अवेळी' फोनची संख्या १७.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

27 Jan 2009 - 9:51 pm | कलंत्री

प्रभू साहेब,

आपल्या संयमाचा आणि चिकाटीचे कौतुक वाटते. आपण असेच एखादे संकेतस्थळ का सुरु करीत नाही? तेथे अश्या शंकाना उत्तरे देता येतील. त्याच बरोबर शृंगाराला वाहिलेले साहित्यही निर्माण करता येईल. विनोद आणि शृंगाराला वाहिलेले स्थळ असावेत असे मला वाटते.

मी सुद्धा त्यावर १ /२ लेख लिहिण्याचे आश्वासन देतो. उदा. दत्तकाचे कामशास्त्र, भारतातील या शास्त्रासंबंधी अनावस्था इत्यादी.

बाकी व्यनित बोलु या.

द्वारकानाथ कलंत्री

शंकरराव's picture

28 Jan 2009 - 7:33 am | शंकरराव

द्वारकानाथराव,
विप्र करो न करो पण
कलंत्री लिखित गांधीवादासाठी वाहिलेले स्थळ नक्की सुरू करा हो, ईथे हिंसा फार वाढ्ली आहे
शूभेच्छा घेन्यात दिवस कसा निघून जाईल ते कळणार नाही... रोज ३००० + शूभेच्छा तुम्हाला त्या स्थळावर मिळतील.
(गांधीवादि) शंकर पटेल

सर्किट's picture

28 Jan 2009 - 8:47 am | सर्किट (not verified)

आणि तुमच्या त्या बगारामाला पण त्या गांधीसाईटवर घ्या हो ! बजबजपुरीनंतर बगाभाऊ नवीन काही तरी शोधत असतीलच !

-- सर्किट

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 9:57 pm | विनायक प्रभू

इथे आहे तेवढे पुरे. त्या बाहेर काहीही केले तर बायको घराबाहेर हाकलुन देइल. आता ह्या वयात रिस्क बरी नव्हे. फुकट डोक्याला शॉट.

सखाराम_गटणे™'s picture

27 Jan 2009 - 10:02 pm | सखाराम_गटणे™

>>इथे आहे तेवढे पुरे. त्या बाहेर काहीही केले तर बायको घराबाहेर हाकलुन देइल. आता ह्या वयात रिस्क बरी नव्हे. फुकट डोक्याला शॉट

तुम्ही उअगाच बायकोला (तुमच्या) घाबरताय.
तुम्ही संकेतस्थळ चालु केले की तुमचे किती चेले तयार होतील. विचार करा, पुढील किती पिढ्या विप्रवाद घेउन भांडतील.

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 10:04 pm | विनायक प्रभू

गटणे बाळ,
लग्न कर आणि सांग.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 10:28 pm | नितिन थत्ते

वाविप्रची थोडक्यात आणि मुद्देसूद उत्तरे.

आपण डॉक्टर आहात असे दिसते. मी मिपावर नवीन असल्याने माहीत नाही.

होऊ घातलेल्या नवर्‍यांप्रमाणे होऊ घातलेल्या नवर्‍यांसाठी (नवरी चे अनेकवचन) सौ प्रभूंना विचारून टिप्स द्याव्यात. किंवा सौ. प्रभूंनाच लिहायला सांगावे.
(सौ. हे रूढीप्रमाणे लिहिले आहे) ह. घ्या.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सहज's picture

28 Jan 2009 - 7:17 am | सहज

>ह्या काही उत्तराबद्दल वाद होण्याची शक्यता आहे ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे.

:-) हा बहुदा तुमचा सर्वात कमी वादग्रस्त धागा आहे असे म्हणता येईल.

वाविप्र अशी लेखमाला होउन जाउ दे सर.

खास टिप्स ह्या अनाथ मुलांसाठी आहेत असे दिसते. उत्तम!

वारंवार बघणे टाळावे हे मात्र खरे असे वाटते. त्या वेळची दुसरी कुणी मैत्रीण/बहीण आवडलेली होती आणि तिलाच बघण्यासाठी हे सर्व पुन्हा बघितले जाते आहे की काय अशा शंकांनी अनेक दिवस तुमचे हाल होऊ शकतात! :O
(डिसक्लेमर : हा स्वानुभव नसून इतर काही ऐकीव माहितीवर आधारित सावधगिरीचा सल्ला आहे.)

चतुरंग

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 9:50 am | मधु मलुष्टे ज्य...

छान माहितीपुर्ण सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!

भाईकाकांनी लग्नाविषयी दिलेल्या ह्या सल्ल्याची आठवण झाली.
लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या
माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो.

--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

दशानन's picture

28 Jan 2009 - 10:38 am | दशानन

>>>वाविप्र अशी लेखमाला होउन जाउ दे सर.

अगदीच हेच म्हणतो !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 10:54 am | ब्रिटिश

हेच म्हन्तो,
'ताईचा सल्ला' च्या धर्तीवर 'मास्तरचा सल्ला' हा धागा सुरु करण्यात यावा ज्यामूळे आमचेसारक्या अज्ञानी बालकांना कायाक्ल्प क्लीनिक मदे जायची येल येनार नाई.

कमजोरी की दवा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 10:55 am | ब्रिटिश

सकाली उटल्यावर अशक्तपना जानवतो. काय करू ?
क्ष

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

चतुरंग's picture

28 Jan 2009 - 11:00 am | चतुरंग

'स्वप्नातलेदोष' दूर कर म्हणजे झालं! ;)

चतुरंग

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 11:05 am | ब्रिटिश

आता कशे कराचे ते पन सांगा

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

अवलिया's picture

28 Jan 2009 - 11:07 am | अवलिया

रात्री झोपायचे नाही. झोप नाही. स्वप्न नाही. त्यामुळे स्वप्नदोष नाही.

जल्ला सगळ झोपेतच आहे

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 11:05 am | नितिन थत्ते

मास्तरांना व्य. नि. करा कारण अशा गोष्टी सहन होत नाही......
म्हणून जाहीर चर्चा नको

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

दशानन's picture

28 Jan 2009 - 11:07 am | दशानन

ह्यात वाईट काय आहे... !

मास्तर काय मोकळेच हायत की काय... ३०००-३५०० हजार सदस्यांना व्यनी ने उत्तर देत बसयला !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

भारत-श्रीलंका सामना थेट प्रेक्षेपण

अवलिया's picture

28 Jan 2009 - 11:10 am | अवलिया

मास्तर प्रश्न समजुन घेतात

जाहिर वाविप्र टाकतात

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 11:07 am | ब्रिटिश

बाला, मास्तरला सहन होत नाय म्हुनच सांगुन टाकतोय

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 11:08 am | मधु मलुष्टे ज्य...

आदल्यादिवशी शक्तीचा अपव्यय टाळा ! :)

--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

विनायक प्रभू's picture

28 Jan 2009 - 11:10 am | विनायक प्रभू

अहो शक्तीसंवर्धनाला अपव्यय म्हणु नका हो.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 11:13 am | मधु मलुष्टे ज्य...

चुकलो मास्तर.. परत अशी चुक होणार नाही.

--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

अवलिया's picture

28 Jan 2009 - 11:12 am | अवलिया

चांगली शक्ती युक्तीची संवर्धक चर्चा चालु आहे. पाध्ये काय विडा कुटुन खायला गेले का?

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 11:34 am | ब्रिटिश

>>> ह्या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही तर ' नशिब लिखा है दंड तो कैसे खायेगा श्रीखंड' ह्या म्हणीला पत्करावे.
हम्म्म !
वाक्य आजुन चांगल लीवता आल आसतं

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

नंदन's picture

28 Jan 2009 - 12:12 pm | नंदन
घाटावरचे भट's picture

28 Jan 2009 - 12:25 pm | घाटावरचे भट

किंवा वात्रट विप्र.... ;)

विसोबा खेचर's picture

28 Jan 2009 - 12:23 pm | विसोबा खेचर

प्रश्नः संतती नियमनाची चांगली साधने कोणती? गोळ्यांचा त्रास होतो हे खरे आहे का?
प्रश्नः लग्न झाल्यावर पहिले मुल केंव्हा.

पण प्रभूदेवा मला एक कळत नाही की लोक हे त्यांचे असले खाजगी आणि नाजूक प्रश्न नेमके तुम्हाला का विचारतात? तुमचा काय संबंध? :)

आपला,
(खाजगी आणि नाजूक) तात्या.

विनायक प्रभू's picture

28 Jan 2009 - 1:54 pm | विनायक प्रभू

हे रहस्य मला माहीत नाही.

दशानन's picture

30 Jan 2009 - 5:28 pm | दशानन

मी मिपावर नविन असताना चुकुन खव मधे माझा फोन जाहीर केला. कृपया त्याचा गैरफायदा घेउ नये ही नम्र विनंती.
सकाळी १० ते रात्री ९ हरकत नाही. त्या नंतर जरा ' खास प्रश्नांची' उत्तर देणे अवघड होते हो. आत्तापर्यंत 'अवेळी' फोनची संख्या १७.

=))

काय हे.. आम्हाला नाय दिसला नंबर.. नाय तर आम्ही बी फिरवला असताच की ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

शंकरराव's picture

30 Jan 2009 - 6:00 pm | शंकरराव

वटले सांगावे थोडके की उपाय कळावा
वाचता बोलता सर्वकाळी स्पष्ट बोला बॉ
धुमसत संतापाची लाखोली अशी मिळावी
कोणाच्या शिव्यांची ती खरड ? तू
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

शंकरराव ?