आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण....' ही ग़झल.
आज मी सारे खरे ते सांगतो
मी अताशा नवकवींना टाळतो
ते गळी पडणार अंती जाणतो
पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो
संकटे साहीन मी अन वादळे
नवकवी पण धैर्य माझे भेदतो
तो पहा मी चाललो वाटेवरी
शत्रू माझा वाट माझी रोखतो
ऐकताना काव्य त्याचे का मला
काळ पुढती जाईनासा वाटतो
जांभया देऊनही मी एवढ्या
काव्य साला तेच आहे वाचतो
सूड म्हणुनि गोष्ट माझी ही कधी
मुक्तछंदी मी कुणाला सांगतो
टाळती का लोक पण मज ना कळे
कालचा मी नवकवी ना आज तो
- भटोबा
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 11:05 am | प्रभाकर पेठकर
प्रेरणेकडे डोळेझाक केली तर स्वतंत्र काव्य (की नवकाव्य?) म्हणूनही कविता (गजल?) चांगली आहे.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
26 Jan 2009 - 11:13 am | दशानन
आज मी सारे खरे ते सांगतो
मी अताशा नवकवींना टाळतो
ते गळी पडणार अंती जाणतो
पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो
वा वा !
क्या बात है !
***
काल रात्री कोठे तरी गुप्त जागी नवकवींची मिटींग झाली त्यांनी तुमच्यावरच फिल्डींग लावण्याचा प्लान केला आहे.. जपुन राहा =))
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
29 Jan 2009 - 1:43 am | केशवसुमार
मला नाव सांगा त्यांची..
भटोबा, घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे ( कोण म्हणाले रे पाठीशी आहे)
बाकी चांगल चालू आहे...चालू दे..
केशवसुमार
28 Jan 2009 - 11:34 pm | विसोबा खेचर
नवकवींची मस्तच करून टाकली आहे! :)
तात्या.
29 Jan 2009 - 11:05 am | झेल्या
मस्त विरोधाभास...!
कवितेतून (कवीने) केलेली कवितेची (कवींची) टिंगल...!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
29 Jan 2009 - 11:07 am | आनंदयात्री
आवडले
29 Jan 2009 - 11:12 am | सहज
आवडले
भटोबा अजुन लिहा हो. बराच वेळ घेता दोन कवितांमधे :-)
29 Jan 2009 - 12:37 pm | घाटावरचे भट
आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि मी माझ्या शत्रूकडून पराभूत झालो आहे. ;)
29 Jan 2009 - 9:05 pm | llपुण्याचे पेशवेll
आळस हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इतर सर्व मित्र साथ सोडून जातील पण आळस हा कधीच साथ सोडत नाही. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
29 Jan 2009 - 12:38 pm | घाटावरचे भट
प्रतिसाद देणार्या व न देणार्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.
29 Jan 2009 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसाद देणार्या व न देणार्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.
असं लिहून आम्हाला हिणवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
अवांतरः कविता मस्तच आहे, कुठे "भेटली"?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
29 Jan 2009 - 1:16 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
29 Jan 2009 - 9:01 pm | चतुरंग
उत्तम विडंबन! किंबहुना आधी केसुंचं आणि मग तुमचं विडंबन बघूनच मला इजा, बिजा, तिजा ह्या न्यायानं आणखी एक विडंबन करण्याची इच्छा अनावर झाली! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, विडंबनातल्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना वेळेवर प्रोत्साहनाचे प्रतिसाद द्यावेत येवढी साधी गोष्ट तुला जमू नये? एवढी आढ्यता बरी नव्हे! :| )
चतुरंग
29 Jan 2009 - 9:03 pm | लिखाळ
अरे वा .. मस्तच आहे विडंबन :)
-- लिखाळ.