भारत माझा एक रॆ ---- ( दॆशभक्ती)
जाती धर्म वेश भुषा भाषा जरी अनेक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥ ध्रु ॥
ईथली गीता कुराण बायबल
ग्रंथ जरी अनेक रे , संदेश त्यांचा एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥१॥
ईथली गंगा गोदा र्नमदा
तापी नदी अनेक रे , पाणी त्यांचं एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥२॥
ईथले गांधी नेहरु भिमराव
शिवबा हे नेते अनेक रे , कार्य त्यांचं एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥३॥
ईथला माणुस पक्षी प्राणी
सजीव जरी अनेक रे , रक्त त्यांचं एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥४॥
ईथले मंदिर मज्जिद चर्च
गुरुद्वारा अनेक रे ,भक्ती त्यांची एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥५॥
ईथली माती पिकवी मोती
पिकं जरी अनेक रे , दाणा त्यांचा एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥६॥
लहान मोठा गरिब श्रीमंत
राजा असो की रंक रे, तिरंगा आमचा एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥७॥
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 12:57 am | विसोबा खेचर
लहान मोठा गरिब श्रीमंत
राजा असो की रंक रे, तिरंगा आमचा एक रे
भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ
वा!
तात्या.
26 Jan 2009 - 1:04 am | विकास
"भारत माझा एक" हे जितके सत्य आहे, तितकेच, "एक भारतच माझा आहे" हे जेंव्हा समजेल तेंव्हा काही गोष्टी (चांगल्यासाठी) बदलायला मदत होईल असे वाटते.