माझी निवड चुकली तर नाही ना?

मोगॅम्बो's picture
मोगॅम्बो in जनातलं, मनातलं
24 Jan 2009 - 2:15 pm

ई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद.
एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.
प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.
प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.
नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.
आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.
स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

संस्कृतीभाषांतर

प्रतिक्रिया

दशानन's picture

24 Jan 2009 - 2:21 pm | दशानन

सुरेख !

समजण्याचा प्रयत्न करत आहे, पुर्ण प्रतिसाद योग्य वेळी देईनच !

असल्या विषयावर मिपावर अनेक थोर व्यक्ती आहेत तेच योग्य पध्दतीने मत माडू शकतील असा आशावाद मी येथे व्यक्त करतो !

बाकी तुमचा हा उपक्रम छानच आहे... व तुम्ही खास मराठीमध्येच भाषातंर करुन येथे मिपावर दिले ह्या बद्दल तुमचे अभिनंदन, नाही तर काय होतं नेहमी आलेली ढकल पत्रे तशीच्या तशीच कॉपी - पेस्ट करण्याचा हा जमाना पण तुमचे कष्ट वाखाण्याजोगेच आहे... अभिनंदन !

फुलेशु !

नीलकांत's picture

24 Jan 2009 - 2:27 pm | नीलकांत

खरंच छान मुद्दा आहे. असं चक्र आहे हे वाचून गंमत वाटली. लेख आवडला.

नीलकांत

मॅन्ड्रेक's picture

24 Jan 2009 - 2:38 pm | मॅन्ड्रेक

एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

आणि म्हणुनच -

आयुष्यात एक क्षण भाळ्ण्याचा , बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
Mandrake - the magician.
-janadu.

अवलिया's picture

24 Jan 2009 - 2:40 pm | अवलिया

वा!

(चक्रधर) अवलिया

अवलियाची अनुदिनी

अनिल हटेला's picture

24 Jan 2009 - 7:12 pm | अनिल हटेला

आयुष्यात एक क्षण भाळ्ण्याचा , बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
अगदी अगदी सहमत !!
पटण्यासारखा लेख आहे !!
पु ले शु....

(नाती सांभाळणारा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धनंजय's picture

24 Jan 2009 - 8:19 pm | धनंजय

चांगला मुद्दा.
(तरी चांगला सल्ला प्रचारकी म्हणून रटाळ वाटू शकतो. तसा वाटू नये म्हणून मुद्दा सांगणार्‍याला साहित्यिक प्रतिभा पणाला लावावी लागते. हे ढकलपत्रांत क्वचित दिसते. अपवादात्मक ढकलपत्र चांगले असते. अनुवादाबद्दल धन्यवाद)

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 8:25 pm | नितिन थत्ते

आमचा अनुभव या बाबतीत तोकडा असावासे वाटते.

लग्नाला १५ वर्षे झाली. पण अजून नकोसे होण्यासारखी परिस्थिती आलेली नाही.
सुरुवातीच्या काळात एकसारखे फोन वगैरे काही नव्हतेच. आताही फोन मोजकेच असतात.
भेटण्याची ओढ वगैरे अजून शाबूत आहे. कदाचीत गेली २-३ वर्षे लांब रहात असल्याने असेल.

कदाचित स्वेप्ट ऑफ द फीट वगैरे काही झालेले नसल्याने नंतरची संतापजनक अवस्था आली नसावी.

म्हणून म्हणतो आमचा अनुभवच तोकडा असावा.

बाकी नात्यातले विश्लेषण झकास

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2009 - 12:14 am | प्रभाकर पेठकर

पती-पत्नीच नाही, कुठलही नातं टिकवायला, तजेलदार राखायला, त्याचा बहर अनुभवायला प्रयत्न करावे लागतात. जसे कुठलेही रोपटे वाढवताना त्याला खत-पाणी, सूर्य प्रकाश आवश्यक असतो, त्या रोपट्याची योग्य अशी निगा राखावी लागते तसे, नाती टिकवायलाही सतत मेहनत घ्यावी लागते. एक दूसर्‍याला गृहीत धरण्याची सवय सोडावी लागते. सतत संवाद असावा लागतो.
नैसर्गिक रित्या कमी होत जाते ती शारीरिक ओढ. (अतिपरिचयात अवज्ञा! ) नाते टिकवण्यासाठी दोघांनीही मेहनत घेतली तर वाढत्या वया बरोबर नाते जास्त दृढ होत जाते. ह्यात दोघांचीही मेहनत महत्त्वाची आहे.

रेझर रेमॉन's picture

26 Jan 2009 - 3:29 pm | रेझर रेमॉन

सुंदर शब्दात मांडलेत.
नाते जोडणे सोपे असले तरी टिकवणे महा कठीण...
आज- काल घरात चार-पाच फोन... पण डायल नेहमी समोरच्या माणसाने फिरवावी ही इच्छा. मुळात संबंध का ठेवायचा...
मटिरीआलिस्टिक गेन्स नसतील तर संबंधांना का टिकवायचं?
जोडीदार म्हणजे गरज. तो/ती आहेच.... टेकन फॉर ग्रान्टेड मध्ये सगळंच आलं
-रेझर

चित्रा's picture

26 Jan 2009 - 12:40 am | चित्रा

कुठच्याही नात्याबाबतीत 'सामान्य' स्थितीत हा सल्ला ठीक आहे. पण हा सल्ला प्रत्यक्षात आणणे कधीकधी कठीण जात असावे. सेमिनारमध्ये येऊन, जीवनसाथीला बाजूला बसवून असा प्रश्न विचारणे यातच नात्याची स्थिती तेवढीशी ठीक राहिलेली नाही याची जाणीव व्हावी.

प्रत्यक्षात आणणे कठीण जाण्याचे एक उदाहरण द्यायचे तर प्रत्येक नात्यात असताना त्यातील व्यक्तींची शारिरीक/मानसिक वाढ होत असते. काहींची वाढ वेगळ्या गतीने होते, कधी वेगळ्या मार्गाने होते. "कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे" जोवर पतीपत्नी किंवा इतर कोणी नातलग/मित्र एकमेकांच्या साधारण बरोबरीने "वाढतात" (मनाने) तोवर अशी छोटी अंतरे पार करणे शक्य असते. जर तसे होत नसले तर मात्र असे नातेसंबंध कठीण होत असावेत, नाही का?

पण मुद्दा चांगला आहे.

कलंत्री's picture

26 Jan 2009 - 7:50 pm | कलंत्री

माणसाचे मन आपापल्या परीने काळाबरोबर फुलत असते. अनेक वेळेस आपले मित्र, सहचर, भाऊ-बहिण यांची मात्र कोठेतरी वाढ खुंटलेली असते. ( किंवा उलटही).

त्यातही स्त्री-पुरुष या संबंधात नको तितके गुंतागुंत आहे. एक धागा समजण्याचा / उलगडण्याचा प्रयत्न केला तर दुसरा मोठा गोंधळाचा धागा निर्माण झाला असतो.

माझ्यामते मनाची वाढ होत असते, ते फुलत असते हे मान्य केले तर इतरांनी सांगितलेल्याप्रमाणे संवाद हाच या सर्व दुरावा कमी करण्याचा रामबाण उपाय असतो.

माझ्यामते यासाठी आपल्याला विरुद्धलिंगाची एकतरी व्यक्ति योग्य काळात जोडता आली पाहिजे आणि आपले संबंध मनाच्या पातळीवरच प्रस्थापित करता आले पाहिजे, ( नाहीतर अजून गुंतागुंत वाढणार).

सखाराम_गटणे™'s picture

26 Jan 2009 - 8:04 pm | सखाराम_गटणे™

त्यातही स्त्री-पुरुष या संबंधात नको तितके गुंतागुंत आहे. एक धागा समजण्याचा / उलगडण्याचा प्रयत्न केला तर दुसरा मोठा गोंधळाचा धागा निर्माण झाला असतो.
बरोबर, ही गुंतागुत आहे कारण असे नाते प्रत्येकाच्या जीवनात एकच असते. मैत्रीचे नाते कितीही जनांशी असु शकते. आणि एका मित्र नात्याला रिप्लेसमेंट (अगदी सारखी नसली तरी जवळपास सारखीच) मिळु शकते. आजकालच्या जोडप्यांमध्ये नसलेला संवाद हेच खरे वादाचे मुळ आहे, एकमेकांबरोबर वेळ घालवण्या एवजी आंतरजालावर वेळ घालवण्याचे प्रमाण वाढते आहे. प्रेमात भांडणे होतातच, ती मिटेपर्यंत वाट पहाणे सगळ्यांना जमते असे थोडीच आहे.