...मी आहे.

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जे न देखे रवी...
24 Jan 2009 - 1:38 pm

...मी आहे.

तू घेतलेला प्रत्येक श्वास,
तू सोडलेल्या प्रत्येक
प्र:श्वासाला सांगेल ... मी आहे.

तुझ्या जीवनात आलेले
मोजके सुखाचे क्षण, तुझ्या
प्रत्येक दु:खद क्षणाला
सांगतील ... मी आहे.

मधुबनातून मरुभुमीकडे
वाहणार वारा, तुझ्या
थकलेल्या मनाला सांगेल ... मी आहे.

तृशार्त वाटसरुला क्रुतार्थ करणारी
आणि सागराकडे धावणारी
नदी तुला सांगेल ... मी आहे.

काट्यांवर चालून घायाळ
झालेल्या तुझ्या पायांना
काटेरी सिंहासनावर पहुडलेले
गुलाब तुला सांगेल ... मी आहे.

कविताविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

24 Jan 2009 - 1:54 pm | अवलिया

तुझ्या जीवनात आलेले
मोजके नेटचे क्षण,
प्रत्येक येत्या क्षणाला
सांगतील ... कविता तयार आहे.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

अंकुश चव्हाण's picture

24 Jan 2009 - 2:05 pm | अंकुश चव्हाण

या कविता मी आताच नाही लिहिलेल्या. पुर्वीच लिहिल्या होत्या. आत फक्त त्या कागदावरुन संगणाकावर आणल्या एवढेच.

अंकुश चव्हाण's picture

24 Jan 2009 - 2:07 pm | अंकुश चव्हाण

तुमच्यासारखी कार्यालयीन वेळेमधे खाजगी काम करण्याची मला सवय नाही त्यामुळे घरी असलो की खाजगी नेट जोडणीचा उपयोग करतो.

अवलिया's picture

24 Jan 2009 - 2:16 pm | अवलिया

अहो मी बेकार आहे. त्यामुळे कार्यालय म्हणजे काय ? इथपासुन सुरवात.
तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा..कविता टायपिंग करुन देईन

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

24 Jan 2009 - 2:27 pm | दशानन

व्यक्तीगत हल्ले करु नका येथे.. आपापल्या खरड वही अथवा खरड फलकाचा वापर करा, तसा तुम्हाला अथवा चव्हाण साहेबांना सागण्याचा मला काहीच हक्क नाही आहे पण एक सामान्य मिपाकर ह्या नात्याने सुचना दिली आहे... मनावर घेतले तर उत्तम होईल !

धन्यवाद.

अवलिया's picture

24 Jan 2009 - 2:29 pm | अवलिया

हे तुम्ही मला खव मधे कळवु शकला असता. असो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी