श्री समीरसूर ह्यांचे 'सत्य' म ला उलगडले ( http://www.misalpav.com/node/5443 ) हे काव्य वाचले आणि आम्हाला पण काहीतरी खरडायची खुम खुमी आली
.
आणखी एक भोंडला
पोलीस कोठडीत असलेले श्री राजु आणि त्यांच्या सहकार्यानी नुकताच एक बेमौसमी भोंडल्याचा कार्यक्रम केला. त्यातलेच काही निवडक भोंडले ....)
.
ऐलमा पैलमा एनरॉन देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझी लाज टांगली वेशीच्या दारी शरम बसलीये फाट्यावरी
.
घडव घडव रे 'राजु'कल्या
ताळेबंद घडव रे साजुकला
.
एक डाव वाचव रे ऑडीटरा
देइन तुला सोन्याचा हारा
.
एक राजु आणु बाई दोन राजु आणु
दोन राजु आणु बाई तीन राजु आणु
तीन राजु आणु बाई चाए राजु आणु
चार राजु आणु बाई पाच राजु आणु
रामा लिंगमाचा शेणोठा
डुबवी सत्यम मेटासा
.
छु बाई छु लब्बाडी फुल
ताळेबंदातून नफ्फाच गुल
.
रोखे विकतो भाव गळतो
तेलगु लोफर झोल खेळतो
.
झीम पोरी झीम कप्पाळाच बिंग
बिंग गेल फुटून राजु आला सुटुन
.
(चु भू द्या घ्या )
.
थोडीशी जाहीरात बाजी अगदी नक्कोशी वाटत असली तरीही : ह्या आधीची भोंडल्याची गाणी तुम्हाला खालील दुव्यावर वाचता येतील
http://www.misalpav.com/node/4366
प्रतिक्रिया
23 Jan 2009 - 1:36 am | विसोबा खेचर
एक राजु आणु बाई दोन राजु आणु
दोन राजु आणु बाई तीन राजु आणु
तीन राजु आणु बाई चाए राजु आणु
चार राजु आणु बाई पाच राजु आणु
मस्त! :)
23 Jan 2009 - 11:48 pm | मूखदूर्बळ
धन्यवाद तात्या आणि सचिन :)
23 Jan 2009 - 9:34 pm | सचिन
रोखे विकतो भाव गळतो
तेलगु लोफर झोल खेळतो
-- हे विशेष आवडले..!