(ठुमरी)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
22 Jan 2009 - 1:53 pm

पुलस्तिंची सुरेख  ठुमरी ऐकली आणि आमच्या लेखणीने पुन्हा ठेका धरलाउधार देण्या मित्र कुणीही उरला जिगरी नाहीपूर्वी होती येथे आता ती ही टपरी नाही'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलोशोधत आहे अंगावर जी  जागा दुखरी नाहीमास्तर म्हणती चविष्ट आहे हे  प्रौढांचे शिक्षण'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाहीनवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदाचौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाहीगाणे  अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचेख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाहीकिती "केशवा"पाडशील तू सुमार कविता आतालिहावेस तू अशी कुणाची ही बळजबरी नाहीकेशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

झेल्या's picture

22 Jan 2009 - 2:10 pm | झेल्या

धन्य धन्य ती विडंबने अन धन्य सुमारी तुमची
कविता ही ही उत्तम आहे, ट-ट री-री (किंवा 'मुळीच टपरी') नाही... :)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

राघव's picture

22 Jan 2009 - 3:07 pm | राघव

च्यायला... यांची लेखणी कशी चालेल काय सांगता नाय यायचे ब्वॉ!

ख्याल असो वा ठुमरी , त्यांना चढतो साज सुमारी
केश्या तुझ्या फटकार्‍यांना बंध कशाचा उरला नाही!!

ह. घ्या. :)

मुमुक्षु

मैत्र's picture

22 Jan 2009 - 3:38 pm | मैत्र

तुमच्या प्रतिभेला दंडवत.
नेहमीच अतिशय चपखल शब्दयोजना आणि अचूक काफिया.

चतुरंग's picture

22 Jan 2009 - 7:10 pm | चतुरंग

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही

मास्तर म्हणती चविष्ट आहे हे प्रौढांचे शिक्षण
'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही

एकदम झक्कास! फार हसलो!! :)

चतुरंग

लिखाळ's picture

22 Jan 2009 - 7:54 pm | लिखाळ

वा वा .. टपरी आणि शाळा छपरी आवडले :)
मजा आली.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सुहास..सदेव हसनार्..'s picture

22 Jan 2009 - 8:01 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही

पाय कुठायत आपले...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2009 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी विडंबन, आता थांबू नका ! :)

प्राजु's picture

22 Jan 2009 - 8:25 pm | प्राजु

मस्त.. सकाळी आल्या आल्या हे वाचलं आणि मजा आली.
जबरदस्त.
गुरूजी... आपण धन्य आहात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 10:47 pm | विसोबा खेचर

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही

गाणे अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचे
ख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाही

मस्त रे केशवा! :)

आपला,
(चौपाटीवरचा फुगेवाला) तात्या.

सर्वसाक्षी's picture

22 Jan 2009 - 11:03 pm | सर्वसाक्षी

केशवशेठ

पुन्हा रंगात आलात, बरे वाटले.

मुक्तसुनीत's picture

22 Jan 2009 - 11:04 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो !
मजा येते आहे !

बेसनलाडू's picture

23 Jan 2009 - 12:08 am | बेसनलाडू

वर्जिनल ठुमरीतील दुखरी जागा येथेही छान घेतली गेली आहे. आवडली.
(कानसेन)बेसनलाडू

केशवसुमार's picture

23 Jan 2009 - 12:02 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार