तुला कापते रे तुला कापते

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
21 Jan 2009 - 4:42 pm

(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न )

तुला कापते रे तुला कापते
तुझी पर्स माझ्या मनी राहते
जरी साधीभोळी तुला कापते

तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे
तुझ्या मिळकतीने मनी खर्च जागे
तुझ्या कार्डने मी मॉल नाहते

किती भाग्य थोर ह्या साधेपणीही
दिसे वस्तू निद्रेत जागेपणीही
उगी का वाण्याचे बील वाढते

कधी बोका पाहतो का बडग्याला
पती न्याहळी का कधी शेजारणीला
लाटणे घेऊनी मी सदा राहते
(चू भू द्या घ्या )

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

21 Jan 2009 - 4:53 pm | दशानन

तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे
तुझ्या नोकरीने मनी खर्च जागे
तुझ्या कार्डने मी मॉल नाहते

=))

जबरा !

केवळ_विशेष's picture

21 Jan 2009 - 5:12 pm | केवळ_विशेष

:)

अवलिया's picture

21 Jan 2009 - 8:07 pm | अवलिया
संदीप चित्रे's picture

21 Jan 2009 - 8:28 pm | संदीप चित्रे

विडंबन आवडले.... :)
एकच सूचना.
>> तुझ्या कार्डने मी मॉल नाहते
ही ओळ थोडी बदलली तर जास्त परिणामकारक होईल..... 'मॉल नाहते' तितकंसं नीट पोचत नाहीये.

मूखदूर्बळ's picture

22 Jan 2009 - 9:12 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगलं आहे पण 'पुरूषाची पर्स' जरा विचित्र वाटत आहे. त्याऐवजी वॉलट, पाकीट, खिसा योग्य वाटेल. आता ते मीटरमधे बसतं का नाही हा माझा प्रश्न नाही. "आमी काय कवी नाय!"

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मूखदूर्बळ's picture

22 Jan 2009 - 11:10 am | मूखदूर्बळ

सुचने बद्दल धन्यवाद अदिती आणि संदीप :)

अनिल हटेला's picture

22 Jan 2009 - 11:40 am | अनिल हटेला

पती न्याहळी का कधी शेजारणीला
लाटणे घेऊनी मी सदा राहते

=)) सही !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रसाद कोपरकर's picture

22 Jan 2009 - 12:07 pm | प्रसाद कोपरकर

O:) जगाच्या पाठीवर मधील श्रवणीय गीत आहे पडद्यावर कारुण्यरस निर्माण करते. विडम्बन देखील तीतकेच सुन्दरrong> :H

दिपक's picture

22 Jan 2009 - 12:15 pm | दिपक

विंबंल्डन आवडले :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विंबंल्डन का विडंबन?

(टॅगही बंद करत आहे.)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दिपक's picture

22 Jan 2009 - 2:32 pm | दिपक

काही नाही विडंबन चे विंबंल्डन केले.

मूखदूर्बळ's picture

22 Jan 2009 - 7:58 pm | मूखदूर्बळ

परतीचा धन्यवाद :)
हे सगळ ठळक का दिसतय ?
बोल्ड टॅग बंद नाही झालय का ? :(

इनोबा म्हणे's picture

22 Jan 2009 - 1:29 pm | इनोबा म्हणे

विडंबन :) लगे रहो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर