सत्याचे प्रयोग

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
21 Jan 2009 - 2:00 pm

तुला मैत्रीणी किती रे? तात्यानी माझ्या चिरंजिवाना प्रश्न विचारला. त्याने काय उत्तर दिले ते कळाले नाही. कारण 'बिस्किट आंबाड्यांचा" ताजा घाणा आणायला किचन मधुन हाक आली होती.
वैधानिक इशारा: 'सत्याचे प्रयोग' व्यावसायिक्(प्रोफेशनल) ट्रेनिंग असल्याशिवाय करु नयेत. अनुभव नसेल तर 'त्वांड फुटते'. हा इशारा डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. च्या पैलवानांच्या इशार्-याच्या धर्तीवर वाचावा.
वरील प्रष्न तात्यानी माझ्या घरी अचानक ठरलेल्या 'अल्पोपहार कट्टा' वर विचारला. त्याचे उत्तर त्याने काय दिले हे परत विचारणे मला बरोबर वाटले नाही. गरज पण वाटली नाही. आता त्याच्या प्रश्नांची उत्तरे मी कशाला संभाळू? त्याचा मुखत्यार तो. हा प्रश्न आमच्या कुटंबाच्या कानावर पण गेला होता.
दुस-या दिवशी चिरंजीव कॉलेजला गेल्यावर ब्रेकफास्ट देताना 'तुम्हाला मैत्रीणी किती होत्या हो' हा प्रश्न पुरीचा घास तोंडात असताना अचानक बायकोने विचारला. 'खिंडीत पकडणे' ह्यालाच म्हणतात. कुठल्याही प्रकाराचा ठसका लागणे घातक हो अशावेळी. मी चेहेरा निर्विकार (पोकर फेस) ठेवुन 'म्हणजे काय' असा प्रतिप्रश्न केला. ' जरा भाजी दे थोडीशी' असे म्हटल्यामुळे जरा वेळ मिळाला विचार करायला.
"तु कुठल्या मैत्रिणींबद्दल विचारते आहेस शाळेतल्या का नंतरच्या" असा 'अनेकवचनी' उत्तराला ती गोंधळली. तेवढाच अजुन वेळ मिळाला. 'एवढ्या होत्या का' -थोडा विचार करुन आलेला प्रश्न.
मग मी सविस्तर उत्तर दिले.
शाळा: ९ ते ११ वी साधारण ५ मैत्रीणी होत्या. पण त्यांतली मला एकच चार फुटावरुन आवडायची(सेफ्टी फर्स्ट). तुझा चेहेरा आणि अंगलोट तिच्याशी मिळती जुळती आहे. बाकी चार जणींना मी आवडायचो हे मला ११ वी नंतर कळाले मित्रांकडून. त्यातल्या एकीने तर हे कन्फर्मेशन ठाणे प्लॅट्फॉर्म नंबर १ वर १५ वर्षाने दिले.
कॉलेजः आता शाळेत एवढ्या तर कॉलेज मधे किती गोंधळ असेल असा विचार करु नकोस. शाळेतल्या इन्फॅचुएशन्ला फारसा अर्थ नव्हता. कॉलेजमधली वर्ष अगदी निरस होती. दोन पँट दोन शर्ट वर वर्ष जायचे. वैनीने दिलेल्या ५ चपात्या (प्लॅस्टीक मधे गूंडाळलेल्या )कॅटीनमधे बसुन मित्रांनी मागवलेल्या वडा सांबारात थोडासा सांबार व चटणीला लावुन काढली. मैत्रीणी परवडण्यासारख्या नव्हत्या. किती खर्चीक काम असते ते. (चेहे-यावर समाधान)
जॉब लागल्यावर : मी तसे कधीही कोणावरही प्रेम केले नाही. हे का ते मला माहित नाही. कमावता झाल्यावर साधारण ५ जणीनी 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे एक फुटावरुन सांगितले होते. ह्या प्रेमापासुन सुटका करुन घेण्याकरता मी त्यांना गणपतीला घरी बोलवत असे. गणपतीला घरातली उठबस्,पंक्त्या बघुन सर्वांचे प्रेम अगदी स्पिरीट प्रमाणे उडाले. नंतर नुसतीच बोलाचाली, अंतर राखुन.
पण हॉस्पिटलमधील काळाचे काय?- तिथे तर सर्व नंदनवनच असणार्- बायको
अग, माझा साहेब 'कर्दनकाळ' होता.कामावर लागलेल्या पहिल्या दिवशीच अगदी गवळणींसमोर मला दम दिला होता. ' इथे कुठे नजर (दृष्टी) वा़कडी केलीस तर दोरीने आवळुन पंख्याला लटकवीन्.(इथे नेमके कुठला अवयव ते सांगणे प्रशस्त होणार नाही. पण गळा नक्कीच नाही.) त्या भितीने तसा काही प्रसंग आला नाहीच. ( इथे साहेबांबद्द्लचा आदर द्विगुणीत) आणि तु ते 'दिल मिल गये ' सिरीयल वर हॉस्पिटल लाईफ बद्दल काहीही नि:श्कर्ष काढु नकोस. तीथे श्वास घ्यायला फुरसत नसायची प्रेम कसले करताय. थोडक्यात मी 'सर्टिफाईड वर्जीन' ह्या अवस्थेत तुझ्याशी लग्न केले आहे. बायकोचे एकंदरीत समाधान झालेले दिसले आणि मी सुस्कारा सोडला.
जाता जाता: कामावर जाण्यासाठी पायात बुट घातले आणि बायको प्रश्नाळली. "काय हो, मग लग्नाआधी सुद्धा लग्न झालेल्यांना तुम्ही सल्ला द्यायचा असे माझ्या जावा मला सांगतात. तेंव्हा तुम्हाला प्रॅक्टीकल चे एवढे ज्ञान कसे?
'आता मला उशीर होतो आहे , नंतर बोलीन " असे म्हणुन सुटका करुन घेतली.
आता ह्या चक्रव्युहातुन सुटायचे कसे.? ५ हा माझा खरेच भाग्यांक आहेका? का घातांक. दुपारी १४ वाजता उत्तर द्यावे काय (परत ५)

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

21 Jan 2009 - 2:07 pm | दशानन

>>>>तेंव्हा तुम्हाला प्रॅक्टीकल चे एवढे ज्ञान कसे?

=))

गोची !!!

पोपट झाला !

***

खरे खरे सांगुन!

तुमच्यासारख्या झंटलमनला इतके शिंमल माहीत नाही व्हय?

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jan 2009 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुन्हेगार आणि वकील जेव्हा बोलतात तेव्हा म्हणे वकील गुन्हेगाराला सांगतो, "जे काही झालं असेल ते खरं खरं सांग मला. कोर्टात मला अडचणीत आणलंस तर मी तुझी काहीही मदत करू शकणार नाही."

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अवलिया's picture

21 Jan 2009 - 2:24 pm | अवलिया

कधी कधी प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा प्रश्नालाच प्रश्न विचारत जा.
कदाचित समस्या सुटेल किंवा रहाणार नाही.
आता प्रश्न काय विचारायचे हे तुम्हाला काय सांगणार.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

सहज's picture

21 Jan 2009 - 2:26 pm | सहज

नाना नकोच ती भानगड

नव्या प्रश्नातुन नवीन समस्या उभी राहील तर ;-)

वैधानिक इशारा: तात्याला घरी बोलावु नका, गोत्यात याल! त्याच्याकडे काय साबण-पाणी-फेस भरपुर आहे

दशानन's picture

21 Jan 2009 - 2:27 pm | दशानन

>>>वैधानिक इशारा

=))

सहजराव लई जोरात !

अवलिया's picture

21 Jan 2009 - 2:29 pm | अवलिया

पण प्रश्न आपला असल्याने समस्या समोरच्याला.... :)

(काडीलावु) अवलिया

अवलियाची अनुदिनी

माझा Boss अगदी असाच वागतो त्याला काही विचारले तर तो आम्हालाच उलट प्रश्नांची घणाघाती गोळाबारी चालु करतो कि असे वाट्ते की उत्तरांची भिक नको पण कुत्रा आवर कुठुन अवद्सा आठ्वली अन याला विचारलं उत्तर कधीच मिळत नाही कारण त्याला उत्तर माहीत नसते ;-) मग झाले २/३ तास खराब :-(
~ वाहीदा

अवलिया's picture

21 Jan 2009 - 2:45 pm | अवलिया

उत्तर कधीच मिळत नाही काका !
काका? बर बर ... आज्जी वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

21 Jan 2009 - 2:46 pm | विनायक प्रभू

अहो तै, बरोबर उत्तर नाही दिले तर माझ्या जेवणाबिवणाचे वांधे होतील आणि तुम्हाला तुमचा बॉस आठवतो. बघा काहीतरी योग्य मार्ग दाखवा.

अवलिया's picture

21 Jan 2009 - 2:48 pm | अवलिया

घ्या.. म्हणजे तुम्हाला अजुन मार्गच माहित नाही. आणि चालले समुपदेशन करायला...
ह्या तेजीच्या ****, कोणी काहीही धंदा चालु करतो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

सर्किट's picture

21 Jan 2009 - 2:36 pm | सर्किट (not verified)

भाग्यांक का घातांक ते तुम्ही ठरवा:

पण उत्तर खरे खरे द्या.

उदा: "मैत्रिणी अनेक होत्या, तरी देखील तुझ्याशी लग्न केले ह्यावरून काय ते ठरव. प्रॅक्टिकलचे म्हणशील तर त्यासाठी खास बनवलेले सिनेमे असतात."

क्रिप्टिकच बोलायचे असेल, तर "त्यासाठी हिरण्यकश्यपू असतात" असे देखील म्हणता येईल.

(स्वगतः च्यामारी स्मुपदेशनाच्या मास्तरला यवढी शिंपल गोष्ट कळू नये ? मास्तर बदलावा म्हणतो. सहजराव, वेळ आहे का तुम्हाला थोडा ?)

-- सर्किट

विनायक प्रभू's picture

21 Jan 2009 - 3:32 pm | विनायक प्रभू

अहो सर्किटराव,
१९७५ मधे'स्टडी मटेरियल' सिनेमा स्वरुपात 'सहज' उपलब्ध नव्हते असे बोलुन बसलोय ना. म्हणजे तो मार्ग पण बंद.

सहज's picture

21 Jan 2009 - 3:33 pm | सहज

पीपिंग टॉम होतो ही कबुली द्या!

सखाराम_गटणे™'s picture

21 Jan 2009 - 3:34 pm | सखाराम_गटणे™

स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्याने

सर्किट's picture

21 Jan 2009 - 3:38 pm | सर्किट (not verified)

आदरणीय सहज राव,

अहो, असे पीपिंग म्हणजे हल्ली गुन्हा झालाय हो !!!!

अर्थात प्रभू पुढे कसले कायदे आणि कसले गुन्हे ? काय ?

-- सर्किट

सहज's picture

21 Jan 2009 - 3:44 pm | सहज

मर्डर केला ह्या कबुलीपेक्षा दगड फेकला असा गुन्हा कबुल केला तर शिक्षा कमी होते ना....

सर्किट's picture

21 Jan 2009 - 3:46 pm | सर्किट (not verified)

अगदी बरोबर !

(आमची समुपदेशनाच्या नवीन मास्तरची निवड अगदी योग्य आहे, हे आम्हाला, - आणि इतरांनाही - पटले असेल.)

-- सर्किट

दशानन's picture

21 Jan 2009 - 3:46 pm | दशानन

वारसदार मिळाला.

सखाराम_गटणे™'s picture

21 Jan 2009 - 3:33 pm | सखाराम_गटणे™

सचित्र पुस्तके?????

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सर्किट's picture

21 Jan 2009 - 3:35 pm | सर्किट (not verified)

स्वारी !!!!

इतिहास तज्ञ असल्याने जरा संशोधन केले. १९७५ मध्ये मुंबई/ठाणे/डोंबिवली परिसरात हिरण्यकश्यपू सहज उपलब्ध होते, असे कळते. (आम्ही तेव्हा अंमळ लहान होतो, परंतु, तरीही आमचे वरिष्ठ हे मोठे होते, ही एक आश्चर्याची बाब आहे.)

-- सर्किट

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2009 - 3:29 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर तुम्ही एक बेसिक प्रिन्सिपल विसरलात.

"ट्रुथ इज व्हेरी व्हॅल्युएबल, बी इकॉनॉमिकल विथ इट"
"सत्य अमूल्य आहे, त्याचा जपून वापर करा"

पहिल्याच प्रश्नात नको ते बोलून बसलात. तिथे सत्याचा वापर जपून केला असतात तर? असो. आता असे सांगू शकता की माझे सगळे ज्ञान पुस्तकीच होते पण खोटा आव आणून सल्ले द्यायचो. ;)

बिपिन कार्यकर्ते

सर्किट's picture

21 Jan 2009 - 3:44 pm | सर्किट (not verified)

प्रभुदेवा,

एक प्रश्न तुम्हाला सांगून ठेवतो, योग्यवेळ असताना (म्हणजे तुम्हाला माहितीये, म्हणजे इतर कुठलीही अपेक्षा नसताना) विचारा:

"ह्या सत्याच्या प्रयोगातला 'सत्या' आहे कुठे, भ*वा ? बघून घेतो आता त्याला".

सगळे सुरळीत होईल. काळजी नसावी.

-- सर्किट

शंकरराव's picture

21 Jan 2009 - 3:49 pm | शंकरराव

मास्तर
लग्नाआधी सुद्धा लग्न झालेल्यांना तुम्ही फक्त सल्ला दिला असेल तर
बिपिन भौ म्हणतात त्या प्रमाणे (ज्ञान पुस्तकीच होते पण खोटा आव आणून सल्ले द्यायचो) .. वेळ मारुन नेता येईल..
पण जर नुसता सल्ला न देता प्रॅक्टीकल सुद्धा ... हे सत्य असेल तर ..
युद्धाचे भोंगे वाजतील, मग तुम्हा दोघांसाठी समुपदेशक शोधावा लागेल.

सर्किट's picture

21 Jan 2009 - 3:52 pm | सर्किट (not verified)

युद्धाचे भोंगे वाजतील, मग तुम्हा दोघांसाठी समुपदेशक शोधावा लागेल.

हा हा हा ! असा समुपदेशक "सहज" सापडेल !!!

-- सर्किट

ब्रिटिश's picture

21 Jan 2009 - 3:58 pm | ब्रिटिश

>>>"काय हो, मग लग्नाआधी सुद्धा लग्न झालेल्यांना तुम्ही सल्ला द्यायचा असे माझ्या जावा मला सांगतात. तेंव्हा तुम्हाला प्रॅक्टीकल चे एवढे ज्ञान कसे?"
ओ काकू , ईतक्या वर्सांनी ईचारताय व्हय !
ओ मास्तर तूमचे हात तीनच म्हैने फ्रॅक्चर होत ना वो
आन तूमी ऊत्तर द्याया लाजताय ?

डोक फोरुन झे र बाला !
...
गळा दोरीने आवळुन पंख्याला लटकवीन्.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विनायक प्रभू's picture

21 Jan 2009 - 3:58 pm | विनायक प्रभू

टनेल थिअरी वापरावी असे अनेक सल्ल्यावरुन निश्कर्श काढला.

अवलिया's picture

21 Jan 2009 - 4:02 pm | अवलिया

आता शिर्षक बदला... माझे टनेलचे प्रयोग

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

21 Jan 2009 - 4:04 pm | दशानन

टनेल थिअरी म्हणजे काय ओ :?

अवलिया's picture

21 Jan 2009 - 4:06 pm | अवलिया

घ्या... यांना अजुन टनेल माहीत नाहि....
सहज राव घ्या हा विद्यार्थी.... ह्याला पास करा मग अजुन देवु...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

21 Jan 2009 - 7:42 pm | विनायक प्रभू

कार्ट्या तुला टनेल थिअरी माहित नाही? सर्व बोगद्याच्या अख्रेरीस प्रकाश असतो ह्यावर विश्वास असणे ह्याला टनेल थिअरी म्हणतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jan 2009 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला उगाच थर्ड इयरमधलं काहीतरी अल्फा पार्टीकल वगैरे आठवलं.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

घाटावरचे भट's picture

21 Jan 2009 - 10:29 pm | घाटावरचे भट

हाव ना....मी पण क्वांटम टनेलिंग वगैरे विचार केला आणि बुचकळ्यात पडलो.

आनंदयात्री's picture

21 Jan 2009 - 11:21 pm | आनंदयात्री

मी आपला टनेलचे दोन्ही तोंडाकडुन सुरु होणारा रस्ता .. वैगेरे वैगेरे विचार करत बसलो !!

अवलिया's picture

21 Jan 2009 - 11:24 pm | अवलिया

असा उदाहरणार्थ विचार वगैरे न करता सरळ उदाहरणार्थ व्यनी वगैरे करत जा की आंदु शेठ...
उदाहरणार्थ मला वगैरे नाही ते प्रभु वगैरे यांना हो...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

21 Jan 2009 - 10:20 pm | लिखाळ

अशी साहित्यिक थेअरी होय ! मी उगीच टनेलचे भलते अर्थ काढत बसलो :)
पण बोगद्याच्या शेवटी प्रकाश म्हटल्यावर बरोबर काय ते उमगले :)
-- लिखाळ.

छोटा डॉन's picture

21 Jan 2009 - 4:58 pm | छोटा डॉन

प्रभुमास्तरांचे "असले ( कोण आहे रे तो "तसले " म्हणणारा, गारदी लेकाचा ! )" धागे वाचुन ज्याम फर्स्ट्रेशन येते बॉ ...

नाही नाही, त्याचा मैत्रिणींशी व त्यांच्या संख्येशी संबंध नाही.
कोण काय "क्रिप्टीक" बोलतो आहे ते *ट कळत नाही ..!
टनेल काय, हिरण्यकश्यपु काय किंवा पीपिंग टॉम काय , अजिब्बात समजत नाही ( असे नुसते म्हणायचे).

बाकी चालु द्यात, अंमळ मजा येते आहे "वरिष्ठांच्या मुलभुत प्रश्नांवर" चर्चा वाचुन ...!

------
छोटा डॉन

माझे सगळे ज्ञान पुस्तकीच होते पण खोटा आव आणून सल्ले द्यायचो.
सहमत

सर्वसाक्षी's picture

21 Jan 2009 - 10:57 pm | सर्वसाक्षी

बायका विचारतात त्याना विचारु द्या. तसेही त्यांचे समाधान कुठल्याही उत्तराने होत नसते. थोडक्यात काय तर बायको म्हणजे विरोधी पक्ष! ते खिंडीत गाठणारच. जमेल तेव्हा निसटायचं नी सपडलं की मांडवली करायची.

प्राजु's picture

22 Jan 2009 - 12:30 am | प्राजु

अनुभवाचे बोल आहेत का? हच. घ्या. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

22 Jan 2009 - 12:27 am | संदीप चित्रे

>> गणपतीला घरातली उठबस्,पंक्त्या बघुन सर्वांचे प्रेम अगदी स्पिरीट प्रमाणे उडाले

कस्सला फसकन हसलोय सर :)

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 8:26 am | विसोबा खेचर

प्रभूदेवा,

आपल्या मैत्रिणींबद्दल अधिक विस्ताराने येऊ द्या! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 10:12 am | विनायक प्रभू

मी आपला सुटायला बघतो आहे. आणि तुम्ही म्हणता........................................................
डायरेक्ट फोटो आणि हार बर का तात्या.

दशानन's picture

22 Jan 2009 - 10:32 am | दशानन

=))

अजुन असे एक-दोन दोस्त जमा झाले की फोटो-हार काय... पेपरातपण बातमी येईल !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, काकू मराठी वाचतील याची किती शक्यता? :?
नाही म्हणजे जरी तो फिजिक्समधला टनलिंग इफेक्ट विचारात घेतला तरीही??

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 12:17 pm | विनायक प्रभू

काकुने मराठी वाचण्याची शक्यता=११ नंबरच्या बॅट्स्मन ने मारलेली सेंचुरी.
म्हणुन तर म्हटले आहे सेफ्टी फर्स्ट.

सहज's picture

22 Jan 2009 - 12:20 pm | सहज

हा तुम्ही स्व:ता सोय करत असाल तर गोष्ट वेगळी. पण काकू काय तुम्हाला "सोडायच्या" नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून फोटो, हारचा धोका नाही. रोज रोज बदला घ्यायचे सुख कोणी कशाला सोडेल? तशी काळजी नका करु.. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 12:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

मग लिवा इथे बिन्धास्त! कोणी घरी जाऊन काही बोललं की सांगा तुम्ही फिक्शन लिहिता म्हणून! लेखातच तसं डिस्क्लेमर टाकलं की काम झालं.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

रामदास's picture

22 Jan 2009 - 10:52 am | रामदास

सट्ट्याचे प्रयोग जास्त बरे....