एक कथा - २ !!!!

चेतन१२३प's picture
चेतन१२३प in जनातलं, मनातलं
18 Jan 2009 - 10:28 pm

गूड मॉर्निंग! सर्वप्रथम तुरीनाच्या विनंतीला मान देत आपण येथे आलात त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!! त्यानंतर तुरीनाच्या रेकॉर्ड ब्रेकिंग लिस्टिंगसाठी सर्व इन्वेस्टर्संना हार्दिक शुभेच्छा. तुरीना कन्स्ट्रक्शन्सच्या अतिव महत्वाकांक्षेचे उदाहरण म्हणजे "पॅराडेसिया". जसे की मी आइ पी ओ रिलिझींगच्या प्रेस कॉन्फ़रंस मध्ये बोललो होतो, हा आइ पी ओ "पॅराडेसिया" या तुरिनाच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी निर्माण झाला आहे. पॅराडेसिया हि केवळ एक संकल्पना केवळ एक स्वप्न नसुन ते या संपुर्ण देशाचे भविष्यातले वैभव आहे. हे शहर देशाच्या जगातल्या प्रतिमेला आणखी उंचावेल.
कॉन्फ़रंसमध्ये मागे बसलेल्या दोघाजणांमध्ये चुळबुळ सुरु होती. एक जण दुसयाला सांगत होता "अरे, हाच आहे तो तुषार दिक्षित,तुरिनाचा सिईओ." "याच्यामध्ये असे काय विशेष आहे? असे तर बरेच सिईओ या शहरामध्ये आहे." "विशेष काय आहे हे तर माहित नाही, पण बिझीनेस वर्ल्ड मध्ये याच्या नावाचा हल्ली फ़ार दरारा असल्याचे मी ऐकले आहे. याने केवळ सहा वर्षामध्ये तुरिना होटेल लिंक्सला पहिल्या क्रमांकावर आणले आहे. एस एन एम ग्रुपला याचाच तर धोका आहे. एस एन एम हॊटेल लिंक्स तुरिनामुळेच तर मागे पडले आहे. आता ह्याने कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु केली आहे तेंव्हा पहिला धोका एस एन एम कन्स्ट्रक्शन्सला आहे असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळेच तर एस एन एम चा शेअर मागल्या आठवड्यामध्ये घसरला होता." "पण, तो तर तुरिना- एस एन एम ची डील निष्फ़ळ ठरल्यामुळे घसरला होता.""तेच तर! तुरिना आणि एस एन एम ह्यांच्यामध्ये पॅराडेसियावरुन डील होणार होती. आणि डील निष्फ़ळ ठरल्यामुळेच एस एन एम कस्ट्रक्शन्सला आता आधीप्रमाणे आऊटपरफ़ॉर्म करता येणार नाही ह्या इन्व्हेस्टरच्या भितीमुळेच तर तो शेअर घसरला. ज्याप्रमाणे तुरिना हॉटेल्समुळे एस एन एम हॉटेल्सचा नफ़ा कमी झाला त्याप्रमाणे तुरिना कन्स्ट्रक्शन्समुळॆ एस एन एम कन्स्ट्रक्शन्सचा नफ़ा कमी होईल असे म्हणतात." "अरे मग असे होते तर एस एन एम ग्रुपने डील का नकारली. तुरिनाच्या स्पीकरने सांगीतले होते की एस एन एम ग्रुप प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड नाही. त्यांच्या अटी मान्य करणे शक्य नव्हते म्हणुन मिटींग निरर्थक ठरली.""अरे,आता तुला आतमधली गोष्ट सांगतो. मुळात एस एन एमला मिटींगला बोलावुन त्यातुन काहीच निष्पन्न न करणे हाच तर तुरिनाचा उद्देश होता. त्यामुळे दोन गोष्टी साध्य झाल्या.....एक म्हणजे तुरिनाने एस एन एमशी कुठलेही रायव्हलरी नसल्याची ग्वाही दिली. आणि दुसरा म्हणजे डील नकारल्यामूळे एस एन एम चा शेअर घसरला, त्यामुळे तुरिनाला आता विचार करण्यासाठी वेळ मिळेल. अन्यथा एस एन एम ने त्यांना डोके उचलु दिले नसते. पण, आता त्यांचेच कंबरडे मोडले असल्यामुळे त्यांच्या इन्व्हेस्टर्संचा विश्वास आधी एस एन एम मध्ये परत आणने हे त्यांचे धेय्य असेल." "अरे वा! इतके जास्त राजकारण चालवतो हा तुषार दिक्षित. म्हणुनच दरारा असणार ह्याचा.""नाही...हे राजकारण त्या भल्या माणसाचे नाही. हे तर त्याची बायको रुषाली दिक्षितने खेळले आहे. तिचा म्हणे शेअर मार्केट वर "होल्ड" आहे. ती त्यातच एक्सपर्ट आहे."

एवढ्यात, हॉलमध्ये सर्वत्र गडद अंधार झाला. आणि डायसवरच्या श्वेत पडदा रोशनाईने चमकु लागला. भविष्यातल्या "पॅराडेसियाचे" ते अनिमेशन होते. साक्षात स्वर्ग भासणारे त्या शहराचे ते दृश्य बघुन सर्वांचे डोळे दिपुन गेले.
संपुर्ण शहर एका वर्तुळाकार जमिनीच्या प्रचंड क्षेत्रफ़ळामध्ये बांधल्या जाणार होते. त्यात सर्वत्र काटकोनामध्ये रस्ते असणार होते. प्रत्येक प्रशस्त चौकाच्या मध्यभागी थुईथुई नाचणारे कारंजे लावण्यात आले होते. प्रत्येक रस्ता अगदी गुळगुळीत आणि मोठा होता आणि रस्त्याच्या दुतर्फ़ा व मध्यभागी हिरवळ लावण्यात आली होती.सर्व परिसर निसर्गरम्य बणविण्याचा प्रयत्न केल्या गेला होता.
शाळा, महाविद्यालये ह्यांना प्रचंड मोठे बाग, तलाव आणि मैदान देण्यात आले होते. शहराचा एक मोठा भाग केवळ त्यासाठीच राखीव होता. शहराचे इमारतीनुसार वर्गीकरण करण्यात आले होते. बाजारपेठेसाठी, बॅंकांसाठी, कार्यालयांसाठी वेग वेगळ्या स्वतंत्र जागा निवडल्या गेल्या होत्या. त्यानुसारच त्या त्या रस्त्यांना नावे देण्यात आली होती. कापडपेठ जेथे आहे तो क्लॉथ स्ट्रीट, बॅन्क्स आणि सिक्युरिटीज जेथे आहे तो फ़िनांन्स स्ट्रीट. त्यात रहदारी वाढु नये म्हणुन विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेल्स, मॉल्स, कॉम्प्लेक्स ह्यांची जागा वेगळी होती. छोट्या छोट्या घराप्रमाणेच मोठ्या मोठ्या इमारतीदेखील त्या शहरामध्ये होत्या. प्रत्येक कॉलनीमध्ये एक मोठे इस्पितळ सर्व अत्याधुनिक साहित्याने आणि तंत्राने युक्त उभारण्यात आले होते. ह्याशिवाय बाग, मैदान, स्विमींगपुल योगकेंद्र उभारण्यात आले होते. ड्रेनेज, डस्ट केअर ह्यांच्या स्वतंत्र प्रणाली तयार करण्यात आल्या होत्या.प्रत्येक गोष्टीचा अगदी बारीक सारीक विचार करण्यात आला होता हे तर त्या शहराकडे बघुन स्पष्टच होत होते. जास्तीत जास्त सुविधांचे केंद्रीयकरण करण्यात आले होते. प्रत्येकाला प्रत्येक सुविधा विना त्रासामध्ये मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. शहरामध्ये सुरक्षा आणि व्यक्तिस्वातंत्र्य ह्यांना विशेष महत्त्व दिल्या गेले होते. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा नाका बसविण्यात आला होता. तरुणांसाठी युथ कॉर्नर म्हणुन इशान्येकडचा परिसर देण्यात आला होता. त्यामध्ये तरुणांना हव्या असलेल्या सर्वगोष्टींची व्यवस्था देखील केल्या गेली होती. हेसगळेसुद्धा कमी म्हणुन की काय या शहरामध्ये आठ ठिकाणी एकमेकांना समांतर वेगवेगळ्या आठ वास्तु बांधण्यात आल्या होत्या. त्यांना "तुरिना मिरॅकल्स" असे संबोधण्यात आले होते. ती प्रत्येक वास्तु म्हणजे खरोखरच एक आश्चर्य होते. तुषारने "जगातल्या आश्चर्याशी ह्यांची तुलना केल्या जाईल" बोललेले वाक्य खरे भासु लागले."अहो आश्चर्यं।" असे प्रत्येकाच्या तोंडुन ते अद्भुत बघताच निघाले. प्रत्येक वास्तु विशिष्ट प्रकारच्या दगडाने बांधली गेली होती. त्यापैकी एक मिरॅकल्स तर वरुन बघता जणू पाण्याच्या थेंबांनी ती बांधली गेली असे वाटत होते.इतकेच नव्हे तर त्या पाण्यापासून तयार केलेल्या भिंतीमध्ये जलजीव फ़िरताना दिसत होते. अगदी जवळ गेल्यानंतर त्याला हाथ लावल्यानंतर हे स्पष्ट होत होते की तो एका विशिष्ट प्रकारच्या दगडाला काहीतरी मुलामा देवुन तयार केलेला परिणाम होता. त्याचे नाव "वॉटरपॅलेस" असे होते. आणखी एक मिरॅकल्सची बांधणी अगदी विचित्र स्वरुपाची होती. "मॅजिक" असे नाव असलेल्या त्यामध्ये एका ठिकाणी उभे राहिल्यास प्रत्येक आतमधील दगडावर उभे राहणार्या व्यक्तीची वेगवेगळ्या वेशामध्ये प्रतिबिंब उमटत होते.त्यातच एका कमर्यामध्ये प्रवेशद्वारामधुन जाताना सर्वत्र अंधार दिसत होता, मात्र उलट्या बाजुला चालत जाउन परत फ़िरुन बघितल्यास सर्व हॉलमध्ये प्रकाश जाणवत होता. प्रत्येक आश्चर्यामध्ये भौतिक शास्त्राचे, रसायनाचे आणि जीवशास्त्राचे देखील नियम वापरुन चमत्कार तयार करण्यात आले होते.
माणसाचे स्वप्न देखील स्वत:ला लाजतील असे ते शहर होते.

त्या शहराचे पुर्ण ऍनिमेटेड चलचित्र संपल्यानंतर हॉलमध्ये परत प्रकाश करण्यात आला. काही क्षण कोणीच काहीच बोलले नाही. सर्वांना जणु गोड स्वप्नातुन बळजबरीने जागे केल्याप्रमाणॆ वाटले. सगळे लोक अजुनही आश्चर्यचकीतच होते. असे शहर अस्तित्वात येऊ शकते हे त्यांना पटतच नव्हते.पण जे बघितले ते लवकरच सत्य होणार आहे याची त्यांना जाणीव झाली. आणि टाळ्यांचा कडकडाट बराच वेळ चालु राहीला......

वाङ्मयविचार