एकेकाची संक्रांत

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
15 Jan 2009 - 5:27 pm

प्रसंग : १
(राज ठाकरेंचा बंगला)
(वहिनी व राजसाहेब एक मोठ्या पातेल्या समोर बसले आहेत आणी लहान लहान पिशवीत हलवा आणी रेल्वेची तिकिटे भरत आहेत.)
आम्ही :- हॅ हॅ हॅ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ..
राजसाहेब :- तिळगुळ घ्या तिकिट घ्या आणी आपल्या राज्यात सुखी रहा.
आम्ही :- तुमच्याच राज्यातले रहिवासी आहोत आम्ही साहेब, आत कुठे पाठवताय आम्हाल अजुन ?
राजसाहेब :- अरे हो खरेच की लक्षातच आले नाही. बर मिळाला ना तिळगुळ ? फुटा आता. उगाच कामत असताना त्रास देउ नका.
आम्ही :- (चिवटपणाने) साहेब मातोश्रीवर देउन आलात का नाही तिळगुळ ?
राजसाहेब :- तुम्हाला काय कारयच्या आहेत हो चांभार चौकशा ? विठोबा आमच्या मनात असतो कायम, इथुनच दाखवला त्याला नैवैद्य.
आम्ही :- उत्तर प्रदेश दिनाचे आमंत्रण आलेय म्हणे साहेब ?
राजसाहेब : फालतु गोष्टिंकडे आम्ही लक्ष देत नसतो. आमची सभा आहे नेमकी त्याच दिवशी, त्यावेळी चोख उत्तर देउ.
आम्ही :- नाही पण 'राजकुमार' सामील होणार आहेत म्हणे त्या कार्यक्रमात..
राजसाहेब :- बंद करा हो हे आगी लावणे ! मराठी ह्रुदय सम्राट आहे मी, मी कशाला कोणा राजकुमाराची फिकीर करु ?
आम्ही :- ब.स.प. शी हात मिळवण्याबद्दलही चर्चा चालु आहे म्हणे...
राजसाहेब :- पायात पाय अडकुन पडले नाहीत म्हणजे झाले !
आम्ही :- ह्या वेळच्या भाषणात ते हल्ल्याची वेळी राज ठाकरे कुठे होते विचारणार्‍यांना पण चोख उत्तर द्या साहेब ! मनसे चे कार्यकर्ते, नेते नाही पण एक रुग्णवाहीनी दिसल्याचा दावा केलाय काही लोकांनी.
राजसाहेब :- अलबत ! चामडीच सोलुन काढतो एकेकाची, दिली असती परवानगी तर गेलो असतो आम्ही सुद्धा बंदुक घेउन लढायला.
आम्ही :- बरोबर साहेब ! अशाच ताकदिनी एकदा त्या परराज्यातल्या न्यायालयात जा आणी उडवा त्यांची दाणादाण.
राजसाहेब :- किरंगळी दिली तर बोट पकडु नका. 'आरती' घ्या आता.
(हे वाक्य बोलताना त्यांनी २/३ सुदृढ मनसैनीकांकाडे पाहीले, आणी त्याचा योग्य अर्थ काढुन आम्ही सटकलो)

प्रसंग : २
अजितदादांचा बंगला
(बाहेर ही येव्हडी दुतर्फा रांग लागलेली आणी त्यातल्या बर्‍याच जणांच्या हातात बेड्या आणी बरोबर २/२ हवालदार)
दरवाज्यावरच साहेबांचे चिटणीस एक बाकडे टाकुन बसलेले दिसले.
चिटणीस :- नाव बोला ! हाल्फ मर्डर किती ? फुल्ल किती ? कुठ दरोडा टाकलाय ? बलात्कार केलाय का ?
आम्ही :- अहो सामान्य माणुन आहे हो मी, साहेबांना शुभेच्छा द्यायला आलोय.
चिटणीस :- पुढल्या साली या, ह्यावेळी फक्त ज्यांना 'सुधारायची' इच्छा आहे अशाच 'वाल्या कोळ्यांना' भेटणार आहेत साहेब.

प्रसंग : ३
नारायण राणेंचा बंगला
आम्ही :- साहेब , तिळगुळ घ्या गोड बोला
साहेब :- गोड ? आम्ही तर आजकाल बोलणेच बंद केलय, बघतायना ?
आम्ही :- वादळापुर्वीची शांतता म्हणायची काय ? का नविन 'प्रहाराची' तयारी ?
साहेब :- आम्ही नाहि तर नाही तुम्ही तरी सबुरीनी घ्यायला शिका कि जरा ऑ ! जरा कुठे 'डोक्याचा त्रास' भुकंपग्रस्त झाला म्हणावे तोवर हा एक त्रास.
आम्ही :- नाही बर्‍याच अफवा कानावर पडत होत्या, म्हणले तुमच्याकडुनच काय कळते का बघावे !
साहेब :- आम्ही अजुन स्वगृहातच आहोत. आमच्या विरोधकांनी जे काय अफवांचे मोहोळ उठवलय ते उठवु द्या. म्याडमच्या आदेशाबाहेर मी नाही.
आणी हो निलेश सुद्धा नाही ! आणी चव्हाणांची आणी आमची काय अंतर्ग़त युती पण नाही.
आम्ही :- तुम्हाला गमावणे त्यांना पण परवडण्यासारखे नाही साहेब, तुमचा करिष्माच तसा आहे.
आमच्या वरच्या वाक्यातील कुठल्या शब्दाचा राग आला ते कळाले नाही पण त्यानंतर आम्हाला दंडाला धरुन बाहेर काढण्यात आले.

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

15 Jan 2009 - 5:35 pm | निखिल देशपांडे

राजकारण्यांच्या संक्रांती चे वर्णन वाचुन मजा आली..........

आम्ही :- ह्या वेळच्या भाषणात ते हल्ल्याची वेळी राज ठाकरे कुठे होते विचारणार्‍यांना पण चोख उत्तर द्या साहेब ! मनसे चे कार्यकर्ते, नेते नाही पण एक रुग्णवाहीनी दिसल्याचा दावा केलाय काही लोकांनी.

हे झाले तर मजा येयिल......

निखिल

शेखर's picture

15 Jan 2009 - 5:36 pm | शेखर

खुसखुशीत :)

मैत्र's picture

15 Jan 2009 - 5:40 pm | मैत्र

मस्तच...

अमोल केळकर's picture

15 Jan 2009 - 5:38 pm | अमोल केळकर

मजेशीर आहे.

(स्वगतः विलासरावांना तिळगुळ देखील गोड लागत नसेल बहुतेक )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2009 - 5:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा, तुम्ही तुमची "इमेज जपली" म्हणायची. :-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

मिंटी's picture

15 Jan 2009 - 6:02 pm | मिंटी

आदितीशी सहमत.....
मजा आली वाचुन.....खुशखुशीत लिखाण :)

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 6:06 pm | छोटा डॉन

महिलामंडळाशी सहमत ...
मस्त जमला आहे लेख, एकदम खुसखुषीत शैली ..!

बाकीच्यांनाही घ्या रिंगणात ..!
आम्ही वाट पाहतो आहोत ...
( ही शब्दशः धमकी समजावी, अन्यथा आम्हाला लेखणी उचलावी लागेल, आम्ही ज्या ज्या विषयांना हात घातला त्यांचा पार चुथडा झाला व लोक पुन्हा त्याकडे ढुंकुन पाहिनात. सबब, हे व्हायच्या आधी पुढचा भाग टाका ...!)

------
छोटा डॉन

अनामिक's picture

15 Jan 2009 - 7:13 pm | अनामिक

लय भारी दोस्ता!

बाकीच्यांनाही घ्या रिंगणात ..!
आम्ही वाट पाहतो आहोत ...

असेच म्हणतो

अनामिक

अवलिया's picture

15 Jan 2009 - 7:16 pm | अवलिया

मस्त

(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )
-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सहज's picture

16 Jan 2009 - 6:11 am | सहज

खुसखुशीत!

सखाराम_गटणे™'s picture

16 Jan 2009 - 3:31 pm | सखाराम_गटणे™

सहमत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

यशोधरा's picture

15 Jan 2009 - 7:19 pm | यशोधरा

मस्त! आवडले.

शंकरराव's picture

15 Jan 2009 - 7:45 pm | शंकरराव

आवडले एकदम खुसखूशीत लेख ..:-)

विनायक प्रभू's picture

15 Jan 2009 - 8:10 pm | विनायक प्रभू

किल्ली व खिल्ली

प्राजु's picture

16 Jan 2009 - 12:07 am | प्राजु

संक्रांत चांगलीच रंगली.. :)
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

16 Jan 2009 - 3:48 am | समिधा

मस्त मजा आली

मदनबाण's picture

16 Jan 2009 - 4:35 am | मदनबाण

राजकुमारा सही रे !!!

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

अनिल हटेला's picture

16 Jan 2009 - 9:52 am | अनिल हटेला

और भी आने दो !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्पृहा's picture

16 Jan 2009 - 3:29 pm | स्पृहा

मस्तच.