लठठ मनोगत

अनिरुद्धशेटे's picture
अनिरुद्धशेटे in जे न देखे रवी...
15 Jan 2009 - 3:42 pm

'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी'
बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती

घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे
आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती

आधी शोध ही गम्भीर कविता लिहीली होती पण वरील काव्य वाचुन नवीन कल्पना सुचली ती अशी

लठठ मनोगत

मांस माझे घेतोस का ? बळ मला देतोस का?
अंग झालेय जड सगळे, खांद्यावर मला घेतोस का?

अशी विनन्ती आता कोणताही लठठ नाही करणार
कारण तो माझ शब्द खाद्य पोट भरुन खाणार !

इथे खाउन खाउन अन्नदात्यांचा व्यवसाय करुन देतोय आम्ही
लठठपणाचे दोश आता सांगत बसु नका तुम्ही !

संशोधकाना सुद्धा संशोधन करायला लावतोय आम्ही
वर डाएटींग करुन रोजगार निर्मिती करतोय आम्ही !

गणेश आमुचा देव हो लबोदर आहे तो
भ़क्तीस्तव त्याच्या आम्ही मोदक बहु भक्शितो !

वाइट याचच वाट्त की,
आता लागत नाहीत लाडु श्रीखंड खाण्याच्या पैजा
दोन गुलाबजाम नाहीतर दोन जिलब्या देउन
लोक करतात समारंभ साजरा !

पण आता जुन्या खवय्यांची परंपरा
चालविणार आम्ही याही काळी
जास्त नका बोलु आता
लवकर वाढा बुन्दीची कळी !

लठठ माणसांचे शरिर व मन
फणसासारखे हिरवे हिरवे,
काटे त्याला वरुन असतात,
पण आतुन असते अम्रुत बरवे !

<अनिरुद्ध>

कविताप्रतिभा