पुन्हा गंध आला...(गझल)

बहुरंगी's picture
बहुरंगी in जे न देखे रवी...
11 Jan 2008 - 10:58 am

नमस्कार,
सकाळी सकाळी एक छान गझल वाचली ती तुम्हा सर्वांसाठी देत आहे ....
या पूर्वी कुणी मिपा-कराने संपादित केली असल्यास कृपया पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, हि विनंति.
====================================
पुन्हा गंध आला...(गझल)

पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला,
पुन्हा जाग आली इथे चांदण्याला...

अशी रात्र जागी झाली पुन्हा की,
पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला...

न कळे कसा तोल गेलाच माझा,
पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला...

जरी संपलेली रात्र वादळांची,
पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला...

फूले ही पसरली शेजेवरी मी,
पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला...

मला जाणले तू असे छान राणी,
पुन्हा दाद घे ही तुझ्या वाचण्याला... !

कवी :- महेश घाटपांडे
===========================

गझलआस्वाद

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

11 Jan 2008 - 11:08 am | इनोबा म्हणे

वाह! सकाळी सकाळी इतकी सुंदर गझल वाचायली मिळाली...

(रसिक) -इनोबा

धमाल मुलगा's picture

11 Jan 2008 - 11:50 am | धमाल मुलगा

माशाअल्लाह....
अस॑च कायस॑ म्हणतात नै इनोबा?
सुन्दर...बहुर॑गी...छानच आहे गझल.

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2008 - 4:51 pm | सुधीर कांदळकर

आमच्या मागण्याला.

पुढील ओळी
अशी रात्र जागी झाली पुन्हा की,
पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला...

न कळे कसा तोल गेलाच माझा,
पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला...

जास्त आवडल्या. सुरेख. पुन्हा अशा ओळी येऊद्यात.

विसोबा खेचर's picture

13 Jan 2008 - 10:46 pm | विसोबा खेचर

सुंदर गझल...

तात्या.

प्राजु's picture

14 Jan 2008 - 2:11 am | प्राजु

अतिशय सुंदर गझल...

- प्राजु.