अतिंद्रिय शक्ती

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
9 Jan 2009 - 4:21 pm

तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का? माझा आहे. माझ्या आईला अतिंद्रिय शक्ती होती.
मी सहावीत होतो. मोठ्या बहिणीला मुलगा झाल्याची बातमी सकाळी घरी आली. फोन नव्हाता घरी. वहिनीने उत्साहाने तयार करुन ठेवलेली दुपट्याची पिशवी काढली. आईच्या हातात सुपुर्द केली. घरातुन बाहेर पडताना ती पिशवी आईने बरोबर न घेतल्याचे बघुन वहिनीने ती पिशवी माझ्या हातात दिली. " त्या पिशवी चा आता काही एक उपयोग नाही" असे म्हणुन आईने पिशवी मला परत ठेवायला लावली. हाताने इशारा करुन वहिनीला गप्प बसायला सांगितले. मला तेंव्हा हा प्रकार नेमका काय ते कळाले नाही. पण दादरला हॉस्पिटल मधे गेल्यावर उलगडा झाला. जन्माला आल्यावर सुमारे एक तासातच मुल वारलेले होते. ह्याला प्रिमॉनिशन (भविष्याची चाहुल) म्हणावे तर एकदा मामाची चोरीला गेलेली गाडी नेमकी कुठे मिळेल हे पण आईने नेमके सांगितलेले होते. तसेच बहिणीला एकदा साधा ताप आला होता. पण नेहेमीच्या शिरस्याप्रमाणे फॅमिली डॉक्टर कडे न नेता एकदम के.ई.एम. मधे नेण्याचा आईचा आग्रह त्यावेळी सगळ्याना बुच़ळ्यात टाकणारा होता. पण हॉस्पिटलला पोचल्यानंतर प्रकरण जीवावरचे होते हे लक्षात आले. असे अनेक आठवणी.
ह्या सर्व गोष्टीना वैज्ञानिक खुलासा माझ्याकडे नाही. आणि त्याचा विचार कधी केला नाही. फक्त अशा गोष्टी सांगताना आई ट्रांस मधे असायची हे पक्के आठवते. ह्याला अतिंद्रिय शक्ती म्हणावे काय.? भविष्यात येणा-या संकटाची चाहुल लागते? मग लिहुन ठेवलेले प्राक्तन म्हणजे काय.? मी ह्या न उलगडणा-या प्रष्नापासुन सहसा लांब रहातो. असतात हे त्या न दिसणा-या वर बसलेल्या 'जोकर' चे खेळ असे म्हणतो आणि पळुन जातो.
जाता जाता: आई जायच्या आधी चार दिवस मी तिच्या जवळ बसलेलो होतो. तेंव्हा तीचे एक वाक्य आजही आठवते. " गुरुदक्षिणा विसरु नकोस. आता कळणार नाही. योग्य वेळ येईल तेंव्हा माझे वाक्य लक्षात ठेव.."
मी साहेबांबरोबरचे काम सोडलेलेल्या जवळ जवळ २० वर्षे झाली होती. एकदा दुपारी अचानक साहेब घरी आले. आणि मला म्हणाले, "तुझी खुर्ची तुला परत बोलवते आहे."
मी माझे इतर काम संभाळुन सुमारे दिवसाला ६ तास नविन स्टाफ ला ट्रेनींग द्यायचे काम वर्षभर केले.
मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

मऊमाऊ's picture

9 Jan 2009 - 4:35 pm | मऊमाऊ

न उलगडणारे प्रश्न तर खरेच ! मला स्वतःला काही अनुभव नाही परंतु विवेकानंदांच्या पुस्तकात असे उल्लेख आहेत.

पात्र's picture

9 Jan 2009 - 7:08 pm | पात्र

मला त्या पुस्त्काचे नाव सागाल का

मऊमाऊ's picture

10 Jan 2009 - 9:46 am | मऊमाऊ

The complete works of Vivekanand - volume II - The powers of the Mind - Lecture delievered at Los Angeles, California January 8, 1900

भिडू's picture

9 Jan 2009 - 9:24 pm | भिडू

अतिंद्रिय शक्ति कि काय माहिति नाहि पण मला डिप्लोमा ला असताना स्वप्नामधे 'C language' चा पेपर दिसला होता.परिक्षेच्या एक दिवस आधि. आणी परिक्षे मधे ९०% पेपर तसाच्या तसा आला होता.पण बस हे एकदाच घडले होते माझ्ह्या बाबतित.त्या नतंर कधि असा अनुभव आला नाहि मला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jan 2009 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच तर होतं. पण अर्थात पेपर स्वप्नात दिसायचा नाही. अभ्यास करून (पुस्तकांचा आणि आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही) मला साधारण ८०% प्रश्न समजायचे. अगदी पीएच.डी.च्या व्हायव्हालासुद्धा असंच काहिसं झालं होतं.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

मी परिक्षेच्या आदल्या दिवशी २१ अपेक्शित प्रश्नसंग्रह घेऊन यायचो. त्यातलेच सगळे प्रश्न थोडाफार शब्दात फरक करून यायचे पेप्रात. त्यामुळे उगाच अतींद्रीय शक्तिची मदत नाही घ्यायला लागली पेप्रात.

(एटीकेटीवाला)
पुण्याचे पेशवे
Since 1984

मऊमाऊ's picture

9 Jan 2009 - 4:37 pm | मऊमाऊ

न उलगडणारे प्रश्न तर खरेच ! मला स्वतःला काही अनुभव नाही परंतु विवेकानंदांच्या पुस्तकात असे उल्लेख आहेत.

राघव's picture

9 Jan 2009 - 4:41 pm | राघव

आपल्याला न कळणार्‍या बर्‍याच गोष्टी जगात आहेत हे मी सरळपणे मान्य करतो. त्यामुळे संभ्रम पैदा होत नाहीत. हे अनुभव सापेक्ष व सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला अनुभव नाही आला तरी कुणाला येऊ शकणार नाहीच असे नाही.
मुमुक्षु

अनिल हटेला's picture

9 Jan 2009 - 4:59 pm | अनिल हटेला

मुमुक्षु च्या प्रतीसादाशी पूर्ण सहमत...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 5:02 pm | लिखाळ

मागे अश्याच विषयावर मी एक चर्चा प्रस्ताव ठेवला होता.अध्यात्म आणि अद्भुत अनुभवांचे जग
वेळ मिळाल्यास जरुर वाचावा.

असे अनुभव येतात. येऊ शकतात. त्यांना आज समजलेल्या विज्ञानाच्या भाषेत बसवण्याची मी घाई करत नाही. आणि ते अनुभव सरळ असल्याने न मानण्याचा अवैज्ञानिकपणा करायला मी कचरतो. तर्काने काही उलगडले नाही तर पुढे कधीतरी कळेल असे म्हणून ते फडताळात ठेऊन देतो.

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अतिंद्रीय या शब्दांतच इंद्रियापलिकडच्या गोष्टी दडल्या आहेत.
जे इंद्रियाला समजत वा उमगत नाही ते अतिंद्रिय होते.

मानवाचा मेंदू हे एक आजही कोडे आहे. सर्वसामान्य लोक मेंदूचा ५% भागही वापरत नाहित असे कोण्या एका संशोधनात म्हटले आहे (गूगळायचा कंटाळा आला म्हणून संदर्भ देणे टाळत आहे.) आईनस्टाईनचा मेंदू देखील सर्वसामान्यांपेक्षा थोडा जास्त वापरला गेला म्हणून इतके शोध तो लावू शकला.

ढोबळमानाने मनुष्य इंद्रिय हे त्रिमितीचे जग अनुभव करते.
इतर मितींबाबत फक्त अनुमाने, गणिते, कल्पना आहेत.

पण आपल्यातही अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांना भविष्यकाळात घडणार्‍या घटनेची चाहूल लागते. (येथे एक सांगावेसे वाटते, चाहूल लागली तरी त्या घटनेत बदल करण्याची शक्ती त्यांच्यात नसते.) यालाच सिक्स्थ सेन्स असेही म्हणतात.

ही झाली अतिशय प्राथमिक माहिती ...बाकी इथे अनेक जाणकार अभ्यासक आहेत. तेही प्रकाश टाकतीलच या विषयावर
आणि चर्चेचा रागरंग पाहून मी देखील अजून ज्ञान (अ)ज्ञान पाजळेल :)

सागर

विसुनाना's picture

9 Jan 2009 - 6:01 pm | विसुनाना

तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का?
प्रत्यक्ष अनुभव नसल्याने याबतचा विचार तितका स्पष्ट नाही. पण - अनेकांना तसा प्रत्यक्ष अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि त्या व्यक्ती विश्वासार्ह वाटतात - (उदा. प्रस्तुत लेखक). त्यामुळे तो अनुभव प्रत्यक्ष स्वतः (कधी संधी मिळाली तर) जोखून बघायची आणि जर सिद्ध झाला तर विश्वास ठेवायची तयारी आहे.

प्रभुजी, अनुभव प्रत्यक्ष आल्याने तुम्ही त्यावर विश्वास ठेवता पण - 'मी ह्या न उलगडणा-या प्रष्नापासुन सहसा लांब रहातो.असतात हे त्या न दिसणा-या वर बसलेल्या 'जोकर' चे खेळ असे म्हणतो आणि पळुन जातो.' - असे तुम्ही का करता?
पळ न काढता, याप्रकारची अतिंद्रीय शक्ती तुमच्यात आहे काय?- याचा समर्थपणे शोध का घेत नाही?
'मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.'
'भाकीत' केल्याने काही नुकसान होईल असे आपणास वाटते काय?

विनायक प्रभू's picture

9 Jan 2009 - 6:47 pm | विनायक प्रभू

शोध नको रे बाबा? आपण आपले साधे बरे.

अवलिया's picture

9 Jan 2009 - 6:18 pm | अवलिया

तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का?
होय.

ह्याला अतिंद्रिय शक्ती म्हणावे काय.?
नाही. हे केवळ अतिनिकट परिचयामुळे आपल्या मातोश्रींनी केलेल्या विचारांचे फळ आहे. अतिंद्रीय शक्ती असती तर, नाते संबंध नसलेल्या व्यक्तींबाबतही हे अनुभव आले असते. पण आपल्या लेखात तसे उल्लेख नाहीत. त्यामुळे अगदी प्राथमिक स्वरुपाची शक्ती असावी असे वाटते.

भविष्यात येणा-या संकटाची चाहुल लागते?
स्वतःवर येणार असलेल्या संकटाची चाहुल लागत नाही. दुस-यावर येणा-या संकटाची कदाचित लागु शकते.
दैव एवढे दयाळु नाही की शकुन अपशकुनाचे अथवा सुचनांचे दुत पाठवुन मनुष्याला सावध करेल आणि इतके मुर्ख तर नक्कीच नाही.

मग लिहुन ठेवलेले प्राक्तन म्हणजे काय.?
अज्ञाताच्या अंधारगुहेत हात घालुन आपल्याला दिलेला दिवस. जो रोज वेगळा असतो.

मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.
आपण आपले आप्त सोडुन, ज्यांच्याशी आपला निकटचा परिचय नाही, त्यांच्या विषयी जाणु शकत नसाल असा माझा अंदाज आहे. आणि जर जाणु शकत असाल तर भाकित करण्याचे टाळणे हाच योग्य निर्णय.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

10 Jan 2009 - 10:19 am | विनायक प्रभू

अवलिया,
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
काही जळमटे दुर झाली.
माझा ई.एस्.पी. ला समांतर मराठी शब्द चुकला.(एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर)
ही बहुदा आपल्या सर्वांमधे असावी.. इतर गोष्टीमधे अडकल्यामुळे तीचा योग्य वापर करता येत नसावा. मेंदुच्या विस्तृत कक्षेचा संपुर्ण उपयोग करणे ह्या दृष्टीने बघितल्यास ह्या वापराचा आपण करतो त्या कामात खुप उपयोग होउन प्रगती होईल असे वाटते.
अवांतरः व्यं.नी मधे टाइम फ्रेम चे स्पष्टीकरण्-लई भारी. मी नेहेमी लक्षात ठेवीन.
आपला विद्यार्थी,
वि.प्र.

योगी९००'s picture

9 Jan 2009 - 7:36 pm | योगी९००

८ वर्षापुर्वीची गोष्ट. माझ्या सख्ख्या भाऊजींकडे बघून मला त्याकाळात काहितरी विचित्र वाटायचे..मी त्यांना तसेच घरच्यांना तसे म्हणालो पण की जरा भाऊजींची तब्येत तपासा. सगळ्यांना परत परत सांगितले...पण कोणीच मनावर घेतले नाही..

दुर्दैवाने त्याच काळात त्यांचे अचानक आलेल्या ह्रदयविकारामुळे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी निधन झाले. कदाचित दैवाने मला सांगितले होते. मीच जरा पुढाकार घेऊन त्यांना जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन जायला हवे होते.

तसे केले असते तर ते आज आमच्यात असते.

खादाडमाऊ

अनंत छंदी's picture

9 Jan 2009 - 8:16 pm | अनंत छंदी

प्रभू सर
काही व्यक्तींमध्ये जन्मताच अतिंद्रीय शक्ती असते. त्यातून त्यांना अशा काही गोष्टी साधतात असे मी काही पुस्तकातून वाचले आहे. प्रा. मधुकर दिघे यांची काही पुस्तके या विषयावर आहेत.
माझा एक अनुभव
सुमारे २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी संमोहनाचे कार्यक्रम प्रसिद्ध होते. त्यामुळे हा प्रकार आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही मित्र धडपडत होतो. असेच एकदा दुपारच्या वेळेस एका मुलाला संमोहीत करण्यात आले असता तो प्रगाढ मोहनिद्रेत गेला. त्याची चाचणी घेण्यासाठी दुसर्‍या खोलीत पालथे ठेवलेले पत्ते कोणते आहेत ते त्याला विचारण्यात आले असता त्याने ते दहाही पत्ते बरोबर त्याच क्रमाने सांगितले. तो मोहनिद्रेतून बाहेर आल्यानंतर त्याला विचारले असता तो म्हणाला की मोहनिद्रेत असताना ते पत्ते त्याला दिसत होते.

रामदास's picture

9 Jan 2009 - 7:51 pm | रामदास

इंद्रीय ते अतींद्रीय प्रवास चांगला चालला आहे.

मुक्तसुनीत's picture

9 Jan 2009 - 8:11 pm | मुक्तसुनीत

बहुदा रामदास यांना "ऐंद्रीय" ते अतींद्रीय असे म्हणायचे असावे :-)

गात्रांत इंद्रिये अवघी , गुणगुणती दु:ख कुणाचे !!?

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 8:15 pm | लिखाळ

गात्रांत इंद्रिये अवघी , गुणगुणती दु:ख कुणाचे !!?

स्तोत्रं पाठ न झालेल्यांचे दु:ख ! (ह घ्या)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मुक्तसुनीत's picture

9 Jan 2009 - 8:16 pm | मुक्तसुनीत

हे सरता संपत नाही , भांडणे मिपा-कर्त्यांचे ! हाहाहा ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jan 2009 - 8:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सरता संपत नाही , भांडणे मिपा-कर्त्यांचे ! हाहाहा ...

मिपाकर्ते का मिपाकर?

(शंकासूर) अदिती

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आजानुकर्ण's picture

12 Jan 2009 - 9:50 pm | आजानुकर्ण

इथे शंकेचा सूर लावला असला तरी शंकासूर ऐवजी शंकासुर असे हवे असे वाटते.

आपला,
(शुद्धलेखनासुर) आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

12 Jan 2009 - 11:16 pm | छोटा डॉन

कर्णाशी (नेहमीप्रमाणे ) सहमत आहे.
पण .... इथे २ शक्यता येतात.

१. शंकासुर ( ते सुदलेखणाचे तुम्ही बघुन घ्या भौ, आपल्याला काही उमजत नाही त्यातले ):
शंका + असुर ....
म्हणजे जे सारख्या "शंकावर शंका" काढतात ते असुर सदॄष्य ,नराधम, अमानवी प्राणी

२. शंकासुर :
आपल्याला "शंका" आहे हे तार"सुरात" ( तारस्वराच्या चालीवर ) ओरडणारा ...

आता यातले योग्य कुठले ?

------
छोटा डॉन

कपिल काळे's picture

9 Jan 2009 - 9:42 pm | कपिल काळे

मला ही असली इन्ट्यूशन चा आजार आहे. बरेच अनुभव आले आहेत. एखादी गोष्ट घडेल असे पटकन वाटून जाते. ती घडतेच. उदा देतो.
१. माझ्या कारसमोर एक बाइ स्कूटीवरुन चालल्या होत्या. थोडा पाउस होउन गेला होता. माझ्या मनात आलं की आता ही बाइ पडणार. पुढच्या दोन मिन्टात बाइ पडल्या. मी सावध होतो त्यामुळे कार वेळीच थांबवली.
२. हापिसातून परत येताना, समोरुन एक गवत भरलेला ट्रक येताना दिसला. बरेच गवत भरले होते. तेव्हा वाट्ले की हा ट्रक उलटणार. बायकोला तसे बोललो. ती काही बोलणार तेवढ्यात डोळ्यासमोर तो ट्रक उलटला.
३. एकदा कारने गावाला जात होतो. प्रवास ७-८ तासाचा.जायच्या आधीपासूनच गाडीचा इग्निशन फ्युज उडणार असे वाटत होते. त्यामुळे जादा फ्युज घेउन ठेवले होते. त्याप्रमाणे प्रवासात दुपारीच इग्निशन फ्युज उडालाच!

असे अनेक अनुभव आहेत. पण परिक्षेचे पेपर मात्र नाही बुवा दिसले कधी.

अरुण जाधव's picture

9 Jan 2009 - 11:08 pm | अरुण जाधव

mala thodafar anubhav aahe .Pan aankhi jast janun ghyayache aahe. Koni mazi hi shakti wadhawnyasathi madat karel kay?

प्रभाकर पेठकर's picture

9 Jan 2009 - 11:47 pm | प्रभाकर पेठकर

माझा विश्वास नव्हता आधी पण काही अनुभव मला आले त्याही पेक्षा एक निंबळकर नांवाचे कोल्हापुरचे गृहस्थ भेटले होते त्यांची शक्ती माझ्या आकलना बाहेर होती.
पण ते सांगायचे, मला दिवसाचे २४ तास असे काही 'दिसत' नाही पण कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी मनःचक्षूंना दिसू लागतात आणि मी सांगायला सुरूवात करतो. अशा वेळी मला डिस्टर्ब करू नका. नाहीतर माझी लिंक तुटते. आणि पुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भात काही सुचेलच असे नाही.
माझ्या बाबतीत त्यांनी केलेली भाकिते बर्‍यापैकी (८०-९० टक्के) खरी ठरली. त्यांची प्रसिद्धी एवढी होती की ते मस्कतला आले असताना मस्कतच्या राजाच्या आईच्या कानावर ती (प्रसिद्धी) गेली. राजमातेने त्यांना खास आपल्या महाली बोलावून घेतले आणि काही चर्चा केली. काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितले नाही. एकाची केस ते दुसर्‍याबरोबर शेअर करायचे नाहीत.
त्यांच्या त्या अतिंद्रिय शक्तीवर एक लेख लिहीता येईल एवढ्या आठवणी आहेत.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

भाग्यश्री's picture

9 Jan 2009 - 11:49 pm | भाग्यश्री

याला कसली शक्ती म्हणावं की काय या बाबतीत मी गोंधळलेली आहे.
पण इन्ट्युशन्स मलाही खूप येतात. आणि जेव्हा जेव्हा मी त्या इन्ट्युशनप्रमाणे वागले आहे तेव्हा मला कधीही पस्तावायची वेळ आलेली नाहीय. पण जर उलटे झाले, की आतून वाटतंय एखादी गोष्ट करावी, आणि तशी काही कारणाने नाही केली की मात्र पस्तावा होतोच होतो!
मात्र, हे मला केवळ माझ्याबाबतीतच होते. दुसर्‍या कुणाबद्दल काही वाटले नाहीए.

हा विषय वाचल्यावर अपरिहार्यपणे 'देजावू' ही कन्सेप्ट आठवलीच! जवळपास सगळ्यांना येणारा या अनुभवाबद्दल मला फार आकर्षण आहे. कसे होते काय वगैरे. खूप कारणं ऐकली /वाचली आहेत. ठोस कुठलं हे माहीत नाही, तरी रिडर्स डायजेस्ट च्या एका ब्रेन विषयक पुस्तकात वाचलेले कारण पटते.

तसेच, देजावू च्या उलटे 'जमैसवू' म्हणजे, ओळखीच्या गोष्टी अनोळखी वाटणे हे ही कधी कधी अनुभवले आहे.

http://bhagyashreee.blogspot.com/

रेझर रेमॉन's picture

10 Jan 2009 - 1:27 am | रेझर रेमॉन

शक्ति... आतिंद्रिय... दीज आर ऑल adjectives चिको!
डोण्ट एव्हर ट्राय, क्वालिफाय सॉमथिंग...
अनुभव आला नसेल असा एक ही माणूस नसेल... मग एकाद्या माणसात "खास गुण" म्हणण्या सारखं काय?
अनुभवणारे आपणच.. ते ही इंद्रियाद्वारे... मग आतिंद्रिय कशाला?
शक्ति असेल तर जी आपल्या कन्ट्रोलमध्ये नाही तिचा उपयोग काय?
काळ आणि अवकाश यांचा परीघ आणि छेद अज्ञात आहेत...
जे अज्ञात आहे ते विज्ञान नाही असं म्हणणं चुकीचं होईल.
सो... जे आहे ते आहे... लेट इट सिंपली एक्झिस्ट चिको!
-रेझर

घाटावरचे भट's picture

10 Jan 2009 - 8:33 am | घाटावरचे भट

>>सो... जे आहे ते आहे... लेट इट सिंपली एक्झिस्ट चिको!

पण इथल्या विज्ञाननिष्ठ चिकोज आणि चिकाज ना ते मान्य नाही....काय करावे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2009 - 9:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनुभव आला नसेल असा एक ही माणूस नसेल...
आहे, मी आहे (आणि माणूसही आहेच).

आपला प्रतिसाद ऐंद्रीय शक्ती वापरून मला कळला नाही आणि विशेषतः हे वाक्यः
काळ आणि अवकाश यांचा परीघ आणि छेद अज्ञात आहेत...

माझ्या माहितीत काळ आणि अवकाश यांचा छेद शून्य आहे, कारण काळ (१ मिती/dimension) आणि अवकाश (३ मिती) या चार मितींमधे आपण रहातो. कोणतीही घटना, वस्तू यांची स्थिती(? positions) देण्यासाठी हे चारही coordinates देण्याची गरज असते.

अवांतरः माझ्या अल्पमाहिती आणि स्मरणशक्तीनुसार chico या शब्दाचा अर्थ छोटा मुलगा असा आहे. मी छोटा मुलगा नाही, तरीही आपला प्रतिसाद वाचला आणि प्रतिप्रश्न(?) विचारला, तेव्हा राग मानू नये.

अदिती

विनायक प्रभू's picture

10 Jan 2009 - 10:01 am | विनायक प्रभू

खरे तर मला पण कळले नाही. कदाचित ते कळायला रेझर शार्प अतिंद्रिय शक्ती लागेल सारखे वाटते.
हे 'चिको" म्हणजे काय? का ते समजायला पण अ.श. लागेल.

की जे लोक पायाळु जन्मतात त्याना ह्या अतिद्रिंय शक्ती ज्यादा असतात. ह्या बाबत कोणाला माहिती आहे का?
वेताळ

जृंभणश्वान's picture

10 Jan 2009 - 9:46 am | जृंभणश्वान

मीपण असच काहीसं ऐकले आहे - पायाळु लोकांना जमिनीखाली पाणी कुठे आहे ते कळते म्हणे.
खरंखोट पायाळु लोक आणि देवच जाणे

मुक्तसुनीत's picture

10 Jan 2009 - 10:15 am | मुक्तसुनीत

ऐंद्रीय अनुभवांची गुंतागुंत उलगडत नाही. भौतिक जगाचे प्रश्न पुरते कळत नाहीत. या आयुष्यातल्या समस्यांची पूर्ती होत नाही.मित्रांनो , अतींद्रीय अनुभवांची लक्झरी परवडते आहे कुणाला ? "मुक्ती नको , हा इहलोक हवा" असे कवी बोरकर म्हणून गेलेत. मी म्हणतो , "एकावेळी एक प्रॉब्लेम." इहलोकी आहोत , तर "रक्तामधल्या प्रश्नांकरताचे होकार" मिळवूयात. पारलौकिक आणि अतींद्रीयाबद्दल बोलू जेव्हा त्या "लोकी" जाऊ. मुझको मालूम है जन्नतकी हकी़क़त लेकिन, दिलके खुष रखनेको , विप्रसाहेब , ये ख्याल अच्छा है ! =))

आपला अभिजित's picture

10 Jan 2009 - 10:24 am | आपला अभिजित

एक साधे उदाहरण सांगू?

आपण एखादे गाणे गुणगुणत असतो आणि तेच कुठेतरी ऐकू येते. आपल्या बाबतीत हे हज्जारदा होते. कधी कधी एखाद्या व्यक्तीची आठवण येते, भेटावेसे वाटते आणि ती व्यक्ती अचानक भेटते. भेटण्याची सुतराम शक्यता नसताना! किंवा, तिचा फोन तरी येतो. आपण त्याला `१०० वर्षं आयुष्य' असं म्हणतो.

हे अतींद्रिय शक्तीचं प्रकरण `१०० डेज' मध्ये जरा (अतिशयोक्त रूपात) दाखवलं होतं. मला वाटतं, स्वप्नात पण असल्याच काय काय चमत्कारिक गोष्टी दिसतात. `मनी वसे ते स्वप्नी दिसे' म्हणतात. पण मला तर अनेकदा अनोळखी चेहरे, किंवा ओळखीच्या व्यक्ती अनोळखी ठिकाणी दिसतात.

काहीतरी गूढ आहे, नक्की!

पिवळा डांबिस's picture

10 Jan 2009 - 10:39 am | पिवळा डांबिस

तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का?
अर्थातच आहे!!!
किती उदाहरणे देऊ?
१. आज दुपारी कॅन्टीनमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक माणूस बसून समोरचे जेवण चमच्याने चिवडत होता. मला एकदम वाटलं की आता हा चमचा एक्दम तोंडात घालणार! आणि काय आश्चर्य!! त्याने खरंच तो चमचा नाकात किंवा कानात न घालता चक्क तोंडातच सारला.
२. आज सायंकाळी ऑफिसातून घरी येतांना! समोर ट्रॅफिक सिग्नल पिवळा झाला होता. मला एक्दम वाटलं की आता रस्त्यावरची सगळी वहानं थांबणार!!! आणि काय चमत्कार! तो लाईट लाल झाला आणि सगळी वहानं थांबली....
३. आज घरी आल्यावर आपल्याला मासळी खायला मिळणार असं सारखं वाटत होतं. आणि बघितलं तर खरंच! पानात मासळी होती. (मासळी शिजतानाचा वास आला होता पण त्याचं एव्हढं काही विशेष नाही!!!)

तेंव्हा होय! अतिंद्रिय शक्तींवर आमचा पूर्ण भरवंसा आहे.....

-अतिंद्रिय डांबिस
:)

विनायक प्रभू's picture

10 Jan 2009 - 10:41 am | विनायक प्रभू

लय भारी रे डांबिसा. ह्याला अतिद्रव शक्ती म्हणतात.
अवांतर : मासे खाल्यानंतर काय झाले?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2009 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडाकाका, माझ्या मनातलं लिहिलंत, सहमत, +१, आपल्या प्रतिसादात पिडा दिसले.
घ्या, आणखी एक पुरावा अतिंद्रिय शक्तिंचा! ;-)

अवांतरः ट्रॅफिकचं प्रेडीक्शन, खाणं, गाणं वगैरे वाचून मलाही असंच काहीसं वाटत होतं.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jan 2009 - 1:59 pm | प्रभाकर पेठकर

१. आज दुपारी कॅन्टीनमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक माणूस बसून समोरचे जेवण चमच्याने चिवडत होता. मला एकदम वाटलं की आता हा चमचा एक्दम तोंडात घालणार! आणि काय आश्चर्य!! त्याने खरंच तो चमचा नाकात किंवा कानात न घालता चक्क तोंडातच सारला.

खरेच आश्चर्य. त्याने चमचा तुमच्या तोंडात घातला आणि तुम्हाला राग नाही आला? तुम्ही उठून निदान दुसरीकडे तरी जायचे.

२. आज सायंकाळी ऑफिसातून घरी येतांना! समोर ट्रॅफिक सिग्नल पिवळा झाला होता. मला एक्दम वाटलं की आता रस्त्यावरची सगळी वहानं थांबणार!!! आणि काय चमत्कार! तो लाईट लाल झाला आणि सगळी वहानं थांबली....

हम्म्म! म्हणजे तुम्ही नक्कीच पुण्यात नव्हतात.

३. आज घरी आल्यावर आपल्याला मासळी खायला मिळणार असं सारखं वाटत होतं. आणि बघितलं तर खरंच! पानात मासळी होती. (मासळी शिजतानाचा वास आला होता पण त्याचं एव्हढं काही विशेष नाही!!!)

अच्छा! म्हणजे आज मासळी शिजवून पानात वाढली त्याचं आश्चर्य वाटलं का?

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

पिवळा डांबिस's picture

11 Jan 2009 - 1:16 am | पिवळा डांबिस

त्याने चमचा तुमच्या तोंडात घातला आणि तुम्हाला राग नाही आला?
त्याने चमचा स्वतःच्या तोंडात न घालता आमच्या तोंडात घातला हा शोध तुम्हाला कसा लागला? तुमच्या अंगी असलेल्या अतिंद्रियशक्तीमुळे का?
म्हणजे तुम्ही नक्कीच पुण्यात नव्हतात.
हुश्श्श्य!!! अगदी खरंय! नव्हतो बाबा!!
म्हणजे आज मासळी शिजवून पानात वाढली त्याचं आश्चर्य वाटलं का?
आमच्याकडे पिढ्यानपिढ्या मासळी शिजवूनच खातात. तुम्हाला पेठकरकाकू जी मासळी पानात वाढतात ती न शिजवलेली असते का? काकूंना विचारून बघा आणि मग (जगलात वाचलात तर!) आम्हाला कळवा ती रेसेपी.....
:)

स्वानन्द's picture

10 Jan 2009 - 10:53 am | स्वानन्द

आवडीचा विषय!

या बाबतीत मला देखील काही अनुभव आले. भले ते फार सुरस नसतील पण नक्की सान्गावेसे वाटतात.
१. मला स्वप्नात एकदा एक प्रशस्त आवार दिसले होते. जिथे २ शिपाया सारखी ( एंग्रजीमध्ये 'पिऊन' ) माणसे गप्पा मारत होती. मी आणि आई असे दोघेच होतो. आणि मी त्यांना काहीतरी विचारतोय, एवढेच दिसले. आणि गंमत म्हणजे आठवड्याभरातच मी आणि आई मला ११वी चा प्रवेश मिळालेल्या कॉलेज मध्ये थोडी चौकशी करयला म्हणून गेलो होतो. ऑफिस कुठे आहे म्हणून विचारयला म्हणून माणूस शोधू लागलो तर समोर दोन शिपाई दिसले. आईला थांबायला सांगून मी त्यांना विचारयला गेलो आणि एकदम आधी स्वप्नात दिसलेला प्रसंग आणि हा यातलं साम्य जाणवून विस्मयचकीत झालो.

२. याखेरीज कित्येकदा मला एखाद्या दिकाणी सहज म्हणून फिरताना सारखं वाटू लागतं की अमूक अमूक व्यक्ती एथे दिसणार आणि खरच ती व्यक्ती तिथे दिसते. आणि हा प्रकार मी अनेकदा अनुभवलाय.

३. परीक्षेच्या आधी एखादा टॉपिक वाचवासा वाटणे आणि त्यावरच प्रश्न विचारला जाणे हा प्रकार तर बर्‍याच जणांच्या बाबतीत अनुभवास आल्याचं पाहीलंय.

यावर जेवढा विचार आणि वाचन केलं त्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपलं मन ( किंवा मेंदू ) जेवढा जास्त एकाग्र होतो तेवढ्याच प्रमाणात असे अनुभव येण्याचं प्रमाण वाढतं. परीक्षेच्या काळात आपण पूर्णपणे परीक्षेचा विशय या एकाच गोष्टीवर एकाग्र झालेलो असल्याने क्र. ३ मध्ये म्हटलेला प्रकार जास्त प्रमाणात अनुभवास येतो. त्या सामर्थ्याचा अविष्कार मात्र व्यक्ती व्यक्तींमध्ये भिन्न असू शकतो. योगशास्त्राचा अभ्यास ( प्रात्यक्षीक ) करणारे सरावने ही एकाग्रता वाढवत असतात.
याशिवाय जसे प्रत्येक व्यक्ती मध्ये उपजतच एखाद्या क्षेत्रात / कलेत जास्त जाण / प्रगती असते ( उदा. गणित, सन्गीताचा कान , भाषा वगैरे. ) त्याप्रमाणे एखाद्या ला विशेष प्रयत्न न करताही असे अनुभव येतात. नेहमीच्या इन्द्रीयांना जाणवणार नाही असे हे अनुभव असल्यामुळे आपण त्यांना अतींद्रीय असे म्हणतो.

या बाबतीत अ.ल. भागवत यांचं 'मोहीनी विद्या - साधना व सिद्धी' हे पुस्तक वाचल्यास अनेक नवीन गोष्टींचा नक्कीच परिचय होईल. अर्थात त्यातल्या सर्वच गोष्टी मला पटल्या किंवा तुम्हाला पटतील असे नव्हे. पण वाचायला काहीच हरकत नाही.

----अत्तीन्द्रीयानन्द

रामपुरी's picture

10 Jan 2009 - 9:30 pm | रामपुरी

काही अगदी जवळच्या नातेवाईकांना असे अनुभव आले आहेत.
पण इन्ट्युशन्स मलाही खूप येतात. आणि जेव्हा जेव्हा मी त्या इन्ट्युशनप्रमाणे वागले आहे तेव्हा मला कधीही पस्तावायची वेळ आलेली नाहीय. पण जर उलटे झाले, की आतून वाटतंय एखादी गोष्ट करावी, आणि तशी काही कारणाने नाही केली की मात्र पस्तावा होतोच होतो!
याबाबतीत एकदम सहमत.
असाच एक अनुभव पु.लं.च्या पुस्तकातही वाचलेला स्मरतो. तेव्हां अश्या काही आकलनापलिकडील गोष्टी होतात ज्याचे स्पष्टीकरण सध्यातरी विज्ञानाकडे नाही हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा.

अवांतरः समोर दिसणारे फक्त नियमात बसत नाही म्हणून मान्य न करणार्‍यांना 'विज्ञाननिष्ठ' म्हणतात का? (काही वर्षांपूर्वी 'आयुका'त काम करताना असे काही विज्ञाननिष्ठ पाहिले आहेत)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2009 - 11:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विज्ञाननिष्ठ माणसांना झोडण्याची! :-)

असाच एक अनुभव पु.लं.च्या पुस्तकातही वाचलेला स्मरतो.
(पुलंच्या लेखनाबद्दल, प्रतिभेबद्दल संपूर्ण आदर ठेवून) पुलंनी या विषयात संशोधन केल्याचं ऐकीवात, वाचनात नाही. तेव्हा पुलंचा या विषयात (बिनासंदर्भ) उल्लेख करण्याचं कारण समजेल का?

तेव्हां अश्या काही आकलनापलिकडील गोष्टी होतात ज्याचे स्पष्टीकरण सध्यातरी विज्ञानाकडे नाही हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचं पुरेसं आकलन आजच्या विज्ञानाला होत नाही, त्या सगळ्याच गोष्टींना चमत्कार म्हणणार का? उदाहरणार्थ आपल्या सूर्यावरून अधूनमधून प्रचंड प्रमाणात वायू, भारीत कण बाहेर पडतात त्यांचं नीटसं आकलन सौर विज्ञानाला झालं नाही, त्याला तुम्ही चमत्कार म्हणता का? ग्रहणांना, ग्रह वक्री होण्याला, एकेकाळी चमत्कार मानायचे, आज तुम्ही मानता का? मग ज्या गोष्टींचं आकलन झालं नाही त्याला सरळ चमत्कार किंवा तत्सम लेबल न लावता त्याबद्दल कोणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकीत्सा केली तर त्यालाही प्रत्यवाय नसावा. किंबहुना चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं; भले मग विषय अशा अतिंद्रीय शक्तीचा असेल वा शनी-मंगळ युतीचा!

अवांतरः समोर दिसणारे फक्त नियमात बसत नाही म्हणून मान्य न करणार्‍यांना 'विज्ञाननिष्ठ' म्हणतात का? (काही वर्षांपूर्वी 'आयुका'त काम करताना असे काही विज्ञाननिष्ठ पाहिले आहेत)
('आयुका' ही संस्था आणि तिथे कार्यरत असणार्‍या सर्व वैज्ञानिकांविषयी संपूर्ण आदर ठेवून) भारतात 'आयुका' ही एकमेव संस्था नाही जिथे विज्ञानविषयात संशोधन होतं. फक्त तिथेच (खरे अथवा स्वयंघोषित) विज्ञाननिष्ठ लोक असतात असा आपला काहीसा ग्रह (आकाशातला नव्हे!) झालेला दिसतो. आपण तिथल्याही किती लोकांवरून असा अंदाज केलात मला कल्पना नाही, पण काही मूठभर लोकांच्या मतांमधून भारतीय संशोधकांच्या वृत्तीचं सरलीकरण (जनरलायझेशन) करण्याच्या वृत्तीचा तीव्र निषेध.

बाकी मला या चर्चेत फार काही गती नाही त्यामुळे फारसा रसही नाही; तुमचं काय ते चालू द्या. पण उगाचच माझ्या "जातीतल्या" लोकांवर आरोप झाल्यामुळे टंकाळा सोडून प्रतिसाद प्रपंच केला.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jan 2009 - 11:39 pm | प्रभाकर पेठकर

सहमत आहे.

अवलिया's picture

11 Jan 2009 - 12:28 pm | अवलिया

चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं

अगदी बरोबर. पूर्ण सहमत.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

सहज's picture

11 Jan 2009 - 1:02 pm | सहज

+१

रामपुरी's picture

12 Jan 2009 - 9:43 pm | रामपुरी

तेव्हा पुलंचा या विषयात (बिनासंदर्भ) उल्लेख करण्याचं कारण समजेल का?
पुलं हे देव मानणारे नव्हते असा ग्रह त्यांची पुस्तके वाचताना होतो (खरे खोटे माहीत नाही. हे आपले माझे मत). तरिही त्यानी घोडेछाप दृष्टीकोन न ठेवता एका परदेशातील मानसोपचारतज्ञाचा असा अनुभव शब्दबद्ध केलेला स्मरला म्हणून त्यांचा उल्लेख.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचं पुरेसं आकलन आजच्या विज्ञानाला होत नाही, त्या सगळ्याच गोष्टींना चमत्कार म्हणणार का? उदाहरणार्थ आपल्या सूर्यावरून अधूनमधून प्रचंड प्रमाणात वायू, भारीत कण बाहेर पडतात त्यांचं नीटसं आकलन सौर विज्ञानाला झालं नाही, त्याला तुम्ही चमत्कार म्हणता का?
याला आम्ही सध्यातरी निसर्गाचा चमत्कार मानतो. (जोपर्यंत त्याचं पुर्ण आकलन विज्ञानाला होत नाही तोपर्यंत)
मग ज्या गोष्टींचं आकलन झालं नाही त्याला सरळ चमत्कार किंवा तत्सम लेबल न लावता त्याबद्दल कोणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकीत्सा केली तर त्यालाही प्रत्यवाय नसावा.
त्याला आमची काहीही हरकत नाही. किंबहुना स्वागतच आहे. पण त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही म्हणून ती घडलीच नाही असं म्हणण्याला नक्कीच विरोध आहे.
भारतात 'आयुका' ही एकमेव संस्था नाही जिथे विज्ञानविषयात संशोधन होतं. फक्त तिथेच (खरे अथवा स्वयंघोषित) विज्ञाननिष्ठ लोक असतात असा आपला काहीसा ग्रह (आकाशातला नव्हे!) झालेला दिसतो.
असा माझा ग्रह झाला आहे हा आपला ग्रह का झाला? हा एक चमत्कारच म्हणावा काय? :) माझ्या प्रतिसादात असं कुठं ध्वनित होत नाही असा आपला माझा समज.
पण काही मूठभर लोकांच्या मतांमधून भारतीय संशोधकांच्या वृत्तीचं सरलीकरण (जनरलायझेशन) करण्याच्या वृत्तीचा तीव्र निषेध.
भारतीय संशोधकांच्या वृत्तीचं सरलीकरण आम्ही कुठे केलं बुवा? असो ज्यांनी केलं त्यांचा निषेध असेल.
सर्वच अनाकलनीय गोष्टीना 'भानामती' म्हणणार्‍या विज्ञाननिष्ठांचा तीव्र निषेध.

अवांतरः ज्या गोष्टी चांगल्या आहेत, मग त्या भलेही अंधश्रद्धेवर आधारीत असतील, त्या तश्याच राहू द्यायला काय हरकत आहे? उदा. शनिशिंगणापूर मधे दारे उघडी ठेवली तरी चोर्‍या होत नाहीत असा समज आहे. म्हणून मी तिथे जाऊन चोरी करून दाखवतो (इति: नरेंद्र दाभोळकर) असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. चोरी होत नाही ही चांगली गोष्ट आहे. मग हा प्रवाद असाच ठेवला तर बिघडलं कुठं? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jan 2009 - 10:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकूणच विज्ञाननिष्ठ हा शब्द वाचून माझा गैरसमज झाला. पण तरीही चमत्कार ही संज्ञा मला चिकीत्सक वृत्तीला मारक वाटते.

आपल्या अवांतराशी जवळजवळ सहमत. शनिशिंगणापूरमधे चोरी होत नाही ही चांगली गोष्ट आहे. भीमाशंकरच्या जवळचं जंगल देवाच्या नावामुळे अजूनही घनदाट आहे, त्यामुळे (लोकांच्या डोक्यातल्या) देवाचे आभारच.
अंधश्रद्धेवर आधारीत विश्वासाला तडा जाऊ शकतो. पण कारणमीमांसा समजून घेऊन मान्य केलेल्या गोष्टी या जास्त चांगल्या पटतात आणि आचरणात आणल्या जाऊ शकतात. चांगली गोष्ट करण्यासाठी असत्य (उदा: अंधश्रद्धा) बोलणं, करणं मलातरी पटत नाही. लहान मुलांनाही भीती दाखवण्यापेक्षा समजावलं तर जास्त फायदा होतो असा अनेकांचा अनुभव असेलच.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

रामपुरी's picture

13 Jan 2009 - 12:31 pm | रामपुरी

पण तरीही चमत्कार ही संज्ञा मला चिकीत्सक वृत्तीला मारक वाटते.
'चमत्कार ही संज्ञा' नव्हे तर 'तो घडला तरी अमान्य करण्याची वृत्ती ' चिकीत्सक वृत्तीला मारक असते असे मला वाटते. जर चमत्काराचे अस्तित्व मान्य केले तरच त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून स्पष्टीकरण हुडकणे शक्य आहे. तो घडलाच नाही असेच जर वैज्ञानिक म्हणत राहीले तर संशोधन कशावर करणार? म्हणूनच ज्योतिष हे थोतांड ठरविण्यासाठी जे सव्यापसव्य अलिकडेच झाले ते मला चुकिचे वाटतात. जो काही प्रयोग केला गेला तो आणि त्याचे निष्कर्ष अगदीच हास्यास्पद होते. हे म्हणजे रसायनशास्त्रातील एक प्रयोग चुकला म्हणून संपूर्ण रसायनशास्त्र थोतांड आहे असे म्हणण्यासारखे आहे. ज्या एका ज्योतिषाचे निष्कर्ष अगदी अचूक आले ते का आले यावर संशोधन झाले असते तर ते जास्त योग्य झाले असते. आमचा विरोध आहे तो याला. जे सत्य समोर आहे ते 'निकषांमध्ये बसत नाही' म्हणून नाकारण्याला. ते का बसत नाही हे शोधणारे खरे शास्त्रज्ञ. म्हणूनच ब्लॅकहोल मधूनही काही बाहेर पडते हे दाखवून देणारा स्टीफन हॉकिंग्ज वेगळा ठरतो. असो.. अर्थात हा आमचा व्यक्तिगत दृष्टीकोन...
चांगली गोष्ट करण्यासाठी असत्य (उदा: अंधश्रद्धा) बोलणं, करणं मलातरी पटत नाही.
याच्याशी मात्र पूर्णपणे असहमत. कधीकधी चांगली गोष्ट करण्यासाठी असत्य बोलावं किंवा आचरावं लागतं. हे तर गीतेत सुद्धा सांगितले आहे आणि रोजच्या जीवनात कित्येकदा अशा अनुभवाला सामोरे जावे लागते. मला वाटत नाही आयुष्यात एकदाही असत्य न बोललेला माणूस पृथ्वीतलावर असेल. आणि जर वाईट गोष्टींसाठी असत्य बोलले जाऊ शकते तर चांगल्या गोष्टींसाठी बोलण्यास काहीच प्रत्यवाय नसावा.
मुलांशीही बर्‍याच वेळा खोटं बोलावंच लागतं. कुठल्या गोष्टीचं खरंखुरं स्पष्टीकरण आपण मुलांना देऊ शकतो हे त्यांच्या वयावर अवलंबून असते. चुकिच्या वयात जास्त अथवा चुकीची (किंवा पुर्णपणे खरी) माहिती ही हानिकारक ठरू शकते.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2009 - 11:18 pm | प्रभाकर पेठकर

शनिशिंगणापूर मधे दारे उघडी ठेवली तरी चोर्‍या होत नाहीत असा समज आहे.
असा 'समज'च आहे. शनिशिंगणापूरला माझ्या भावाच्या मित्राच्या सामानातून तीन की साडेतीन हजार रुपये चोरीस गेले. त्याने बराच आरडा-ओरडा केला तेंव्हा तिथल्या दुकानदारांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले आणि हात जोडून विनंती केली की ,'कृपा करून आरडा-ओरडा करू नका. इथे येणार्‍या भक्तांवरती आमची दुकानदारी अवलंबून आहे. भक्त यायचे बंद झाले तर आम्ही उपाशी मरु.' असो.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

बॅटमॅन's picture

29 Jun 2012 - 6:14 pm | बॅटमॅन

खत्रा!!

भिंगरी's picture

21 Jul 2014 - 4:47 pm | भिंगरी

आमच्याही नातलगाचे बूट तेथे चोरीला गेले होते.

किंबहुना चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं;

बरोबर आहे, आणि नियमात बसत नाही म्हणून अशा घटनांचे अस्तित्वच नाकारणे हे देखील तेव्हढेच चूक, नाही का?

पिवळा डांबिस's picture

11 Jan 2009 - 12:59 am | पिवळा डांबिस

समोर दिसणारे फक्त नियमात बसत नाही म्हणून मान्य न करणार्‍यांना 'विज्ञाननिष्ठ' म्हणतात का?
नाही! त्यांना विज्ञाननिष्ठ म्हणत नाहीत!
समोर दिसणारे, जर सर्वांनाच "दिसत" असेल तर फक्त ते नियमात बसत नाही म्हणून विज्ञाननिष्ठ नाकारीत नाहीत. अशा गोष्टींसाठी नवीन नियम बनवले जातात. उदा. प्रकाशाचं लहरींतलं स्वरूप आणि प्रकाशाचाचंच फोटॉन्समधील स्वरूप!!
प्रश्न तेंव्हा येतो जेंव्हा कुणी एक जण स्वतःला काही "दिसत" असल्याचा दावा करत असेल आणि इतरांना ते त्याचवेळेला दाखवण्यात असमर्थ असेल जेंव्हा!
बाकी अदितीशी सहमत!

पण उगाचच माझ्या "जातीतल्या" लोकांवर आरोप झाल्यामुळे टंकाळा सोडून प्रतिसाद प्रपंच केला.
:)
कुछ रीत जगतकी ऐसी है, हर एक रात का दिन हुवा...
तू कौन है, तेरा नाम है क्या, गॅलिलीओभी यहां बदनाम हुवा....
(अदिती, ह. घे! हा तुझ्या पूर्वसूरींचा एक सल्ला!!!)
:))

पाश्चात्यशास्त्र किंवा विज्ञान सिद्धांतामधे जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे आणि गणिती सुत्रांनी त्यांतील सर्व रहस्ये उलगडता येतील असा विश्वास आहे. या पद्धतीत ज्या कल्पना आणि शंकांचे निरसन बाह्येंद्रियांच्या सहाय्याने करता येते त्याच कल्पना आणि सिद्धांतांना शास्त्रसंमत मानले जाते. यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य धरावयाच्या निकषांमधे वस्तुनिष्ठ (objective), गणिती (mathematical), यांत्रिकी (mechanical, deterministic), तर्कनिष्ठ (rational), पृथ्थकरणात्मक (analytical) , क्रमवार वा श्रेणीयुक्त मांडणी (linear, step-by-step, sequential, empirical), प्रायोगिक (experimental), प्रत्यक्षानुभावात्मक (experienced by senses directly) इत्यादी येतात. या कसोट्यांवर उतरेल तेच खरे ज्ञान आणि बाकीचे सर्व अज्ञान असे विज्ञानाच्या भाषेत म्हटले जात असे. (वाक्यातील भुतकाळ लक्षात घ्या)

या कसोट्या ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असल्या तरी व्यापक ज्ञान मिळवण्यासाठी, अनुभव व्यक्त करण्यासाठी अपु-या आहेत.
अंतःप्रज्ञा (intution), व्यक्तिनिष्ठता (subjectivity) , ध्यानी वृत्ती (meditative tendency) , परस्परसंबंध पहाण्याची दृ्ष्टी (interrelational perspective), संश्लेषणात्मक दृष्टी (sythesis), समष्टीभाव (holistic), आणि तर्क निरपेक्षता(a-rationality) या प्राबल्याने भारतीय पद्धतींना सरळ सरळ अवैज्ञानिक ठरवुन त्यांचा संकोच केला गेला. मुलभुत वैज्ञानिक कारणमिमांसेपासुन दुर ठेवण्यात आले. भौतिकशास्त्रे पदार्थांचा अभ्यास करतात, त्यामुळे वस्तुनिष्ठता बाळगणे शक्य असते. परंतु समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींच्या अभ्यासाचे विषय पदार्थमय वस्तु नसतात. राग, लोभ, इच्छा, भावना, कृती, मनोव्यापार या गोष्टी प्रत्येक मनुष्य कमी अधिक प्रमाणात अनुभवत असतो. पण या वस्तु नसुन परिणाम आहेत. परिणाम म्हणजे मुळ प्रवृत्ती किंवा प्रेरणा नव्हे. यांचा अभ्यास पाश्चात्य गणिती पद्धतीने करता येणे शक्य नाही. त्याचाच फटका बसुन 'चेतना' आणि 'मन' विज्ञान मान्य करत नाही. त्यामुळे अशा विषयांची खिल्ली हे विज्ञान नाही, अवैज्ञानिक आहे असे भासवुन उडवली जात असे. (वाक्यातील भुतकाळ लक्षात घ्या)

भौतिक विज्ञानात महत्वाचा प्रश्न हा आहे की, विश्वाचे मुळ जड आहे की चेतन? सेमेटीक पंथांतील धर्मात यावर काहीही नाही. परंतु ह्या विश्वाचे मुळ तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या विश्वाला चालवणारे असे चेतन आहे हे मान्य करणे म्हणजे आपले पुरोगामी प्रतिमेला तडा जाणारे असेल असे वाटुन या विषयावर व्यक्त करण्यास, ते चेतन असेल तर ते मान्य करण्यास, सहमती दर्शविण्यास अनेकांना जड जात असे. (वाक्यातील भुतकाळ लक्षात घ्या)

परंतु हळुहळु वैज्ञानिकाचा आणि अवैज्ञानिकांचा एकमेकांविषयीचा दृष्टीकोन बदलत आहे असे मानण्यास हरकत नाही. आणि वर उल्लेखलेल्या सर्व पद्धतींचा एकत्र मिलाफ होवुन (म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालुन), या सृष्टीतील ज्यांना अजुनही चमत्कार असे म्हटले जाते अशी रहस्ये उलडगतीलच असा मला विश्वास आहे.

बाकी परमेश्वरी लीला अगाध आहे. मी पामर काय बोलु?

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

शशिकांत ओक's picture

12 Jan 2009 - 8:46 pm | शशिकांत ओक

आपणे विचार वाचले. आपण आधी यांचे वाचन केले नसल्यास सुचवतो. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे विज्ञान आणि चमत्कार या ग्रंथातील आशय आपल्या विचारांशी जवळ जाणारा वाटला.
तो ग्रंथ आपणांस हवा असेल तर माझ्याशी संपर्क करून ते मिळवता येईल.
आपण पुण्यात असाल तर रोहिणी बुक डेपोतून -अबचौक - ही तो व त्यांची अन्य विज्ञान आणि बुद्धिवाद, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन आदि पुस्तकेही उपलब्ध होऊ शकतात.शशिकांत

धनंजय's picture

13 Jan 2009 - 2:25 am | धनंजय

पाश्चात्यशास्त्र किंवा विज्ञान सिद्धांतामधे जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे आणि गणिती सुत्रांनी त्यांतील सर्व रहस्ये उलगडता येतील असा विश्वास आहे.

असे नसावे. पाश्चात्त्यशास्त्रात "जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे" असे (पूर्वीचे तरी) गृहीतक तुम्हाला कुठे सापडले?

जगातील प्रत्येक देशात असा विचार असलेली माणसे सापडतील म्हणा - काही लोकांच्या कर्मसिद्धांताच्या मागे सुद्धा "प्राक्तनाची अपरिवर्तनीय बद्धता" असे काही गृहीतक असते. पाश्चात्त्यांमध्ये देकार्तच्या शिष्यांचे असेच काही मत होते की ईश्वराने सुरुवातीला विश्वात गती भरली आणि नियम बनवलेत, पण त्यानंतर सर्व घटना त्या अपरिवर्तनीय/नियमबद्ध आहेत. (खुद्द देकार्तच्या मते चेतन मनुष्य-आत्मासुद्धा जड वस्तूंच्या गतीला देऊ शकतो.)

हल्लीच्या "पाश्चिमात्त्य" वैज्ञानिक संशोधनात मात्र असे कुठलेही गृहीतक वापरलेले दिसत नाही. पूर्वी तरी कधी वापरले जात होते?

पैकी "वस्तुनिष्ठता" ही परस्परसंवादासाठी महत्त्वाची असते - हे मात्र खरे.
"प्रत्यक्षानुभव" याच्या महत्त्वाचे मूळ व्यक्तिनिष्ठता आहे. (अशा प्रकारे तुमच्या पहिल्या यादीतील, आणि दुसर्‍या यादीतील तत्त्वांचा मिलाफ होतो आहे.)

थोडक्यात, मला तुमचे विश्लेषण अयोग्य वाटते - संश्लेषण आवश्यक आहे. पण तसे संश्लेषण करता पाश्चिमात्त्य-पौर्वात्य असा मुद्दा राहाणार नाही.

भौतिक विज्ञानात महत्वाचा प्रश्न हा आहे की, विश्वाचे मुळ जड आहे की चेतन? सेमेटीक पंथांतील धर्मात यावर काहीही नाही.

हे मात्र कैच्या कैच. सेमिटिक पंथांमध्ये विश्वाचे कारण चेतन आहे - त्यांच्या प्रमुख धर्मशास्त्र्यांपैकी यावेगळे सांगणारा कोणीही नसावा.

भौतिक विज्ञानासाठी हा प्रश्न आहे खरा - "चेतन" म्हणजे नेमके काय? अर्थात, एखादी संकल्पना चेतन आहे की नाही, याविषयी समाधानकारक उत्तर काय असू शकते? पूर्वीच्या काळी हा प्रश्न जितका सोपा (स्पष्टार्थ) मानला जाई, तितका तो नसावा. ज्या संकल्पनांबाबत अर्थनिर्णय झालेला नाही, त्याबद्दल संशोधनात्मक कार्य करण्याबाबत कोणाचाच उत्साह होणार नाही.

वजीर's picture

19 Feb 2009 - 9:29 pm | वजीर

तुमचा प्रतिसाद फार आवडला. अवलियांनी लिहिलेल्या मुद्यांचे खंडन केले आहेत. अवलियांचा प्रतिसाद वाचायला आवडेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2009 - 1:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... 'बेन्झिन'च्या रेणूबद्दल माहिती असणार्‍यांसाठी:

असं म्हणतात की फ्रेंडरीक ऑगस्ट केकुले नावाचा माणूस बेन्झिनच्या रेणूत इलेक्ट्रॉन्सच्या कशा प्रकारच्या विभागणीमधून हा रेणू स्थिर झाला असेल याचा विचार करत झोपी गेला. त्याला स्वप्नात स्वतःची शेपटी खाणारा साप दिसला आणि कोडं उलगडलं.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

रेझर रेमॉन's picture

11 Jan 2009 - 1:43 pm | रेझर रेमॉन

अदिती ताई... ( मोठया आहात म्हणून) नमस्कार..
अनुभव आला नसेल असा एक ही माणूस नसेल...
आहे, मी आहे (आणि माणूसही आहेच).
( मी नाही... [परग्रहवासी] तरी मला चमत्कार वगैरे विषयांत रस नाही. कसला अनुभव? मनात कोणताही विचार कधी ही येऊ शकतो. त्याला धरून पुढे काही घडले तर चमत्कार कसला? म्हणून जे आहे ते असू दे ना! आपलं काय जातं? चमत्कारावर आक्षेप)
(आपण अपवादाने नियम सिद्ध करूया का?)
आपला प्रतिसाद ऐंद्रीय शक्ती वापरून मला कळला नाही आणि
(हा माझ्या मंदबुद्धीचा परिणाम)
विशेषतः हे वाक्यः
काळ आणि अवकाश यांचा परीघ आणि छेद अज्ञात आहेत...

माझ्या माहितीत काळ आणि अवकाश यांचा छेद शून्य आहे, कारण काळ (१ मिती/dimension) आणि अवकाश (३ मिती) या चार मितींमधे आपण रहातो. कोणतीही घटना, वस्तू यांची स्थिती(? positions) देण्यासाठी हे चारही coordinates देण्याची गरज असते.
(चांगलं आहे. एन्टी मॅटर ही त्यात बसेल का? माझ्या मेंदूच्या कोऑर्डिनेट्समध्ये साठवायचा प्रयत्न करतो. युनिटी ऑफ स्पेस एण्ड टाइम माहीत आहे. एटर्नल प्रेझेंण्ट माहीत आहे. आपल्या अल्पमतिला तेवढे झेपते.)
अवांतरः माझ्या अल्पमाहिती आणि स्मरणशक्तीनुसार chico या शब्दाचा अर्थ छोटा मुलगा असा आहे. मी छोटा मुलगा नाही, तरीही आपला प्रतिसाद वाचला आणि प्रतिप्रश्न(?) विचारला, तेव्हा राग मानू नये.
(चिकाज् आणि चिकोज् आपण नाही सारे नाही का? नसलो तर तसं व्हायला हवं, रहायला हवं. बालपण का हरवायचं? मोठं व्हायची ही किंमत द्यायला आपण तयार नाही.)
*बेन्झिनचा रेणू कसा ही असो. ऑगस्ट केकुले ला स्वप्नात जे दिसलं त्याची सांगड घालणार्‍या कथेचे विज्ञानातच दाखले दिले जातात. हे ही गोड आहेच!

-रेझर

आपला अभिजित's picture

11 Jan 2009 - 5:50 pm | आपला अभिजित

अरे बाबा,

तू वारंवार हा कुठला शब्द वापरतोयंस?

`अतींद्रिय शक्ती' असा शब्द आहे तो! अति + इंद्रिय म्हणजे, इंद्रियांपलीकडचे...इंद्रियांनाही जे कळत नाही, ते!

रेझर रेमॉन's picture

12 Jan 2009 - 9:05 pm | रेझर रेमॉन

हे कसं सेंद्रिय खता सारखं झालं!
मागे वाचा आणि योग्य ठिकाणी प्रतिक्रिया पाठ्वा.
- रेझर

विनायक प्रभू's picture

11 Jan 2009 - 5:59 pm | विनायक प्रभू

खोखला(हिंदी) का खोकला

विजुभाऊ's picture

11 Jan 2009 - 5:30 pm | विजुभाऊ

डॉ जोस सिल्व्हा चे सिल्व्हा मेथड ऑफ माइन्ड कन्ट्रोल हे पुस्तक वाचुन पहा. यात अशा मानवी मेन्दुच्या अतीन्द्रीय क्षमतेबद्दल बरेच काही सप्रयोग लिहिले आहे.
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

झुमाक्ष's picture

12 Jan 2009 - 9:28 pm | झुमाक्ष (not verified)

डॉ जोस सिल्व्हा चे सिल्व्हा मेथड ऑफ माइन्ड कन्ट्रोल हे पुस्तक वाचुन पहा. यात अशा मानवी मेन्दुच्या अतीन्द्रीय क्षमतेबद्दल बरेच काही सप्रयोग लिहिले आहे.

होसे.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

घाटावरचे भट's picture

13 Jan 2009 - 12:54 am | घाटावरचे भट

उच्चाराच्या दृष्टीने हा जास्त जवळचा वाटतो.

प्रमोद देव's picture

11 Jan 2009 - 7:47 pm | प्रमोद देव

आमचेही काही चमत्कार इथे वाचा. ;)

मृण्मयी's picture

11 Jan 2009 - 10:16 pm | मृण्मयी

अतिंद्रीय शक्तीचं माहिती नाही, पण आई झाल्यापासून आम्हास दिव्यदृष्टी प्राप्त झालीय हे नक्की.

रविवारी मटणरश्श्याचा हंडा रटरटायला लागला की आम्ही आधी एक पोछा तयार ठेवतो, त्यानंतर पुदिनहर्‍याची बाटली शोधून गळक्या नळाखाली बादली लावतो. कारण दिव्यदृष्टीमुळे आम्हास खालील गोष्टी आधीच कळलेल्या असतात :
नको तितकी हाडकं खाऊन कुत्रं घाण करणार!
नको तितक्या पोळ्या आणि रस्सा खाऊन कार्टं "आई मळमळतं" म्हणून बोंबलणार.
आणि वाडगंभर मटण आणि ताटभर भात रिचवून आमचं सोंग अख्खी दुपार कुंभकर्णासारखी ताणून देणार...
गळका नळ गळतच रहाणार!!!

संदीप चित्रे's picture

14 Jan 2009 - 2:43 am | संदीप चित्रे

जियो.... एकदम सह्ही रविवार :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रमेय's picture

13 Jan 2009 - 4:42 am | प्रमेय

अस्मादिकांनाही काही विशिष्ट अनुभव आले आहेत.
१. वेळ :अंतिम वर्षाला असतांना.
स्थळः कॉलेज कटटा.
मी, आमची एक वर्ग मैत्रीण आणी इतर मित्र-मैत्रीणी बोलत होतो. भरपुर विषय चालले होते. अचानक मी तिला तिरीमिरीने म्हणालो "एकतर तू पदव्युत्तर शिक्षण घेशील आणि छान २-३ वर्षे लग्न न करता मजेत राहशील किंवा तुझे ६ महिन्यात लग्न होईल."
आर्श्चय म्हणजे ती खूप हुशार मुलगी होती आणि तिचे (कॉलेजात तरी) कोणतेही प्रकरण नव्हते. अगदी साधी सरळमार्गी मुलगी होती ती!
बाकी सगळे मित्र म्हणाले "काय भावा? सकाळ पासून कोणी मिळाले नाही का? ती कशाला लग्न करेल लवकर? शिकणारच ती!"
मी म्हणालो "ठीक आहे, दिल्ली कही दूर नाही!"
आणि ४थ्या महिन्याला तिची पत्रिका हजर! अरेंज मॅरेज!
तिनेच सांगितले "माझा कोणताच विचार नव्हता. घरचे म्हणाले ,जरा भेट तरी; म्हणुन फोनवर १-२ तासा गप्पा मारल्या आणि मला तो आवडून गेला. दुसरया दिवशी जरा जास्त गप्पा मारल्या आणि टेक्नीकल बोललो."
"मग?"
"मी जरा पर्सनल विचारले. मला शिकायचे झाले तर काय वगैरे?"
तो म्हणाला "तर काय, शिकायच. माझी ना नाही."
"मग मी घरच्यांशी बोलले; म्हणाले मला तो आवडला आहे आणि मी लग्न करायला तैयार आहे."

दुसरया दिवशी मित्र घरी हजर..."काय बुवा, काय झालं? आज सकाळी सकाळी?"
"तू म्हणालास तसं झाल बघ!"

२. वेळ: १२ची (रात्री नव्हे दिवसा), परिक्षेची
स्थल: तोच कॉलेज कट्टा.
मित्र तयारीवर अन्तिम हात फिरवत होता आणि आम्ही सूत्रे घोकित होतो...
अचानक मी " मित्रा तो ऑपशनला टाकलेला धडा कोणता? तो येणार आज!"
तो, दोन वेळा परत परीक्षा दिल्याने माहितिगार "डर मत यार!"
"ओके, हा formula पाठ करच. हे येणार!"
"ओके"
आणि काय आश्चर्यम ५वा प्रश्न हाच!
परत बाहेर आल्यावर "थैंक्स यार... आज पास हो जाऊंगा..."
मी "कुछ बात नाही यार..."
आणि अचानक मी "आज गाड़ी पे म़त जा. बससे चला जा. गाड़ी बादमे लेके जा."
तो "क्यूँ? गाड़ी तेरेको चाहिए क्या? चाहिए तो बोल ना यार. शर्माता क्यूँ है?"
मी "तस नाही. I have bad feeling about you driving today."
हो नाही, हो नाही करता करता तो मित्राबरोबर गाड़ी घेउन जायला तयार झाला.
मी नको नको म्हणत होतो, पण नाही...

मला काळजी आणि संध्याकाळी मित्राचा फोन...
" यार, तेरी बात सुनानी चाहिए थी. रस्त्यात जाम ट्राफिक होता म्हणुन लॉन्ग कटने गेलो आणि रस्त्यात म्हशी! त्यांना चुकवायचे म्हणुन जरा बाजुला गाड़ी घातली तर गाड़ी चिखलात! शेजारीच तारेच कम्पौंड होतं आणि म्हशी पण जरा जास्तच जवळ आल्या. जरा वाचलो बघ. नाही तर आज डोळे किंवा हाथ पाय धारातीर्थी पडलेच होते."

इति अलम...

आमची कोठेही शाखा नाही, एवढा खराब धंदा?

मोहन's picture

13 Jan 2009 - 5:17 pm | मोहन

अनेक लोक नर्मदा परिक्रमा करतात. त्यांना बरेच अतिंद्रीय अनुभव आलेले वाचले आहेत. जगन्नाथ कुंट्यांचे "नर्मदे हर" पुस्तक वाचण्या सारख आहे. ( वेगळे अनुभव हा त्यातला फारच छोटा भाग आहे.) मला एका बैठकीत संपवावेसे वाटले.

मोहन

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Jan 2009 - 8:08 pm | डॉ.प्रसाद दाढे

नर्मदे हर हर व त्याच लेखका॑ची इतर पुस्तकेही अतिशय वाचनीय आहेत. नर्मदा परिक्रमा पायी एकदा करणेही दुष्कर आहे पर॑तु श्री. कु॑टे या॑नी तब्बल चार वेळा केली आहे. त्या॑चे अनुभव खरोखर॑च वाचनीय आहेत. ह्यावरील पूर्वी झालेली चर्चा इथे पाहा.
http://www.misalpav.com/node/682
मी एक विज्ञानाचा विद्यार्थी होतो व राहीन. वैद्यकीय अभ्यास करताना व गेले नऊ वर्षे विविध प्रकारचे रूग्ण, उपचार, शस्त्रक्रिया, त्या॑चे नातलग व रूग्णालयातले अनुभव खूप शिकवून गेले. (अजुनही शिकायला मिळत॑च) तसेच मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये काम करता॑नाही ईश्वरी शक्तीबद्दलचा विश्वास दुणावतच गेला. काही अति॑द्रिय शक्ती॑चे अनुभवही आले. अश्या काही शक्ती निश्चीत आहेत.
काही शास्त्रे अचूक असू शकत नाहीत. ठळक उदाहरण म्हणजे वैद्यकीय शास्त्र. निदान करता॑ना वा शस्त्रक्रिया करता॑ना नेहमीच कागदावरचे गणित वा पुस्तकातल्या गोष्टी कामी येत नाही. अनेकदा अ॑तःप्रेरणा मदत करते. मला तर असे अनुभव प्रत्यही येतात. पण माझे जाऊ दे, जे॑व्हा डॉ. बी.एन्.पुर॑दरे॑सारख्या जगविख्यात सर्जनला असे अनुभव येतात ते॑व्हा इतरा॑ची काय कथा? (पाहा: आत्मचरित्र-शल्यकौशल्य)
अश्या अनेक प्रतिथयश व कर्तबगार फिजिशियन, सर्जन्सचे असे अनुभव 'डॉक्टर्स ऍन्ड पेशन्ट्स' ह्या पुस्तकात वाचावयास मिळतील. (माझ्याकडे त्याची एक दुर्मिळ प्रत आहे.)
बाकी विज्ञाननिष्ठ म्हणवून घेणार्‍या॑च्या अह॑काराबद्दल मला काहीच बोलायचे नाही.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2009 - 12:00 am | प्रभाकर पेठकर

उत्तम आणि प्रामाणिक प्रतिसाद.
फक्त शेवटचे वाक्य नको होते.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

अरुण जाधव's picture

19 Feb 2009 - 9:21 pm | अरुण जाधव

होय !अस घड्त हे मात्र खर आहे. समजा अशी शक्ति असेल तर ति वाढविण्या साठि कोणि मार्ग् दर्शन करेल काय?

रोचक धागा. सावकाशीने वाचतो आहे.
एक जुना धागा: (यात विविध मिपाकरांनी सांगितलेले अनुभव 'अतिंद्रीय' या सदरात गणता येतील).

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव
http://www.misalpav.com/node/19073

अर्धवटराव's picture

30 Jun 2012 - 12:35 am | अर्धवटराव

विथ ऑल माय इंद्रीय-नॉन इंद्रीय-अ‍ॅण्ड अतिंद्रीय शक्तीज :D

अर्धवटराव

धागा वर आलाच आहे तर पुनः प्रतिसाद लिहिण्याचा मोह आवरत नाही.

धागा विषयाशी संबधीत असलेले म्हणून वानगीदाखल खालील उदाहरण पुरेसे ठरावे:

एडगर केसी नामक व्यक्तीबद्दलचे असे अनुभव लिहून ठेवलेले आहेत.
पुस्तकाचे नाव -
Many Mansions: The Edgar Cayce Story on Reincarnation (Signet) [Gina Cerminara, Hugh Lynn Cayce]

एडगर केसीबद्दलची माहिती
http://en.wikipedia.org/wiki/Edgar_Cayce

राघव

रोचक धागा आणि प्रतिसाद, अजून कोणाचे काही अनुभव असतील तर वाचायला आवडतील.

विनायक प्रभूंना मनापासून धन्यवाद, हा महत्त्वाचा लेख लिहिल्याबद्दल.

शिर्डीच्या साई बाबांनाही अतिंद्रिय शक्ती होती. शिर्डित येण्यापुर्वी त्यांनी शिर्डिच्या पाटलाची हरवलेली घोडी कूठे सापडेल हे अचुक सांगितले होते,ज्याला आपण चमत्कार मानतो.

युगंधर या पुस्तकात देखिल लेखकाने कॄष्ण देखिल साधा मानवच असुन त्याने अतिंद्रिय शक्ती वापरून बर्‍याच गोष्टी साध्य केल्याचे लिहिले आहे.

श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या एका भक्ताला त्याच्या कोठारातील साठविलेले धान्य सुगीच्या आधिच विकायला सांगुन खुप मोठ्या नुकसानापासुन वाचवल्याचे स्मरते, कारण त्या वर्षी ते पीम अमाप येवुन भाव गडगडले होते.

कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्‍या मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.

भृशुंडी's picture

19 Jul 2014 - 1:00 am | भृशुंडी

कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्‍या मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.

उत्तम सल्ला. खरंच असं करायला हवं. किती वित्त्/मनुष्य हानी टळेल नाही?

अवांतर - एवढा मोठा फायदा असूनही अजून असं काही कुठल्याही देशात झालेलं ऐकलं नाही (conspiracy theories मध्ये सुद्धा). ह्याचं कारण समजणं अवघड नाही!

मराठी कथालेखक's picture

21 Jul 2014 - 1:08 pm | मराठी कथालेखक

UPA सरकारनं जुना खजीना शोधण्यासाठी कुणा साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेवून खोदकाम चालू केले होते की. (की राम्देव आणि इतर बाबा भाजपकडे असताना आपणही हिंदू मतांसाठी काहीतरी स्टंट करावा म्हणुन केले कुणास ठावूक)
पुढे त्याचे काय झाले माहीत नाही. खजिना सापडला नाही इतकं मात्र नक्की. खोदकाम किती दिवस चालले, किती रुपयांचा चुराडा झाला आणि त्यामुळे हिंदू मते मिळालीत का *lol* ?

बबन ताम्बे's picture

21 Jul 2014 - 11:51 am | बबन ताम्बे

ही १९८० ची गोष्ट आहे. दहावीचा जीवशास्त्राचा पेपर सुरू व्हायच्या आधी एक तास मी २१ अपेक्षित उघडले आणि माझ्या लक्षात आले की एक आक्रुती (बहुतके बेडकाच्या कुठल्यातरी सिस्टीम बाबत होती) गेली पाच वर्षात विचारली नाही. बाकी सगळ्या आक्रुत्या विचारून झाल्यात. एका आक्रुतीला त्यावेळी ५ मार्क होते. मी आपले सहज मित्रांना बोलुन गेलो की बहुतेक ही आक्रुती आज पेपर मधे येईल. मित्रांनी विश्वास ठेवून ती आक्रुती पेपरच्या आधी घोटली. आणि काय आश्चर्य ! प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर बघितले तर नेमकी तीच आक्रुती विचारली होती. आम्हा सगळ्यांचे ५ मार्क फिक्स झाले :-)
पण ही काही माझी अतिंद्रिय शक्ती नव्ह्ती. मी पाच वर्षांचे पेपर बघितले, विचार केला आणि अंदाज बांधला.

मराठी कथालेखक's picture

21 Jul 2014 - 12:54 pm | मराठी कथालेखक

मला अतिंद्रिय शक्तींचा अनुभव नाही. पण अलिकडेच एका खास योगायोगाची कल्पना मी केली आणि तो तसाच घडला.
माझी एक अतिशय खास/जिवलग मैत्रीण आहे. तिच्या लग्नानंतर सुमारे एक वर्षानी ,२०१३ मध्ये ती गरोदर असल्याचे तिने मला सांगितले. महिना वगैरे पण सांगितला. आणि माझ्या मनात एक विचार चमकून गेला... तो म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिला मुलगी होणार. पुढे काही महिन्यानी फोनवर बोलताना तिने मला डॉक्टरांनी भाकित केलेली तारीख सांगितली. माझ्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतरची होती.
जून मध्ये माझ्या वाढदिवशी मी शुभेच्छांचे calls /sms घेण्यात व्यस्त असतानाच तिचा sms आला. तिला मुलगी झाली होती. (माझा वाढदिवस मात्र ती विसरली होती )