गुलाबी चांदणे

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
9 Jan 2009 - 1:18 pm

घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर
उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर
कुणी उकलले माझे आज गुपित गुपित
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर
गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

जयश्री अंबासकर

प्रेमकाव्यअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

9 Jan 2009 - 1:39 pm | मदनबाण

घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

व्वा.. :)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

मृगनयनी's picture

9 Jan 2009 - 1:58 pm | मृगनयनी

आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर

अ प्र ति म !

अजुन येऊ द्यात.

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Jan 2009 - 7:23 pm | चन्द्रशेखर गोखले

छान ,सुंदर , लाघवी कविता

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 7:55 pm | लिखाळ

छान कविता. आवडली.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2009 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

संपूर्ण कविताच सुंदर आहे, और भी आने दो !!!

-दिलीप बिरुटे

मीनल's picture

9 Jan 2009 - 8:32 pm | मीनल

मस्तच आहे .
मीनल.

प्राजु's picture

9 Jan 2009 - 9:04 pm | प्राजु

दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

सुरेख ओळी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

9 Jan 2009 - 9:05 pm | चतुरंग

बरेच दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली! वेगळाच आनंद देऊन गेली! :)

चतुरंग

जयवी's picture

9 Jan 2009 - 9:39 pm | जयवी

मदनबाणा, मृगनयनी, चंद्रशे़खर, लिखाळ, राजासाब, मीनल, प्राजु, चतुरंगा, तहे दिल से शुक्रिया :)

तुमचे प्रतिसाद मनाला खूप सुखावून गेले.

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 9:40 pm | श्रावण मोडक

वाटले शब्दांची सुंदर उधळण आहे. दुसऱ्यांदा वाचली आणि पोचली आतमध्ये. म्हणजे दोन्ही परिणाम साध्य.

संदीप चित्रे's picture

9 Jan 2009 - 10:43 pm | संदीप चित्रे

जियो जयश्री... खूप दिवसांनी तुझी कविता वाचली.
खूप आवडली हे सांगणे नलगे ! :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

विसोबा खेचर's picture

9 Jan 2009 - 11:52 pm | विसोबा खेचर

दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात

हम्म! नादावण्याचंही एक वय असतं! :)

असो,

जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..!

पण जयू, आज चाळीशीतही मी नादावला जातो त्याचं काय कारण असावं बरं? :)

तात्या.

जयवी's picture

10 Jan 2009 - 7:06 pm | जयवी

तात्या.........एकेकाची प्रकृतीच असते तशी ;)

शितल's picture

10 Jan 2009 - 8:48 am | शितल

जयवीताई,
खुप खुप सुंदर काव्यरचना.
प्रत्येक ओळ आणी ओळ आवडली.
:)

जयवी's picture

10 Jan 2009 - 7:05 pm | जयवी

श्रावण, संदीप, तात्या, शितल ...... मनापासून आभार :)

सुवर्णमयी's picture

10 Jan 2009 - 7:10 pm | सुवर्णमयी

जयश्री , कविता खूप आवडली.
सोनाली

पंचम's picture

11 Jan 2009 - 5:10 pm | पंचम

अप्रतिम!