तिचा मोकळा वावर

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
7 Jan 2009 - 5:25 pm

तिचा मोकळा वावर
तिचा मोकळा वावर
माझ्या अवती भवती
माझ्या रोमरोमातून

तिचे रोज येणे जाणे
माझ्या ह्रद्यी रहाणे
कशी जाइल ती दूर
तिचा मोकळा वावर

तिची रुणूझुणू चाल
पायी कळ्या होती फुलं
गंध फुलत्या फुलांचा
दाटे तिच्या सभोवार
तिचा मोकळा वावर

तिच्या जीवघेण्या अदा
सारे जग होइ फीदा
परि माझीच ती सदा
माझ्या डोळ्याची झालर
तिचा मोकळा वावर

तिचे बोलणारे डोळे
जणू चांदणे कोवळे
त्या डोळ्यांमध्ये खेळे
माझ्या प्रेमाची पाखंर
तिचा मोकळा वावर

तिचे माझे एक होणे
नभ धरती मिळणे
माझ्या मनातिल गाणे
येइ तिच्या ओठावर
तिचा मोकळा वावर

अशी तीची माझी साथ
किती युगांच हे नात
माझे ह्रद्य छेडते
तिच्या ह्रद्यी सतार
तिचा मोकळा वावर

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

झेल्या's picture

7 Jan 2009 - 5:55 pm | झेल्या

तिचे माझे एक होणे
नभ धरती मिळणे

ऐवजी

तिचे माझे एक होणे
नभ धरेसी मिळणे

कसे आहे?

इतर कडव्यांमध्ये वावर शी यमक साधले आहे.. पहिल्याच कडव्यात का नाही?

कविता ठीकठाक.
(...शुद्धलेखन...?!)

-झेल्या
काय वाट्टेल ते...!
विसंगतींचे संदर्भ...!

पुष्कराज's picture

8 Jan 2009 - 6:38 pm | पुष्कराज

धन्यवाद