माझे मन.....

sanjubaba's picture
sanjubaba in जे न देखे रवी...
3 Jan 2009 - 5:03 pm

ही कविता पूर्णपणे माझी नाही. कुठेतरी मी हिंदीत ही कविता अर्धवट एकलेली आहे पण त्या दिवशी दुपारी अचानक माझ्या गुणगूणण्यातून
ही छोटी शी कविता तयार झाली. हिची सुरवात जर सोडली तर ती पूर्णपणे नवीन आहे.
ही कविता चाली त तर फारच छान वाटते.
माझे मन.....

पाण्यासम निर्मल हो
माझे मन......माझे मन......
पृथ्वी स म अविचल हो
माझे मन......माझे मन......

कधी रात्र येता अंधारी
घेई प्रकाशाकडे भरारी
देई मना स नवी उभारी......
माझे मन......माझे मन......

सुर्या स म तेजस हो
माझे मन....माझे मन....
चंद्रासम शीतल हो
माझे मन.......माझे मन....

मोह मत्सरास सारी दूर
अंतरी करुणेचा पूर
जीवनास देई नवा सूर
माझे मन.....माझे मन.....

द व बिंदू स म नितळ हो
माझे मन......माझे मन.....
पाण्यासम निर्मल हो
माझे मन......माझे मन......

मुक्तकविरंगुळा