तो माणूस भणंग होता

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
3 Jan 2009 - 1:40 pm

निराधार माझे स्वत्व बुडवताना
पाण्यातून उठला तो 'माझा'च तरंग होता
.
चित्रातला मी अर्थ शोधताना
मज सापडला जो रंग तवंग होता
.
आरश्यात आपुला भाव पाहताना
परि दिसला मज तो मनुष्य कबंध होता
.
पळभर मनी जगलो लाख मरताना
जन म्हणतील तो माणूस भणंग होता

मुक्तकविरंगुळा