सनिल चारोळ्या छान आहेत पण असं वेगळं लिहिण्यापेक्षा कवितेच्या स्वरुपात लिही ना...तुला विणीत लिहायचं असेल तर प्राजूने त्यासाठी वेगळं सदर चालू केलं आहे त्यात लिहून बघ्...आम्हाला वाचायला आवडेल!!!
धन्यवाद तुम्हा सर्वांचे, प्रतिसाद दिल्या बद्दल. मी निच्छितच प्राजुच्या वि़णी मध्ये लिहीणार आहे, पण हा धागा मी याचसकेलासुरू केला, कारण ह्या मध्ये फक्त "आयुष्य तेच आहे" ह्या विषयावर मी चारोळ्या लिहीणार आहे.
आयुष्य तेच आहे
आयुष्य तुझेच आहे
अरे पण म्हणून कितीवेळा
असेच अजुन लिहणार आहे
ह. घ्या :-) हे असे एकापुढे एक लिहीत बसण्याचे प्रयोजन कळले नाही बॉ?
सनिलराव, 10 Jan 2008 - 11:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्य तेच आहे,
अन हाच पेच आहे.
पुढे काही सुचेना. अवघड आहे बॉ चार-चार ओळी लिहिणे.
आणि तेही आयुष्य तेच आहे , आयुष्य तेच आहे असे म्हणत पुढील ओळी सुचणे.......!
म्हणजे कबड्डी कबड्डी म्हणत खेळाडूला बाद करुन बोनस प्वॉइंट आणण्यासारखे कठीण कौशल्य वाटले, बाकी तुझे चालू दे ! :)
एकतर बहुतेकांना कविता कळत नाही. ज्यात मी आहे. त्यात तत्त्वद्नान. पचायला जड जाते भौ. म्हणूनच प्राजुताईनी वेगळे सदर सुरू केले असावे. शुभेच्छा. पुढील कवितांना व सदराला देखील.
प्रतिक्रिया
7 Jan 2008 - 10:43 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
लेखणीलाच धार आहे
आयुष्याच्या प्रत्येक घटनेला
गीतेचं सार आहे
@ सनिल
7 Jan 2008 - 10:44 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
हलके फुलकेच आहे
आठवणी राहील्या मागे
समाधान इतुकेच आहे
7 Jan 2008 - 10:46 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
मी वेगात चाललो आहे
संवाद माझा साऱ्यांशी
माझ्याशी कुठे बोललो आहे
@ सनिल
7 Jan 2008 - 10:47 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
मी थकलो जरा आहे
तसा मी बरा आहे
कमरेत वाकलो जरा आहे
@ सनिल
7 Jan 2008 - 10:59 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
हास्य बरेच आहे
आनंदाचाही निघतो अश्रूं
हेही खरेच आहे
@ सनिल
8 Jan 2008 - 1:23 am | प्राजु
पण असे वेगवेगळे का लिहिलेस? एकत्रच लिहिना.
- प्राजु.
8 Jan 2008 - 1:57 am | इनोबा म्हणे
सनिल चारोळ्या छान आहेत पण असं वेगळं लिहिण्यापेक्षा कवितेच्या स्वरुपात लिही ना...तुला विणीत लिहायचं असेल तर प्राजूने त्यासाठी वेगळं सदर चालू केलं आहे त्यात लिहून बघ्...आम्हाला वाचायला आवडेल!!!
(कवितेत रमलेला) -इनोबा
8 Jan 2008 - 1:59 am | प्राजु
विनोबांशी सहमत आहे मी. लवकर लिही सनिल विणीमध्ये.
- प्राजु.
10 Jan 2008 - 10:19 pm | सनिल पांगे
धन्यवाद तुम्हा सर्वांचे, प्रतिसाद दिल्या बद्दल. मी निच्छितच प्राजुच्या वि़णी मध्ये लिहीणार आहे, पण हा धागा मी याचसकेलासुरू केला, कारण ह्या मध्ये फक्त "आयुष्य तेच आहे" ह्या विषयावर मी चारोळ्या लिहीणार आहे.
10 Jan 2008 - 10:20 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
कुटुंबासाठी दूर वसावं लागतं
"कसा आहेस" विचारल्यावर
अश्रूं गिळून हसावं लागतं
@सनिल
10 Jan 2008 - 10:20 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
मी वेगात चाललो आहे
संवाद माझा साऱ्यांशी
माझ्याशी कुठे बोललो आहे
@सनिल
10 Jan 2008 - 10:21 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
धावपळ ही कश्यासाठी
लाकडाचा गुणधर्म कळला
हाती जशी आली काठी
@सनिल
10 Jan 2008 - 10:21 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
शेवटी फक्त स्मृती उरतात
आठवणींचा पोषाक परीधान करून
गेलेल्यांच्या मग आकृती फिरतात
@ सनिल
10 Jan 2008 - 10:21 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
तडजोड ही करावीच लागते
नियतीच्या व्यापारा पुढे
फाटकी ओंजळ धरावी लागते
@सनिल
10 Jan 2008 - 10:22 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
चमकतो कधी भाग्याचा तारा
पण, आयुष्य नशीबावर लादणं
मग होतो खेळ खंडोबा सारा
@सनिल
10 Jan 2008 - 10:23 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
मी जळतो कापूर होऊन
वाटलं का निघावं इथून
एखादाही अवशेश ठेवून
@सनिल
10 Jan 2008 - 10:24 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
कधीतरी राख होणेचं आहे
कोणाच्या तरी आठवणीत
फिनीक्साचा जन्म घेणेच आहे
@सनिल
10 Jan 2008 - 10:28 pm | सहज
आयुष्य तेच आहे
आयुष्य तुझेच आहे
अरे पण म्हणून कितीवेळा
असेच अजुन लिहणार आहे
ह. घ्या :-) हे असे एकापुढे एक लिहीत बसण्याचे प्रयोजन कळले नाही बॉ?
10 Jan 2008 - 11:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्य तेच आहे,
अन हाच पेच आहे.
पुढे काही सुचेना. अवघड आहे बॉ चार-चार ओळी लिहिणे.
आणि तेही आयुष्य तेच आहे , आयुष्य तेच आहे असे म्हणत पुढील ओळी सुचणे.......!
म्हणजे कबड्डी कबड्डी म्हणत खेळाडूला बाद करुन बोनस प्वॉइंट आणण्यासारखे कठीण कौशल्य वाटले, बाकी तुझे चालू दे ! :)
11 Jan 2008 - 10:13 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
जगतात सगळे आहे
फक्त प्रत्येकाच्या जिवनशैलीचे
नाव वेगवेगळे आहे
@सनिल
13 Jan 2008 - 5:51 pm | सुधीर कांदळकर
एकतर बहुतेकांना कविता कळत नाही. ज्यात मी आहे. त्यात तत्त्वद्नान. पचायला जड जाते भौ. म्हणूनच प्राजुताईनी वेगळे सदर सुरू केले असावे. शुभेच्छा. पुढील कवितांना व सदराला देखील.
13 Jan 2008 - 9:10 pm | सनिल पांगे
आयुष्य तेच आहे
नाती गुंफत राहतात
नात्यांच्या ह्या धाग्यात
मन गुंतत जातात