मंडळी,
मला काही वर्षांपूर्वी फेसबुकमुळे छंद जडला - जगभर पाळीव म्हणून मनुष्याच्या संपर्कात वाढलेल्या प्राण्य़ांची रिल्स मधून निरिक्षणे करण्याचा. यात मुख्यत्वे कुत्री आणि इतर प्राणी, पक्षी यांचा समावेश होता. यापूर्वी मी अनेक नामवंत मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतला होता. फेसबुक वरील रिल्स मुळे डेस्मण्ड मॉरीसच्या अनेक निरीक्षणावर शिक्कामोर्तब झाले. उदा० क्रॉस स्पिसीज मेटींग, प्राण्यांमध्ये पण हस्त/स्वमैथुनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती अ्सतात, हे बघायला मिळाले. प्राण्यांच्या मुख्य गरजा (अन्न, निवारा, संरक्षण) पूर्ण झाल्या की ते माणसाशी मैत्री करतात आणि नव्या गोष्टी शिकतात, असे लक्षात आले. माझ्या निरीक्षणात्मक अभ्यासात असे लक्षात आले की माणसाच्या संपर्कात आल्यामुळे कुत्रा वेगाने उत्क्रांत होत आहे आणि त्याची उत्क्रांती अचंबित करणारी आहे.
मी पूर्णपणे स्वतंत्रपणे केलेल्या निरीक्षणावर आधारित एक लेख समाजमाध्यमांवर जून २०२४ मध्ये एक लिहीला होता. हा लेख म०टा०ने त्यांच्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध केला होता.
https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/modern-dogs-near-human-b...
"माणसाच्या संपर्कात आल्यामुळे कुत्रा वेगाने उत्क्रांत होत आहे " या माझ्या स्वतंत्रपणे केलेल्या दाव्याला शास्त्रज्ञांनी आता पुष्टी दिल्याचे वृत्त आजच वाचनात आले.
https://www.freejupiter.com/scientists-say-dogs-are-entering-in-a-new-st...
तसेच "महानगरे कीडकी प्रजा निर्माण करत आहेत" आणि "चीनी वंश हा जनुकीयदृष्ट्या श्रेष्ठ वंश आहे" या माझ्या दाव्याना पण विज्ञान पाठिंबा देईल याचा मला विश्वास आहे!
कुत्र्यांच्या उत्क्रांतीमधून माणसाला एक महत्त्वाचा संदेश मिळतो आणि त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे - महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यावर कुत्र्याच्या प्रत्येक योग्य कृतीला मालक बक्षिस देतो, लाड करतो. मग कुत्रा माणसाला आपले सर्वस्व देतो. पण माणसाला त्याच्या योग्य कृतीबद्दल बक्षिस/शाबासकी कधीच मिळत नाही. पण प्रत्येक चुकीला शिक्षेचे भय असते. यामुळे मानवी जीवन वैफल्यग्रस्त बनायला जास्त बळ मिळते.
मी बरोबर ठरलो, याच्या मला परत एकदा गुदगुल्या झाल्यामुळे मी खुषीत आहे.
प्रतिक्रिया
5 May 2025 - 12:33 am | nutanm
छान लेख.
5 May 2025 - 1:17 am | प्रसाद गोडबोले
5 May 2025 - 10:19 am | सौंदाळा
चपखल