राम राम मंडळी,
सध्या मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे. सदर आणिबाणीच्या अध्यक्षीय अधिकारात आम्ही खालील वटहुकूम जारी करत आहोत त्याचे सर्वांनी पालन करावे ही नम्र विनंती..
सदर वटहुकूमाचे पालन न करणार्या सभासदाचे लेखन उडवले जाईल तसेच त्याचे मिसळपाववरील सभासदत्वही रद्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही!
तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे व आजपर्यंत सुरू असलेले मिसळपाववरील हसतेखेळते व सुदृढ वातावरण बिघडवू नये ही विनंती!
वटहुकूम -
आज दिनांक ६ जानेवारी, २००८ रोजी, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्रौ ११ वाजल्यापासून मिसळपाववर व्याकरण आणि शुद्धलेखन संदर्भातील कुठल्याही लिखाणाला संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
तूर्तास तरी ही बंदी अनिर्बंध काळाकरता सुरू राहील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी...
मिसळपाववरील निरागसता आणि साधेपणा हरवू नये या दृष्टीने हा वटहुकूम जारी करण्यात येत आहे याचीही कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
दरम्यानच्या काळात मिसळपाववरील कथा, काव्य आदी ललित लेखन तसेच इतरही वैचारिक लेखन आणि त्या संदभातील प्रतिसादांची देवाणघेवाण अबाधितपणे सुरूच राहील, नव्हे मिसळपाववर या सगळ्याचं स्वागतच असेल, याचीही कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती...
कळावे,
आपला नम्र,
सरपंच.
प्रतिक्रिया
7 Jan 2008 - 7:42 am | व्यंकट
>>आज दिनांक ६ जानेवारी, २००८ रोजी, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्रौ ११ वाजल्यापासून मिसळपाववर व्याकरण आणि शुद्धलेखन संदर्भातील कुठल्याही लिखाणाला संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जशी आपली विच्छा. आम्ही तसा काही कुठल्या चर्चेत फारसा सहभाग घेत नाही आणि शुद्धलेखनाचे फारसे नियम पाळत नाही, परंतु ,शुद्धलेखनासंबधी लेखन आणि मिसळपाव वर लेखन करतांना शुद्धलेखनासंबधी चे नियम पाळा असे म्हणणे यात अंतर आहे.
7 Jan 2008 - 8:10 am | झंप्या
तुम्ही म्हणताय तर आजपासून शुद्धलेखनाची पार काशी!!
-सबका डॉन एक
आणिबाणीत एखादी बोलीभाषेतली शिवी दिली तर चालेल का?
7 Jan 2008 - 11:04 am | इनोबा म्हणे
मा.सरपंच महोदय,
विषयः शुद्धलेखनावर घातलेल्या बंदीबद्दल धन्यवाद!
मा.सरपंच महोदयांनी शुद्धलेखना संदर्भात जो वटहुकुम काढला त्याबद्दल आम्ही त्यांचे 'तहेदिलसे शुक्रीया' करतो. हा 'फतवा' खरे तर आधीच काढायला हवा होता.या शुद्धलेखक मंडळींनी आम्हाला जो काहि मानसिक त्रास दिला यबद्दल आम्हाला त्यांच्याकडून 'हरजाना' मिळावा,अशी नम्र विनंती.
आपला विस्वासू,
इनोबा इनोदपूरकर
रा.मिसळ कॉलनी,मिसळापूर.
7 Jan 2008 - 11:49 pm | बिपिन कार्यकर्ते
लेखन फार नाही आमचे पण सरपंचांची इथले वातावरण हसतेखेळते ठेवायची कळकळ मात्र बरोबर आहे.
बिपिन.
7 Jan 2008 - 11:56 pm | बेसनलाडू
सरपंचांची इथले वातावरण हसतेखेळते ठेवायची कळकळ मात्र बरोबर आहे.
--- याच्याशी पूर्ण सहमत; मात्र शुद्धलेखन व त्यावरील नियमांवरील चर्चा वाचता ती माहितीपूर्ण तसेच रंजक असल्याचे जाणवले. त्यामुळे संबंधित लेखन हसतेखेळते वातावरण बिघडवेल, असे बिलकुल वाटत नाही. उलट संबंधित लेखन व त्या प्रकारच्या इतर लेखनाविरुद्ध असा वटहुकूम जारी करणे हा वैयक्तिक दुराग्रहाचा प्रकार आहे.
(हसताखेळता)बेसनलाडू
8 Jan 2008 - 1:00 am | चतुरंग
बंदीचे कारण कळले नाही की हो.
अहो शुध्दलेखनासारखी चर्चा टाळून तुम्ही पाठ्यपुस्तक महामंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळासारखे वागायला लागलात असे वाटते.
कोणी कोणाच्या लिखाणावर वैयक्तिक टीका करु नये परंतु माहितीपूर्ण आणी रंजक असलेली चर्चा थांबवून काय साधले ते न कळे.
चतुरंग
8 Jan 2008 - 6:51 am | विजय.पाटील
इथले सभासदत्व मी नुकतेच स्विकारले असले तरी अतिथी बनून मी इथे बरेच वाचन केले आहे त्यावर आधारीत मनात काही विचार आले ते मांडतो.
कोणत्याही ठीकाणचे खेळीमेळीचे वातावरन खालील कारणांनी बिघडते,
१) अर्वाच्य शिवीगाळ आणि त्याचे आडमुठे समर्थन
२) संकेतस्थळाशी संबधीत नसलेल्या व्यक्तिंचे उल्लेख आणि अनावश्यक आग पाखड
३) लोकशाहीचे विसर्जन आणि हुकुमशाहीचे अलंबन
४) संकेतस्थळावरील अनेक सदस्यांचे अचानक अवागमन
ह्या सर्व गोष्टींची योग्य ती दखल योग्य वेळीच घेऊन आणि त्यावर तत्पर कृती करूनच इथले सरपंच सर्वांसमोर त्यांची कळकळ दाखवू शकतील. अनेकांना आवडलेली आणि रंगलेली चर्चा निव्वळ आपण मालक आहोत ह्या भूमिकेतुन बंद पाडून आणि खुद्द चर्चा प्रवर्तकाला माफी मागायला लावून हे साध्य होणार नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच आपला दुराग्रह अनाठायी आहे ह्याची जाणीव आपल्याला असेलच अशी आशा करतो.
-विजय पाटील.
पहिल्या वहिल्या संमेलनाच्या घोषणेला वाजलेल्या बहुसंख्य नकारघंटा देखिल ह्याचेच द्योतक आहेत ह्याची नोंद देखिल सरपंच घेतील अशी अपेक्षा आहे
8 Jan 2008 - 8:13 am | विसोबा खेचर
विजयराव,
तुम्ही नका काळजी करू या संस्थळाची! ते आम्ही आमची हौस म्हणून काढलं आहे आणि ते चालवायला आम्ही समर्थ आहोत!!
आणि दुर्दैवाने नाहीच चालवू शकलो तर फार फार तर काय होईल? बंदच पडेल ना?? पडू देत तिच्यायला!! कोई फिकीर नही!
परंतु जो पर्यंत आमच्या जिवात जीव आहे तो पर्यंत आम्ही ते चालवायचा प्रयत्न करू! इथे जे येतील, लिहितील, वाचतील, त्यांचं स्वागतच आहे! इथे न येणार्यांचंही आम्हाला कौतुक आहे! :)
इथले सभासदत्व मी नुकतेच स्विकारले असले तरी अतिथी बनून मी इथे बरेच वाचन केले आहे त्यावर आधारीत मनात काही विचार आले ते मांडतो.
इथे नेहमी अतिथी म्हणून येत असल्याने तुम्हाला या संस्थळाच्या बर्याचश्या घडामोडींचीही माहिती दिसते आणि एकंदरीतच या संस्थळाबद्दल तुमचा सूर तक्ररीचाच दिसतो आहे. असं असतानादेखील आपण येथील सभसदत्व घेतलंत याचं नवल वाटतं! :))
हरकत नाही, आता आलाच आहत तर रहा निवांतपणे. आम्ही काही आपल्याला जा असं सांगणार नाही! :)
मिसळपाववर आपलं स्वागत आहे..!! :)
तात्या सरपंच.
8 Jan 2008 - 12:01 pm | इनोबा म्हणे
पाटीलसाहेब,
शुद्धलेखनाबाबत काढलेल्या वटहुकुमावर व्यक्त केलेली नाराजी सर्व गावकरी समजू शकतात,पण याचा संबंध इतर गोष्टींशी जोडण्याचे कारण काय?
संमेलनाला आलेले नकार हे गावकर्यांच्या वैयक्तीक अडचणीतून आलेले आहेत.बहूतेक सदस्य हे पुण्यापासून दूर राहणारे व कामधंदे(तुमच्यासारखे नव्हे) करणारे असल्यामुळे वेळेअभावी उपस्थीत राहू शकत नाहीत,त्यामुळे त्याचा संबंध इथे जोडण्याचे खरेतर काही कारणच नव्हते,उलट अशा प्रकारचे आरोप करुन तुम्ही स्वतःभोवती संशयाचे वलय निर्माण करुन ठेवले आहे.आमचे कित्येक 'शेजारी' असेच अधूनमधून येऊन,इथे आग लावून जातात.
-इनोबा
10 Jan 2008 - 12:17 pm | विजय.पाटील
विनायकजी तुमचा संशय मी कसा दुर करू शकतो ते कळावे.
8 Jan 2008 - 9:11 am | प्रमोद देव
सदर वटहुकूमाचे पालन न करणार्या सभासदाचे लेखन उडवले जाईल तसेच त्याचे मिसळपाववरील सभासदत्वही रद्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही!
हे जरा 'अती'च होतेय असे वाटतेय.
तात्या शुद्ध लेखनाचे नियम कुणी पाळावे,किती पाळावे ह्या बाबतीत मतभेद असणे समजू शकते पण वर जे काही तू म्हटले आहेस ही शुद्ध हुकुमशाही झाली आहे. ज्या कारणासाठी तू इथे आणीबाणी घोषित केलीस ती कारणे एकवेळ समजण्यासारखी होती;पण नवनवीन नावांनी एकच व्यक्ती(हा आमचा संशय आहे आणि बर्याचशा सभासदांचे त्या बाबतीत एकमत आहे) इथे प्रतिसादांची धुळवड उडवतेय त्या बद्दल मालक म्हणून कोणतीही कारवाई तू केलेली दिसत नाहीयेस.
तात्या तुझ्यातल्या सद्गुणांचे मी नेहमीच जाहीरपणे आणि खाजगीमध्येही कौतुकच केलेले आहे आणि करत राहीन.पण तुझे काही दुराग्रह मात्र ह्या सद्गुणांना पार मोडीत काढायला निघालेत हे पाहून मनाला क्लेष होतात. तुझ्यातल्या गुणांमुळेच इथे तुझ्या अवतीभवती जमलेल्या आमच्यासारख्या तुझ्या मित्रांच्या मतांची कदर करायची की त्यांच्या भावनांचा अनादर करायचा हे तू काय ते नक्की ठरव.
गाण्याच्या व्याकरणाच्या बाबतीत सोवळा असणारा तू लिखाणाच्या व्याकरणाच्या बाबतीत इतका दुराग्रही का ते कळत नाही. मला स्वतःला देखिल गाण्यातले व्याकरण कळत नाही पण म्हणून ते नियमच जाचक आहेत असे मी म्हणणार नाही. फार तर माझ्यापुरते ते नियम मी पाळणार नाही पण त्यावर इतरांनी बोलूच नये अथवा ते मला ऐकवू नयेत हे म्हणणेही अजिबात समर्थनीय नाहीये.
तेव्हा विचार कर.अविचाराने खरे मित्र गमवू नकोस. आणि एक लक्षात ठेव निव्वळ स्तुती करणारेच आपले खरे मित्र आहेत असे तुला वाटत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. वेळप्रसंगी तुझ्या हितासाठी तुझ्या रागालोभाची परवा न करता जे तुला तुझ्या भल्यासाठी दोन शब्द सुनावू शकतात तेच खरे मित्र असतात.आता तू म्हणशील की "माझे हित कशात आहे ते मला व्यवस्थित कळतेय.ते इतरांनी मला शिकवायची जरूर नाही." तर मग बोलणेच खुंटले.
डॉक्टर प्राध्यापक दिलीप बिरूटें सारख्या एक सज्जन आणि सरळमार्गी मित्राला तू निष्कारण बोल लावलेस आणि माफी मागायला भाग पाडलेस ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्याबद्दल तुझा जाहीर निषेध करतो.
आता तरी जागा हो आणि खरा मित्र कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न कर!
हे संकेतस्थळ यशस्वी व्हावे असे वाटणार्या बहुसंख्य तुझ्या मित्रांना (होय मित्रांना!) तू निष्कारणपणे नाराज करतो आहेस. वेळीच जागा हो आणि चुकीच्या मार्गावरून दूर हो. अजूनही तुझी मित्र-मंडळी तुला योग्य साथ देण्यासाठी आतुर आहेत. फक्त वृथाभिमान आणि दुराग्रह सोड.
आजवर जाणते-अजाणतेपणाने तू केलेल्या चुकांची माफी मागून तुझ्या मित्रांना तू सहकार्याचे आवाहन केलेस तर ते नक्कीच तुझ्या सर्व चुका मोठ्या मनाने माफ करून पुनः इथे येतील आणि मग खर्या अर्थाने इथे खेळीमेळीचे वातावरण निर्माण होईल. तात्या तुला लवकरात लवकर अशी सुबुद्धी सुचो अशा हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो.
8 Jan 2008 - 9:28 am | बेसनलाडू
देवकाकांशी सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू
8 Jan 2008 - 8:11 pm | प्रकाश घाटपांडे
नाना पाटेकरांनी अनवृत्त पत्र एकदा बाळासाहेब ठाकरेंना लिहिले होते. त्याची आठवण प्र्मोदरावांच्या पत्रातून झाली . पण शेवट मात्र चांगला झाला, चला. प्रमोदरावांच्या लेखणीत "आत्मभान" देण्याची ताकद आहे हे आम्ही जाणुन आहोत.
प्रकाश घाटपांडे
8 Jan 2008 - 10:16 am | नीलकांत
व्याकरणाच्या नियमांचा व शुध्दलेखनाच्या कृत्रीम आग्रह , अनेक नवागतांना लिखानापासून परावृत्त करतो हे खरं आहे. त्यामुळे शुध्दलेखन व व्याकरणाच्या नियमांचा मिसळपाववर बाऊ केला जाणार नाही. हे इतपत ठिक आहे. पण शुध्दलेखन या विषयावर लिखान होऊच नये हे काही पटत नाही. माझं शुध्दलेखन या विषयाशी खुप सख्य आहे असं नाही. पण ते भाषेचे महत्वाचे अंग आहे हे मान्य आहे. आमच्या शुध्दलेखनाच्या तासाला आम्ही शाळेशेजारील शेतात बोरं चोरायला जायचो त्यामुळे लिहीताना शुध्दलेखनाचा खून होतो. त्याबद्दल खंत आहे.
मिसळपाव वर कुणी शुध्दलेखनाच्या नियमांचा वापर व्हावा , असा चर्चा प्रस्ताव टाकत असेल आणि तो काढल्या जात असेल तर काही नवल नाही. पण आपल्या मराठी भाषेच्या शुध्दलेखनाबाबत असलेल्या प्रस्तावाला हटवने काही पटलेले नाही.
सध्या आणिबाणी असल्याने काय होईल याचा नेम नाही.
बाकी प्रमोद काकांशी सहमत.
नीलकांत
8 Jan 2008 - 11:02 am | विसोबा खेचर
बर्याचश्या मेंबरांनी नाराजी व्यक्त केली आहे, तेव्हा त्यांचा आदर म्हणून आम्ही वटहुकूम मागे घेत आहोत! आता पुन्हा व्याकरण-शुद्धलेखनाच्या नावाने काय घालायचा तो गोंधळ घाला! :)
प्राध्यापक डॉ बिरुटे यांचा आम्ही अपमान केला आहे असंही काही मंडळींचं म्हणणं आहे. आम्हाला व्यक्तिश: तसं वाटत नाही कारण आमचा स्वभाव प्राध्यापक बिरुटेसाहेब जाणतात! तरीही आम्ही त्यांची जाहीर माफी मागत आहोत..
तात्या.
8 Jan 2008 - 11:20 am | इनोबा म्हणे
गावकर्यांनो...जाणते अजाणतेपणाने आम्ही तुमची मने दुखावली असतील तर 'मोठा' भाऊ समजुन माफ करा.
आम्हाला या विषयाचा तिटकारा जरुर आहे(हे आमचं वैयक्तीक मत्)पण म्हणून ज्यांच या विषयावर प्रेम आहे त्यांना आम्ही असं बोलायला नको होतो...यापुढे असल्या चूका होणार नाहीत याची काळजी घेऊ.तुमचं 'चिंगम'तुम्ही चावत रहा,आम्हाला काय करायचंय...
(चिंगम न खाणारा) -इनोबा
8 Jan 2008 - 11:09 am | धोंडोपंत
शुद्धलेखनाबाबत सरपंचांच्या वटहुकूमाशी आम्ही असहमत आहोत.
प्राध्यापकांनी अभ्यासूपणे लिहिलेल्या विषयाची परिणती या वटहुकूमात व्हायला नको होती असे आम्हाला मनापासून वाटते.
आम्ही आमच्या भावना सरपंचांपर्यंत दूरध्वनीने पोहोचविल्या आहेत आणि त्यांनी अत्यंत खुल्या मनाने हा वटहुकूम मागे घेण्यात येणार असल्याचे आम्हांला सांगितले आहे.
काही वेळा एखादी कृती, एखादा निर्णय घाईघाईत घेतला जातो, पण तो दुरूस्त करायला मनाचा मोठेपणा लागतो आणि तो आमच्या सरपंचांकडे निश्चितच आहे याची आम्हाला खात्री आहे.
झालेला विषय मागे टाकून मिसळपावाने पुढे जावे, हा विषय कुणीही चघळत बसू नये.
आपला,
(भविष्यवेधी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
8 Jan 2008 - 11:21 am | प्रमोद देव
वटहुकुम मागे घेतल्याबद्दल तात्याचे मन:पूर्वक अभिनंदन.
8 Jan 2008 - 11:37 am | सहज
हेच म्हणतो. वटहुकुम मागे घेतल्याबद्दल तात्या धन्यवाद!
शुद्धलेखनावर चर्चा चालु असताना पिजे आणी चारोळी देखील चालू होतेच त्यामुळे मिसळपाववरची निरागसता व साधेपणा नक्कीच टिकून होता. नंतर काहि "पीजे" तर जरा अति"निरागस" झाले होते.
प्रमोदकाकांच्या प्रतिसादावर अजून खोलवर विचार व्हावा. माणसे जोडली जावीत हीच सदिच्छा!
8 Jan 2008 - 11:51 am | बेसनलाडू
तात्यांचे व सर्व मिसळपावकरांचेही
(अभिनंदक)बेसनलाडू
8 Jan 2008 - 11:47 am | नीलकांत
आता सहजरावांशी सहमत... :)
वटहुकुम मागे घेतल्याबद्दल आभार.
नीलकांत
8 Jan 2008 - 7:58 pm | चतुरंग
राखल्याबद्दल तात्यांचे आणी मि.पा.करांचे अभिनंदन.
We cannot hope to scale great moral heights by ignoring petty obligations.
-Agnes Repplier
चतुरंग
8 Jan 2008 - 8:56 pm | मुक्तसुनीत
तात्या,
आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन एखाद्या चुकीच्या निर्णयाबद्दल दुरुस्ती करणे - विशेषतः एखाद्या "सरपंचाने" - या गोष्टीला धैर्य लागते. लोकाना तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम वाटते याचे कारण हेच , की ते तुमच्याकडे आहे. तुमचे अभिनंदन !
प्रमोदकाका, आमची विनंती आहे : जेव्हाकेव्हा आमच्या सगळ्यांपैकी कुणाचाही कान पिळायची वेळ येईल, तेव्हा त्यात अनमान नको. तुमच्यासारखे लोक हेच आमचे नैतिक होकायंत्र. तुमचे अनेक आभार.
8 Jan 2008 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वटहुकूम मागे घेतल्याबद्दल सर्वप्रथम तात्याचे आभार मानतो. दुसरे असे की लेखन थांबवल्याने आमचा अपमान वगैरे झाला असा तो अर्थ घेऊ नये. कारण तात्यांचा स्वभाव आम्ही जाणतो,तरी आमच्या मित्राने माफी वगैरे मागावी असे वाटत नाही. दुसरे असे की, वेगवेगळ्या संकेतस्थळाची काही धोरणे आहेत. पण, तात्याची ध्येय धोरणे कधी-कधी आम्हालाही कळत नाही.:) अर्थात लोकशाहीची स्थापना होइपर्यंत त्यांचे निर्णय आम्हास मान्यच आहेत.
त्याच बरोबर देव साहेबांची प्रतिक्रिया तर लाजवाब आहे, सहज, बेला, निलकांत,चतुरंग, आणि धोंडोपंत.....यांनी वटहुकूम लादल्याविषयी आणि त्यासोबत जी नाराजी व्यक्त केली होती त्या मतांशी आम्ही सहमत होतोच, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
शुद्धलेखन हा आमच्या आवडीचा विषय कधीच नव्हता आणि आजही नाही. पण, ती चर्चा बदलणा-या नियमांच्या बाबतीत होती. शुद्धलेखन करावे याबाबतीत नव्हती. आणि ती चर्चा उत्तम चाललेली होती. आणि दुसरे असे की शुद्ध लिहावे असा आग्रह आम्ही कधीच धरला नाही, कारण या शुद्धलेखनाच्या बाबतीत आम्ही किती अशुद्ध लिहितो हे सर्वांना ज्ञात आहे. प्रा.डॉ. च्या चुका काढायची काही दिवस तर शर्यतच लागली होती. शेवटी आमच्या लेखनाच्या चुका व्य. नि. ने आम्हाला कळवाव्यात असे आम्हास सांगण्याची वेळ आली होती. इतकेच काय, "लिहिलेले समजते ते शुद्धच असते या संप्रदायाचे आम्ही" :) असो, इतके खरडून आम्ही आमचे दोन शब्द संपवतो !!!:)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11 Jan 2008 - 8:42 am | झंप्या
बिरूट्या मस्त प्रतिसाद रे!
"तात्याची ध्येय धोरणे कधी-कधी आम्हालाही कळत नाही.:)"
हे बाकी सही बोललास भिडू!!
तुझाच,
सबका डॉन एक
8 Jan 2008 - 9:48 pm | प्रमोद देव
तुमच्यासारखे लोक हेच आमचे नैतिक होकायंत्र.
हे होकायंत्र आपल्या प्रत्येकाकडे असते. आपण ते बहुतेकदा वापरत नाही. पण खरी परीक्षा पुढेच असते. होकायंत्राने दाखवलेल्या दिशेला योग्य मानणे आणि त्याप्रमाणे आपली नाव सुखरुप किनार्याला लावणे हे उत्तम नावाड्याचे लक्षण आहे.
ह्या विशिष्ठ बाबतीत तात्याने त्या उत्तम नावाड्याची भूमिका अतिशय व्यवस्थित रित्या निभावलेली असल्यामुळे खरे धन्यवाद त्यालाच द्यायला हवेत असे माझे प्रांजळ मत आहे.अंगावर वादळे झेलणार्या उत्तम नावाड्यासारखी तात्या वादळे झेलत असतो आणि आमच्यासारख्या सामान्य प्रवाशांची पार घाबरगुंडी उडालेय ह्याची जाणीव होताच कुशलतेने नाव किनार्यावर आणतो.
9 Jan 2008 - 7:03 pm | अवलिया
च्यामायला हा तात्या आता लय वातारला हाय...
आणिबाणी काय अन काय वटहुकुम काय...
स्वतःचीच साइट असल्याप्रमाणे गोंधळ घालतोय लेकाचा....
बोला एकसुरात...
तात्याच्या बैलाला .........ः)ः)
(दोन महीने आधी शिमगा साजरा करणारा ) नाना
10 Jan 2008 - 2:59 am | इनोबा म्हणे
नान्या अरे ही साईट तात्याचीच आहे...आणि सरपंचाविरुद्ध असले शब्द वापरणे उचित नाही...
(मिपा प्रेमी) -इनोबा
9 Jan 2008 - 7:59 pm | स्वयम्भू (not verified)
ह्रस्व, दीर्घ, काना, मात्रा आणी वेलान्ट्यानच्या जन्जाळात भाषेला अडकऊ नका. तीला मुक्त पणे श्वास घेउ द्या.
सर्पन्च साहेबान्ना आम्चा फुल्ल्टू सप्पोर्ट आहे.
आपला,
स्वयंभू
10 Jan 2008 - 8:39 pm | सुधीर कांदळकर
मराठीला आपलबी आणुमोदण. पन या राज्कारनात आपुन सहबाघी न्हाई.
11 Jan 2008 - 8:39 am | झंप्या
ए तात्या एकदा काय ते सांगत जा बाबा!
"लेखण षुध्द लिवायच का नाही??"
च्यामारी वटहुकुम काय काढतोस त्या धोंड्यानं फोन केल्यावर तो मागं काय घेतोस?? आम्ही तुला पाठींबा देऊन तोंडावर पडलो की.
तुला आता मीच दुबईवरून फोन करतो बघ :)
सबक डॉन एक!
11 Jan 2008 - 8:48 am | llपुण्याचे पेशवेll
शुद्धलेखनापेक्षा भावना पोचणे महत्वाचे, मान्य. पण एखाद्याने सांगितली शुद्धलेखनाची चूक तर कुठे बिघडले ? शाळेप्रमाणे, येथे ती सुधारण्याचे बंधन थोडेच आहे? आणि जर आत्तापर्यंत शुद्धलेखनाचे नियम पाळले गेले नसते तर भाषा म्हणून आपली मराठी प्रगल्भ झाली असती का रे? असो, जो जे वांछिल तो ते लाहो. मी एका सामान्य पुणेकरा प्रमाणे मतभेद व्यक्त करण्याचे काम केले आहे.
डॅनी.
12 Jan 2008 - 7:31 am | झंप्या
शाळेप्रमाणे, येथे ती सुधारण्याचे बंधन थोडेच आहे?
डॅनी डेंग्जोप्पा,
शाळेत पण हे बंधन पाळणार्याला असते. तिच्यामायला तुला काय वाटतं आपला तात्या शाळेत असताना एकदम शुद्धलेखन काढायचा? आणि बिरुट्या तर मग शाळा शिकलाच नाही म्हणायचं की!! डॉक्टरकी काय आठवड्याच्या बाजारातुन घेउन आला का मग? :))))
ह.घ्या रे!
(शुद्धलेखनाचा गेम वाजवलेला) सबका डॉन एक