मिपाकर अतृप्त आत्मा यांचे अभिनंदन !
तिसरा अक्षय्य हिंदू पुरस्कार
गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी विचारांच्या व्यक्तींनी एकत्र येऊन #अक्षय्यहिंदूपुरस्कार सुरू केला. कारण सोशल मीडियावर आपण सगळे देव देश धर्म ह्या विषयावर नित्य बोलतोच, पण प्रत्यक्षातही काहीतरी भरीव केलं पाहिजे. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. त्यातूनच मग कल्पना सुचली की हिंदूंनी हिंदू समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊयात, मग तो परधर्मीय असला तरी.
ह्या विषयावर आपसात विचारमंथन करून, काही गोष्टी एकमताने ठरवल्या त्या म्हणजे १) पुरस्कार केवळ लोकसहभागातून जमा होणाऱ्या निधीतून दयायचे कारण हिंदुत्वाचं काम हे सर्व समाजाचं आहे २) पुरस्कार जमिनीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच द्यायचे आणि तेही तसेच कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याच हस्ते. ३) पुरस्कार देताना १) जनजाती कल्याण २) साहित्य-मीडिया ३) गोसंवर्धन,पालन ४) सामाजिक समरसता ५) धर्म जागरण अशा पाच विभागात द्यायचे. जेणेकरून या विविध क्षेत्रात हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख समाजाला होईल.५) पुरस्कार देताना शक्यतो पुणे, मुंबई व तत्सम मोठी शहरे टाळून महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातून व्यक्ती निवडायच्या, निवडलेली व्यक्ती शक्यतो तरुण पहायची जेणेकरून समाजाकडून मिळालेल्या कौतुकामुळे पुढील आयुष्यात अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
यावर्षीच्या म्हणजे २०२५ सालच्या तिसऱ्या #अक्षय्यहिंदूपुरस्काराचे स्वरूप अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यासाठी सज्ज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, अकरा हजार रुपये रोख आणि विविध राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच असे आहे.
यावर्षीच्या विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेते कार्यकर्ते श्री चैत्राम पवार.
यावर्षीच्या (२०२५ )पुरस्काराचे मानकरी आहेत.
१) जनजाती कल्याण - वर्षाताई परचुरे (मोखाडा)
२) मीडिया-अर्चनाजी तिवारी (उत्तर प्रदेश, दिल्ली)
३) गोसंवर्धन,पालन - अश्विन संपतकुमारन (कर्नाटक)
४) सामाजिक समरसता - पराग दिवेकर गुरुजी (पुणे)
५) धर्म जागरण - अविनाश तायडे (बुलढाणा)
शिरीष महाराज मोरे - मरणोत्तर
यावर्षीचा अक्षय्य हिंदू पुरस्कार सोहळा तारीख ३ मे, शनिवारी सायंकाळी ६ वाजता एस.पी. कॉलेज पुणे येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये संपन्न होत आहे. आपण या सोहळ्यास जरूर या.
-- अभिराम दिक्षित यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.
प्रतिक्रिया
21 Apr 2025 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
हा पुरस्कार मिळण्यामागे माझा धर्म सुधारणावादी असलेला दृष्टिकोन आणि त्या पद्धतीने अनुषंगाने आलेले वर्तन हे कारणीभूत ठरले .
पुरोगामी मताच्या तसेच सनातनी मताच्या दोन्हीही प्रकारच्या लोकांनी यातील काही दोष उणिवा दाखवल्या . काहींनी तीव्र टीका केल्या .या सर्व गोष्टींचा विचार करून आजही मी ही धर्म सुधारणा वादाची भूमिका घेऊनच पुढे चालतो आहे .याही पुढे चालेन . त्याचे कुठेतरी दखल घेतली गेली आणि ती गोष्ट याच संस्थाळावर आमच्या मित्रानी जाहीर केली . . .दोन्ही गोष्टींचा आनंद वाटला . . मित्रवर्य कपिलमुनी यांचे मनःपूर्वक धन्यवाद . तसेच माझ्या या भूमिकेवर याच संस्थाळावरती माझ्यावर ज्यांनी साधक बाधक टीका केली आणि माझ्या विचारांना सुधारण्यास प्रवृत्त केले ,त्या सर्वांचे विशेष धन्यवाद .
21 Apr 2025 - 2:29 pm | प्रचेतस
वाहवा गुरुजी.
मनःपूर्वक अभिनंदन....!
21 Apr 2025 - 2:42 pm | अमरेंद्र बाहुबली
आत्मा साहेबांचे अभिनंदन, सोशल मीडिया वगैरेवर गरळ ओकण्याला हिंदुत्ववादी कार्य समजणाऱ्यांच्या तोंडावर ही चपराक आहे, प्रत्यक्ष जमिनीवर कार्य करणारे खरोखरीच आदरणीय असतात.
बाकी हे अभिराम दीक्षित विदेशात डॉलर मध्ये खेळतात नि इथे लोकाना प्रोत्साहन वगैर देतात, स्वत करा ना काहीतरी कार्य म्हणावे.
21 Apr 2025 - 2:53 pm | कर्नलतपस्वी
प्रोत्साहन देणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. ते सुद्धा सामाजीक सद्भावना सौहार्द वाढवण्यासाठी.
बाकी इतरही काही करतात त्याने सद्भावना वाढते का हे सुज्ञ मिपाकरांना वेगळे सांगायची गरज नाही.
एक तर घोडा म्हणा किवा चतुर म्हणा....
21 Apr 2025 - 3:14 pm | अमरेंद्र बाहुबली
कर्नल साहेब ज्याने काहीतरी कार्य केलाय तो प्रोत्साहन देत आयल तर समजू शकतो, उदा. तुम्ही मला सैन्यात जा म्हणून प्रोत्साहन दिले तर ते लागू होईल, पण ज्याच्या खानदानात सैन्य काय असते ते कुणी पाहिले नाही तो प्रोत्सावू लागला सैन्यात जा म्हणून तर कसे होईल?
21 Apr 2025 - 2:46 pm | कर्नलतपस्वी
सामाजिक समरसता एक प्रभावी मार्ग आहे. त्पाचा योग्य उपयोग करून समाज प्रबोधन केलेत.अतिशय स्तुत्य आहे. अर्थात फलश्रुतीही तेव्हढीच महत्वाची व इतरेजनासाठी प्रेरणादायक .
अभिनंदन.
21 Apr 2025 - 2:52 pm | मूकवाचक
गुरूजी, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
21 Apr 2025 - 3:27 pm | सोत्रि
गुरुजी, मनःपूर्वक अभिनंदन.
- (मिपाकर) सोकाजी
21 Apr 2025 - 3:46 pm | Bhakti
अभिनंदन गुरूजी!
21 Apr 2025 - 4:43 pm | वामन देशमुख
अतृप्त आत्मा,
अक्षय्य हिंदू पुरस्कार २०२५ मधील ‘सामाजिक समरसता’ या सन्माननीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
समाजामध्ये खर्या अर्थाने समरसता निर्माण करणं ही जितकी कठीण, तितकीच अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. हे कार्य तुम्ही निःस्वार्थ भावनेने आणि समाजप्रेमाने करत आहात याचा एक मिपाखरु म्हणून अभिमान आहे.
आपल्या कामामुळे समाजातील जाती-धर्माच्या भिंती गळून पडाव्यात, माणुसकी आणि आपुलकीचा सेतू निर्माण व्हावा, हीच खरी हिंदुत्वाची शिकवण तुम्ही कृतीतून दाखवून दिली आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका मिपाखराचा सन्मान होणं ही केवळ आनंदाचीच नाही तर अभिमानाची बाब आहे.
"अक्षय्य हिंदू पुरस्कार" हा तुमच्या कार्याची पावती तर आहेच, पण भविष्यातील तुमच्या प्रेरणादायी प्रवासासाठी एक शिदोरी ठरेल यात शंका नाही.
- द्येस्मुक् राव्