तुम्ही सदरा मळवला
असं पोर्यानी सांगावे.
आम्ही साबु घेउन यावं
तुम्ही उगा चेकाळावे.
हे असं काय होतं बुवा ?.......
तुम्ही उगा चेकाळावे
त्यात साबणं नासावे.
आणि करुन फेस सारा
आख्खे घर पाणी पाणी
अशी दुपार कशी जावी....
तुम्ही जोर बोंबलावं
सारी झोप खोबरी
तुम्ही लाथा झाडाव्या
आम्ही उसण धरावी.
कशी जीवघेणी अदा.....
आम्ही लपत छपत
तुमची पाठ सोलावी
तुम्ही ओढत पदर
आणिबाणी जाहीर करावी.
कस्सा जीव कातावला......
( संदर्भ : रामदासांची एक लाडीक कविता http://misalpav.com/node/5271 )
प्रतिक्रिया
29 Dec 2008 - 12:19 am | टुकुल
आम्ही लपत छपत
तुमची पाठ सोलावी
तुम्ही ओढत पदर
आणिबाणी जाहीर करावी.
मस्त जुळुन आल आहे..
29 Dec 2008 - 10:50 am | आनंदयात्री
मस्त हो भाउ !!