शिक्षण आणि विटाळ पाळणे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Feb 2025 - 10:39 am

"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात. असे अर्ध-शिक्षित लोक त्यांच्या कृतीने ते अशिक्षित आहेत हे दाखविण्याचा कोणताही मौका सोडत नाही.

आता दूसरा प्रश्न विटाळ म्हणजे काय? स्त्रीच्या शरीरातून महिन्यातून काही दिवस अनुपयोगी आणि अपायकारक स्त्राव बाहेर पडतात. या दिवसांना, स्त्रीची मासिक पाळी किंवा स्त्री विटाळशिण झाली, असे शब्द भाषेत आहे. अश्या अनुपयोगी, अपायकरक स्त्रावतून कुणाचाही जन्म होत नाही. अजून तरी जेंव्हा स्त्री आणि पुरूषांचे बीज एकाकार होतात आणि त्यांचे पोषण स्त्रीच्या गर्भात होते, तेंव्हाच नवे बाळ जन्माला येते. विटाळातून कुणाचाच जन्म होत नाही.असो. स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्राव जमिनीवर पडू नये, त्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून आजच्या आधुनिक स्त्रीया पैड इत्यादि वापरतात. पण शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशात अधिकान्श स्त्री आणि पुरुष अंतर्वस्त्र वापरत नव्हते. मी स्वत: सहावीत गेल्या पहिल्यांदा अंडर वेयर घातली होती. ही 1980 पूर्वी महानगरातील परिस्थिति होती. बहुतेक ब्रा-पेंटी इत्यादिंचा वापर महानगरात 100 वर्षांपूर्वी सुरू असेल. अजूनही 100 टक्के ग्रामीण भागात या अंतर्वस्त्रांचा प्रसार झाला नसेल. पूर्वीच्या काळात स्त्रीच्या शरीरातील बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्रावाने घरातील आणि बाहेरचे वातावरण प्रदूषित होऊ नये यासाठी उपाय शोधणे गरजेचे होते. या शिवाय मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव होण्याने स्त्रीला शारीरिक विश्रांतीची ही गरज असायची. त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली. स्त्री विटाळशिण झाली की तिला विश्रांति मिळावी या हेतूने विटाळशिण स्त्रीला वेगळे ठेवण्याची परंपरा समाजात रूढ झाली. त्याकाळच्या सामाजिक स्वास्थ्य दृष्टीने ती व्यवस्था सर्वोत्तम होती. आजच्या काळात अधिकान्श कामांसाठी आधुनिक उपकरण उपलब्ध असतात तरी ही शिक्षित डॉक्टर स्त्रीला मासिक पाळीच्या काळात जास्त शारीरिक श्रमांचे काम न करण्याचा सल्ला देतात.

काळानुसार समाज आणि परिस्थिति बदलत रहाते. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याकाळच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा विचार करणे ही गरजेचे असते. मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते. पण चिंतन आणि मनन करण्याची क्षमता नसलेले अर्ध-शिक्षित सर्व जुन्या सामाजिक परंपरांबाबत निरर्थक विधान करतात त्यासाठी हा लेख.

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2025 - 1:45 pm | प्रसाद गोडबोले

कुठं कोणाला समजावून सांगण्याच्या भानगडीत पडता !

आपलं आपण हसायचं अन् सोडून द्यायचं =))))

आग्या१९९०'s picture

23 Feb 2025 - 2:28 pm | आग्या१९९०

कुंकवाचा बाण वर्मी लागल्याने धागा काढला का?
असो. शाळेत असताना शाखेत जाणाऱ्या मित्राने विटाळशीणला इंग्रजीत bricklazy म्हणतात असे सांगून माझ्या ज्ञानात भर घातली होती. का तर म्हणे पाळीच्या काळात विटकरी रंगाच्या स्त्रावामुळे स्त्री आळशी बनते. शिव शिव शिव ! शाखेत असं शिकवले जाते?

आंद्रे वडापाव's picture

23 Feb 2025 - 5:20 pm | आंद्रे वडापाव

मुख्य प्रश्न "विटाळ" निति का अमलात आणली गेली ?.... याचे उत्तर

बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा...
"बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2025 - 10:05 pm | प्रसाद गोडबोले

लिंक देत चला हो. शोधुनही सापडला नाही हा विडीओ =))))

सोप्पं आहे नुसतं कॉपी पेस्ट तर करायचं असतं . उदाहरणार्थ हे पहा :

https://www.youtube.com/watch?v=s-4fGFGdg-U

बाकी तुम्ही म्हणता तो व्हिडीओ पाहिला नसला तरी नुसते टायटल "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं" वाचुन सहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष - पाद्री फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली. बापाला बापपण सिद्ध करावं लागतं हे ऐकुन त्यांना काय वाटलं असतं ह्या विषयी फार उत्सुकता वाटली =))))

j

आंद्रे वडापाव's picture

24 Feb 2025 - 9:31 am | आंद्रे वडापाव

Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष तारा भवाळकर पुरुषसत्ताक समाज, परंपरेच्या ओझ्यावर काय म्हणाल्या?

#https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=n43SNKE5cemjvl5p

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2025 - 1:56 pm | प्रसाद गोडबोले

लिंक शेयर केल्याबद्दल धन्यवाद !

बाकी असो =))))

मुक्त विहारि's picture

23 Feb 2025 - 7:32 pm | मुक्त विहारि

त्या काळांत, स्त्रीला जास्तीत जास्त आराम आणि पौष्टिक खाणे देणे उत्तम, असे माझे आजोबा ( ते डॉक्टर होते.) म्हणायचे. एरवीही स्त्रीला चौरस आहार मिळाला पाहिजे, असा त्यांचा दंडक होता.

इतर डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे...

आंद्रे वडापाव's picture

24 Feb 2025 - 1:24 pm | आंद्रे वडापाव

विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।।

म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे।।

देहीचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणते महारी चोखीयाची।।

फुकटची वीज हडपणाऱ्या, स्वस्तात दारू पाहिजे असणाऱ्या, फुकट्या दिल्लीकरांना,

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची प्रगल्भता कशी कळणार !

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2025 - 9:41 pm | धर्मराजमुटके

अरे भाई कहना क्या चाहते हो ?
लेख वाचून काहीच कळाले नाही. आजकाल असेच लेख सर्वत्र वाचनात येतात. म्हणजे चुकीची का होईना पण स्पष्ट बाजू घ्यायची नाही. नेहमी माझ्यासारखे (म्हणजे त्या धर्मराजासारखे) नरो वा कुंजरो वा:

मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.

ओके. मग आताच्या काळाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ? आजच्या काळात विटाळ पाळणे स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम आहे काय ? याचे हो किंवा नाही असे उत्तर द्या. विटाळशी स्त्री ने कुणाला शिवाशिव केली, तर तिला फार श्रम व्हायचे काय ? केवळ तिला आराम मिळावा म्हणून तिला हाडतूड केली जायची का ?

त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली.

आणि

मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.

ही दोन्ही वाक्ये समानार्थी आहेत काय ?

कॉमी's picture

24 Feb 2025 - 10:35 pm | कॉमी

.