भैरव ते भैरवि - सन्गित मैफिल

मॅन्ड्रेक's picture
मॅन्ड्रेक in जनातलं, मनातलं
27 Dec 2008 - 11:02 am

नमस्कार,
भैरव ते भैरवि हा कार्यक्रम सुन्दर ठ्सा उमटवून देणारा - अप्रतिम.
शुभ कामना.

संगीतप्रतिसाद

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

27 Dec 2008 - 11:13 am | सुचेल तसं

नीट समजले नाही.

हा कार्यक्रम कोण सादर करतं? तुम्ही पाहिला आहे तर त्याचे जरा विस्तृत वर्णन करावे.

धन्यवाद!!!

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

संदीप चित्रे's picture

27 Dec 2008 - 11:53 am | संदीप चित्रे

मी ह्या कार्यक्रमाची सीडी ऐकलीये... अतिशय अप्रतिम कार्यक्रम :)
गायकांपैकी श्री. विजय कोपरकर आठवतायत.
कार्यक्रमाचे निवेदनही (लेखन, सादरीकरण) समर्पक आहे.
इथे कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीही एकूण कार्यक्रमाचे खूप कौतुक केलं. (न्यू जर्सीला कार्यक्रम झाला तेव्हा मी नेमका भारतात होतो.)
----
कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरूप म्हणजे -- एखाद्या रागातील एक / दोन बंदिशींचा मुखडा, मग एक-दोन हिंदी सिनेमातली गाणी, मराठी गाणी, नाटयगीत, भावगीत इ.ची ओळख करून देतात. कार्यक्रमाची सुरूवात 'भैरव' रागाने होते (पहाट समय).. पुढे मग दिवसभरातले, संध्याकाळचे, रात्रीचे असे वेगवेगळे राग सादर करत .. 'भैरवी'ने कार्यक्रमाची सांगता होते (दुसर्‍या दिवशीची पहाट !!)
-----
एकूण जवळपास चोवीसही तासांतले राग एकाच कार्यक्रमाच्या तीनेक तासांत सादर करणं हेच एक मोठे आव्हान आणि 'भैरव ते भैरवी'ची टीम ते उत्कृष्ठपणे पार करतात.
-----
कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी दैनिक सकाळमधील हा दुवा बघा.
------
www.atakmatak.blogspot.com

मॅन्ड्रेक's picture

27 Dec 2008 - 2:18 pm | मॅन्ड्रेक

मि हा कार्यक्रम पाहिला आहे.-अतिशय अप्रतिम
www.nicheentertainment.com ह्या सन्केत स्थळावर महिति उपलब्ध आहे.