मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून भारताचे सर्व नेते हे पाकिस्तानला धमकी देण्यात आणि " ओ , हे ऐकत नाहीत बघा " असे रडगाणं अमेरीकेसमोर गाण्यात फार व्यस्त आहेत. प्रणव मुखर्जी हे नुकतेच म्हणाले " बडबड नको कॄती करा ". मुखर्जीसाहेबांचे अगदी बरोबर आहे कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण ...आपल्या देशातली घाण साफ करण्याची कॄती ..
या हल्यानंतर अगदी मच्छीमार संघटना ते पार रॉ पर्यंत सगळयांनी जे एकमेकांवर आरोप केले ते अगदी घृणास्पद होते. प्रत्येकाचे हेच म्हणणे होते " आम्ही इशारा दिला होता , त्यांनी ऐकलं नाही " .. मग ज्याच्यावर आरोप केले त्यांनी म्हणायचे " अशी माहिती आमच्यापर्यत कधीच नाही आली. " सगळ्याच्या वर कडी केली ती अंतुलेंनी (त्या वर लिहायची देखील लाज वाटते ) . . हा सगळा तमाशा संताप व चीड येण्यापलीकडचा होता !! .
गेली १५ वर्षांपासून पाक , दाउद आणि त्यांची सगळी यंत्रणा भारतात दहशतवादी कारवाया करतात , त्या बहुतेक वेळेला यशस्वी होतात आणि आपल्या संरक्षण व्यवस्थेची लक्त्तरं वेशीवरं टांगली जातात. ज्यांचे अस्तित्व हे ' भारताचा द्वेष ' याएकाच कारणामुळे टिकून आहे , ते इथे बाँबस्फोट करणार नाहीतर काय लालबागच्या राजावरं फुले उधळणार ... हे कळत असून देखील साध्या स्पीडबोटमधनं भेदता येईल इतकी आपली सुरक्षा कमकुवत असेल तर त्यात पाकचा काय दोष ?
आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पोलीसांनी बरेच आरोपी पकडले , पण एकालाही फासावर चढवले गेले नाही. ९३च्या बाँबस्फोटाची केस अजून चालू आहे. राष्ट्रपति बदलले तरी अफजल गुरु अजून तसाच आहे. वर्षांनवर्ष चालणारया केसेस , शेवटी दयेचा अर्ज या नावाखाली राजकारण्यांचा हस्तक्षेप यामुळे कायद्याचा धाक नाहीच आहे कूणाला . त्या साकिबच उदाहरण घ्या .. आज ना उद्या आपण फाशी जाउन मरु याची भिती लांबच ..वर दहशतवाद्यांना दफन करण्यासाठी कोर्टात परवानगी मागण्याचा माज त्याने दाखवला.
१००/२००ची लाच खाउन बांगलादेशींना रेशन कार्ड देणारे महसुल कर्मचारी , ईर्पोटेड वस्तुंनी स्वताची कपाटे भरणारे व त्यासाठी बोटी पास करणारे कस्ट्म ऑफिसर , दाउदने फेकलेली हाडुक चघळत त्याच्या पुढे लाळ घोटणारे नेते , उद्योगपती , फिल्मस्टार हे सगळे त्या कसाबपेक्षा धोकादायक दहशतवादी आहेत. ही सगळी घाण साफ केली तर कदाचीत पुढचे १० बाँबस्फोट व्हायचे वाचतील.
तेव्हा मुखर्जीसाहेब कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण
प्रतिक्रिया
26 Dec 2008 - 1:31 pm | आकाशी नीळा
कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण
इथेच तर गाडी येउन थाम्बते ना....
नेहेमीप्रमाणे कोर्टकेस्,जामीन आनी न सम्पनारी तारीख...
ह्याच्यापूढे काय अपेक्षा ठेवनार आपन तरी..
26 Dec 2008 - 4:42 pm | अविनाशकुलकर्णी
जो पर्यंत निधर्मी राज्य घटना आहे तो पर्यंत असेच चालणार