एका गुलाबी संध्याकाळी

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
2 Nov 2024 - 1:07 am

एका गुलाबी संध्याकाळी
________________________

संध्याकाळची वेळ ... साधारण साडेचार पाच वाजले असावेत. शांतपणे टेरेसवर उभा होतो सुर्यास्ताची वाट पाहात. नुकतेच दिवाळी संपुन गेली होती पण ह्यावर्षी दिवाळी अशी दिवाळी वाटलीच नाही. लॉकडाऊनमध्ये जशी संधी मिळाली, जसे वातावरण रिलॅक्स झाले, तसे तसे सोसायटीमधले सर्व लोकं आपापल्या मुळ गावी निघुन गेले होते.
अगदी मोजक्या फ्लॅट्सच्या बाल्कन्यांना रोषणाई केलेली होती, कुठे फटाक्यांच्या आवाज नाही की लहान मुलांचा गोंगाट नाही. अगदी इतर दिवाळीत संध्याकाळ झाली की टेरेसवर मुलांची लगबग सुरु व्हायची रात्रीची आतिषबाजी पहायला अन करायलाही. अन् ह्यावर्षी, ह्यावर्षी मात्र एकदम सामसुम होती. चक्क कोणीच नाही. बस्स मी एकटाच !
पण अर्थात ह्याला आमची सोसायटी काही अफवाद वगैरे नव्हती . दूरवर पसरलेले अथांग काँक्रिटचे जंगल, हे बंगळुर शहर , सारंच कसं सामसुम होतं अगदी दररोज बंपर टू बंपर ट्रॅफिक असणारा लिंकरोड देखील ओस पडलेला. मधुनच एखाद दुसरी तुरळक गाडी सुसाट वेगाने जायची किंवा अँब्युलन्सचा निराश करणारा सायरन ऐकु यायच्या. बाकी कोरडे ठक्क. माणसाचे नामोनिशाण नसल्यासारखे.
बाकी मी तरी इथे का थांबलो होतो ? कां तर जॉब चेंज केल्याच्या फॉर्मॅलिटी संपवायला इकडे आलो अन इकडेच अडकलो. त्यानंतर म्हणालं आता अडकलोच आहे तर सारं काही संपवुन, घर सामान शिफ्ट करुनच परत सातार्‍याला जायचं. मग अडकलो.
हां तर ते असो.
मी मात्र हा एकांत मनापासुन एन्जोय करत होतो. बस मी अन मावळतीला निघालेला सूर्य !
तुम्ही एकदा "सुर्य पाहिला" ना की तुम्ही सारं काही एन्जॉयच करता, रादर तुम्हाला दुसरं काही करताच येत नाही.

आता बस्स मी आहे,
ह्या इथे टेरेसवर एकटाच
आणि हा निरव एकांत
आणि वाफाळलेली कॉफी
आणि अस्ताला चाललेला सूर्य
आणि तांबुस नारंगी निळ्या जांभळ्या रंगाच्या छटांनी नटलेले आकाश अन त्यातही गुलाबी रंगाची उठुन दिसणारी ती छटा .
आणि त्या मधुनच सरकणारे एखाददुसरे पांढरे- राखाडी ढग
आणि बस मी.
मोबाईलवर सलीलने संगीतमय केलेली बाकीबाबंची नितांत सुंदर कविता लावली आणि कॉफीचा आस्वाद घेत तल्लीन होऊन सुर्याकडे पहात बसलो ...
"तव नयनांचे दल हलले गं "
https://www.youtube.com/watch?v=0Bsq_EoTXU0

अचानक पाठी मागुन गालातल्या गालात हसण्याचा आवाज आला. मी दचकलोच . कारण हे अगदीच अनपेक्षित होतं, मी एकटाच होतो इथे. मग हे कोण? दचकुन मागे वळुन पाहिलं तर 'ती' . एका हातात कोणतेतरी पुस्तक धरलेले, अन दुसर्‍या हातात कॉफीचा मग !

मी आश्चर्याच्या धक्क्यातुन बाहेर येत स्मितहास्य देत तिला म्हणालो - "तू हेमा ना , २२ वा मजला? तू कशी काय इथे ?"

" हो, आपण भेटलेलो कि दसर्‍याच्या वेळेस ! पण तेव्हा जास्त बोलणं झालं नव्हतं." तिने एकदम उत्स्फुर्तपणे उत्तर दिले !
--------
मला आठवलं - दसर्‍याला सोसायटी मध्ये छोटासा कार्यक्रम झालेला तेव्हा भेटली होती 'ही' संपुर्ण फॅमीली सोबत! माझ्याही अन तिच्याही. हे असं फॅमिली सोबत असलं की ना एकदम कॅमल झाल्याच्या फील येतो. एरव्ही लायन, अगदी ड्रॅगन असण्याच्या अविर्भावात जगणारा मी घरचे सोबत असले की एकदम शामळु कॅमल होऊन जातो. सरळमार्गी. आपण बरं आपलं काम बरं. कोणाशी बोलायचं नाही की काही नाही.
आणि मग तो साला रासकल नीश्चा, त्याच्या घनदाट मिशांच्यामागुन फिदी फिदी हसत राहतो आपल्याकडे बघत ते वेगळेच.

ते असो.

पण तेव्हा 'ही' दिसलेली. ती अगदीच साडेपाच फुटाच्या आसपास उंच असावी, गोरापान वर्ण, अगदी म्हणजे दुधावरच्या सायीसारखी तलम त्वचा असल्याने ती लहान मुलगीच वाटायची. टप्पोरे काळेभोर डोळे . हे नक्कीच हिने हिच्या आईच्या बाजुने, एकदम बंगाली वळणाचे घेतलेले होते. तसे खरे सांगायचे तर जेव्हा पहिल्यांदा पाहिलेले हिला तेव्हा 'पुणेरी कोकणस्थ वळणाची' दिसणारी ही गेल्या दोन वर्षात जवळपास पुर्णच 'बंगाली वळण' घेऊ पहात होती. आज दसर्‍याच्या मुहुर्त, म्हणजे खरेतर आता बिजोयादोशोमी म्हणायला हवे. कहर केला होता हिने.
मी दुरवर कोपर्‍यात, बाहेर जायच्या दारापाशी उभा होतो, ती दूरवर सगळ्यांच्या घोळक्यात, माझ्याकडे पाठमोरी , तिच्या मैत्रीणींसोबत गप्पा मारत. तिने गडद मोरपंखी रंगाचा घागरा चोली की काय म्हणतात ते घातले होते. बॅकलेस ! पाठीवर पुर्ण मोठ्ठ्या आकाराचा गोल...नाजुक जाळीदार! त्याच्या भोवती मोत्याची की कसली तरी सुंदर नक्षीं ! त्यावर नाजुक रेशमी लेसने तो ड्रेस इतका परफेक्ट फिट बसवला होता की जणुकाही एखाद्या चित्रकाराने नदीच्या प्रवाहावरील तरंग काढावेत तितक्या सफाईदारपणे तिची कमानदार कंबर उठुन दिसत होती. अन् त्यात पडलेले हे चंद्राचे प्रतिबिंब अन आजुबाजुला चांदण्या असल्यासारखे ! आणि त्यातुन आज तिने तिचे गुडग्यापर्यंत असलेले लंबसडक घनदाट काळेभोर केस मोकळे सोडले होते जे तिची संपुर्ण पाठ व्यापुन टाकत होते. शरदाच्या रात्रीत जसा ढगांचा चंद्राशी लपंडाव चालायचा तस्सेच काहीसे चालले होते. एका अनभिज्ञ क्षणाला तिने मान अलगद डावीकडे वाकवली अन डाव्याहाताने सारा केशसांभार अलगद उचलुन सावरायला घेतला.
आणि दसर्‍यालाच कोजागिरी पौर्णिमा पाहिली मी !

COUP DE FOUDRE ! नो बेटर वर्ड्स ! पहिल्या नजरेत प्रेमात पडलो !

ते बहुतेक तिच्या मैत्रींणींच्या लक्षात आले असावे अन त्यांनी तिला सांगितले असावे की काय, पण तिने परत केस मोकळे सोडले अन झटकन वळुन माझ्याकडे पाहिले. मीही झटकन नजर वळवली पण तिच्या मैत्रिणींची हसणे अन तिचे हसत हसत लाजणे माझ्या नजरेतुन सुटले नाही. ती तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायला निघाली , तिच्या मैत्रिणी मात्र अजुनही खिखी खिखी करत गालातल्या गालात हसत होत्या . ती मात्र जणु काही झालेच नाही ह्या अविर्भावात हरणीच्या चालीने निघाली , मी जमेल तितके दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होतो. ती जेव्हा अगदी माझ्या बाजुला आली तेव्हा तिने परत तसेच तिचे केस डाव्या हाताने सावरुन बाजुला घेतले अन पुढे निघुन गेली. आता मात्र मी मागे वळुन पहायचा मोह आवरु शकलो नाही. मी अगदी साळसुदपणाचा आव आणुन जणु काही झालेच नाही अशा अविर्भावात मागे वळुन पाहिले .
आहह !

परत एकदा कोजागिरी !

कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तेरा

https://www.youtube.com/watch?v=DcFblrrn6TI

अन तितक्यात तिने झपकन मागे वळुन पाहिले. आमची नजरानजर झाली. अन आमच्या दोघांच्याही चेहर्‍यावर हसु उमटले... परत एकदा तिच्या मैत्रिणी खिखी खिखी करत हसत राहिल्या. इथे माझ्या काळजात काय होत होतं त्यांना काय माहीत !

अंदाज़ अपना देखते हैं आइने में वो
और ये भी देखते हैं कोई देखता न हो

-------
आज मात्र तिने एकदम लूज असा घरातील स्वेट शर्ट आणि साधीशी घरातलीच ट्राऊझर घातलेली होती, केसांचा आंबाडा बांधावा तसा काहीसा हेयरडू आणि त्यात वूडन पिन अडकवुन केस घट्ट बांधले होते, त्यामुळे आज लक्ष विचलीत होण्यासारखे काहीच नव्हते. हां अगदीच नाही असं नाही. तिचा परफ्युम नेमका कोणता होता देव जाणे , बहुतेक पारिजातक की काही तरी असावा , पण एकदम गोड असा माईल्ड फ्लॉवरी सुगंध ती समोर आल्याक्षणी मला जाणवला होता.
आणि शिवाय तिच्या काळ्याभोर डोळ्यांकडे पहात हिपॉटाईझ न होता काहीबाही बोलत राहणे ही एक परीक्षाच होती म्हणा !

"घाबरवलंस यार मला तु. इथे कोणीच नाही, अन् अचानक असा हसण्याच्या आवाज ! तु कशी काय ? " मी विचारंच्या तंद्रीतुन, रादर कोजागिरीच्या आठवणीतुन मनाला खेचुन बाहेर आणलं आणि बोललो.
"आमची मिड टर्म ठेवलीये. स्टुपिड कॉलेज. आम्हाला वाटलेलें की ही लास्ट ईयरची मिडटर्म एक्झॅमही ऑनलाईन होईल पण त्यांनी ऑफलाईन ठेवली. मग थांबले. मी आणि आई. इक्झॅम झाली आम्हीही जाणार आहोत पुण्याला. कंटाळा आला ह्या लॉकडाऊनचा. आणि हो, बाय द वे, माझं नाव हेमा नाही, हेमांगिनी आहे, मला बस घरात हेमा म्हणतात."
"हेमांगिनी - ओह माय गॉड . कसलं सुंदर नाव आहे!" मी एकदम उत्स्फुर्तपणे बोलुन गेलो !
ती परत एकदा तशीच हसली.
"कित्येकदा लिफ्ट मध्ये येता जाता नजरानजर झालेली पण आपण कधी बोललोच नाही ना !"
"कसे बोलणार ? तूच नेहमी बिझी असायचास, एकदम फॉर्मल सूटाबुटात. ऑफिसला निघालेला किंवा ऑफिसातुन परतलेला अन कानात हेडफोन लाऊन काही ना काही ऐकत गुणगुणत . आज फायनली कळलं काय ऐकायचास ते! कूठल्या काळातलं गाणं आहे हे? तव नयनांचे दल हलले गं ? यू आर सो ओल्ड फॅशन्ड ! " ती परत हसत हसत बोलली.
आम्ही म्हणजे अगदी जमान्यापासुन ओळख असल्यासारखे गप्पा मारायला लागलो होतो भेटल्यापासुन काही क्षणातच. हा बहुतेक त्या कोव्हिड आणि लॉकडाऊनचा इफेक्ट असावा काय की लोकं काही ना काही बोलायला उतावीळ आहेत पण बोलायलाच कोणी नाही, मग कोणी भेटलं की लगेच मनमोकळेपणाने बोलायला आतुर. असा काहीसा फिलॉसॉफिकल विचार माझ्या मनात डोकाऊन गेला. पण तो बाजुला सारुन मी हलक्याफुलक्या गप्पा मारत राहिलो. काय माहीत , कदाचित तिलाही माझ्याशी बोलायचे असावे ... खुप आधी पासुनच !

"ओह , एक्स्क्युज मी ? तू मला ओल्ड म्हणत आहेस का? "
ती परत हसली "नाही रे. तसं असतं तर 'अहो अंकल' वगैरे म्हणले असते. रादर बोललेच नसते. "
"आणि मी कसं बोलणार होतो? मला तर तू ११वी १२वीत आहेस की काय असंच वाटायचं. लिटल कीड. "
"ओह, एक्स्क्युज मी ? आता कोण मला लिटल किड म्हणतंय? आम्ही बँगलोरला आलो तेच माझ्या इंजिनियरींच्या अ‍ॅडमिशननंतर . मी ऑलरेडी फर्स्ट ईयरला होते आपण पहिल्यांदा पाहिलं असेल तेव्हा !"

पण हे आम्हाला कसं कळणार? कळलं असतं तर तेव्हाच बोललो असतो, नाहीतर ११वी १२ वीतली मुलगी आहेस हे माहीती असुन तुझ्याकडे बघणं सॉरी सॉरी , तुझ्याशी बोलणे , that would have been so wrong ना!
ती मनमुराद हसली. म्हणाली "पण आता तर माहीती आहे ना तुला. शिवाय आता तर मी लास्ट इयरला आहे. आता बोलु शकतो ना आपण ! आणि आता बघु शकतोस तू. दसर्‍याला बघत होतास ना तसे ! "
तिच्या ह्या वाक्याने मी मनातल्या मनात तिनताड उडालो . मला काय बोलायचं तेच सुचेना. आपली चोरी पकडली गेली आहे असं काहीसं वाटलं.
"चिल यार . मजा करत आहे ." ती हसुन म्हणाली. "आय अ‍ॅम कूल ! पण त्या दिवशी किती चिडवत होत्या माझ्या मैत्रिणी मला, तुला काय माहीत !"
मी फक्त हसलो.

इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु केल्या. तिचे कॉलेज, अभ्यास, करियर. तिही मोकळेपणाने बोलत होती. मग मध्येच माझा जॉब , ऑफिस, कोव्हिड मध्ये इथे का थांबलो , माझी फॅमिली कुठे, मी कधी जाणार वगैरे इकडच्या तिकडच्या गप्पा. कित्ती तरी वेळ आम्ही गप्पा मारत होतो.

असं वाटत होतं की जणु काही आम्ही एकामेकांना अगदी पहिल्यांद्या पाहिले तेव्हा पासुन ओळखत आहोत , गप्पा मारत आहोत. ! मी .ती. कॉफी आणि सुर्यास्त आणि अशीच गुलाबी संध्याकाळ !

पक्षांचा एक मोठ्ठा थवा काहीतरी आवाज करत डोक्यावरुन उडत गेला तेव्हा आम्ही आमच्या गप्पांच्या तंद्रीतुन बाहेर पडलो. जवळापास तासभर बोलत होतो आम्ही ! जणु काही वर्षानुवर्षांपासुन मैत्री असल्या सारखे ! वेळ कसा गेला कळलंच नाही . आता सुर्य एकदम क्षितिजाला टेकला होता .
"किती मोकळेपणाने बोलत आहोत ना आपण ! अगदी फार पुर्वी पासुन ओळख असल्या सारखे!"
ती हसली अन म्हणाली "ओळख तर होतीच की रे . बोलायला शब्दच लागतात असे काही नाही. मला कळते नजरेची भाषा ! आणि तसं पाहिलं तर आपण दोन तीन वर्षं तर बोलत आहोतच की. आणि आत्ता काही दिवसांपुर्वी दसर्‍याला, एकही शब्द न बोलता जे बोललास ना, ते मलाच काय तर माझ्या मैत्रीणींना ही ऐकु आलं आणि कळलं ही ;) "
"ओह्ह , असं आहे तर !"
ती मनसोक्त हसायला लागली !
" मग इतकी जुनी ओळख आहे अन बोलतच आहोत तर एक विचारु का पर्सनल जरासे? तुला बॉयफ्रेंड वगैरे असेलच ना?"
"अँ . दॅट्स बोल्ड क्वश्चन ! पण नाही रे. कॉलेजला आले, पहिलं वर्षं कसं संपलं कळलंच नाही, आणि दुसर्‍याच वर्षी हा कोव्हिड अन लॉकडाऊन वगैरे सुरु झाले. सगळे घरुन. कसलं कॉलेजलाईफ अन कसलं काय ?"
"ओह माय गॉड ! म्हणजे तू म्हणत आहेस की तू कॉलेजच्या लास्ट इयरला आहेस आणि यू डोन्ट नो व्हाट इज अ किस? यु आर जोकिंग किंवा तू खोटं बोलत आहेस!" आता माझी भीड जराशी चेपली होती , मग बिनधास्त बोलत होतो.
"नाही रे , खोटं कशाला बोलेन? मी म्हणाले बोयफ्रेंड नाहीये, किस केला नाहीये असं कुठे म्हणाले !" असं म्हणुन ती हसायला लागली.
"व्हॉट ???"
मला धक्काच बसला. "मला ना तुमच्या जनरेशनचे काही कळतच नाही. तुम्ही असे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड न होता, प्रेम वगैरे न बोलता डायरेक्ट किस ? प्रगती आहे राव ! मुलगी शिकली प्रगती झाली."
"गप रे ! तसं नाही काही . एक मित्र होता, होता म्हणजे अजुनही आहे. आम्ही कॉलेजच्या प्रोजेक्ट वगैरेच्या निमित्ताने खुप वेळ एकत्र घालयावचो, त्याला रोमॅन्टिक फिलिंगस होत्या पण मला कधी जाणवलेच नाही तसं. एकदा असेच कॉलेजमध्ये क्लास संपल्यावर , शेवटी आम्ही दोघेच राहिलेलो वर्गात, तेव्हा त्याला खुप रोमॅन्टिक वाटलं आणि त्याने डायरेक्ट मला किस केला. दॅट वॉज शॉक टू मी. मी त्याला लांब ढकलं अन म्हणाले व्हॉट द फक ? हा काय प्रकार आहे. तेव्हा त्याने मला सांगितलं की त्याला रोमॅन्टिक फिलिंग्स आहेत वगैरे. मी तिथल्या तिथं त्याला म्हणाले मला तसं काहीसं वाटत नाही, आपण फक्त मित्र आहोत. आणि विषय क्लोज केला !"
मी म्हणालो "माझा नाही विश्वास बसत ह्या स्टोरीवर . इट्स फेक. पण मुली अशा प्रकारे फ्रेंड झोन करु शकतात हे माहीत आहे मला."
ती हसली " ह्यॅ ह्यॅ ह्यॅ, से व्हॉटेव्हर यु वॉन्ट. आय डोन्ट गिव्ह अ फक. तुला काय म्हणायचं ते म्हण ! मला तो आवडलेला असता तर मी तिथे लाजले नसते. मला माहीती आहे माझा टाईप काय आहे आणि मला कोण आवडतं ते. आणि आय डोन्ट केयर व्हॉट अदर पीपल थिंक. "
मी म्हणालो " ख्या ख्या ख्या. पण त्याला काय किस म्हणत नाहीत, मी म्हणतोय एकदम शृंगारिक रोमॅन्टीक किस, एकामेकांच्यामध्ये विरघळुन जात आहोत की काय असे वाटावे असा किस! एकामेकांच्या मिठीत. जणु काही दोन व्यक्ती नाहीतच, एकच व्यक्ती आहे, चार हात चार पाय असलेली, इतके एकामेकांच्यात मिसळुन जात. प्रॉपर रोमँटिक किस. तु असा कधी केला नाहीयेस?"
ती लाजली अन म्हणाली "नाही रे. नसतं काही काही लोकांच्या नशीबात ! त्याला काय करणार !"

मी मनातल्या मनात म्हणालो . हाच तो क्षण आहे. लीप ऑफ फेथ . जे होईल ते होईल !

"डू यु वॉन्ट टू ? "

"व्हॉट ? काय ??? " तिने धक्का बसलेल्या स्वरात एकदम उत्स्फुर्तपणे विचारलं!
"हां . तु बरोबर ऐकलं आहेस . तुला असा अनुभव घ्यायचा आहे ? "
ती प्रचंड लाजली, काहीच बोलली नाही, अन नजर खाली वळवुन बघत राहीली.
इथे माझ्या हृदयात मात्र जणू काही ढोल वाजत आहे इतक्या जोरात धडधड चालु होती की एक क्षण मला वाटलं की तिलाही ऐकु जाईल की काय ते !
"अं?" मी परत एकदा विचारण्याचा प्रयत्न केला. अर्थात आता माघार घेऊन काही उपयोगच नव्हता, तीर धनुष्यातुन सुटलेला होता. आता जे होईल ते होईल !
"मे बी. सम डे." ती एकदम कुजबुजत्या स्वरात लाजत लाजत म्हणाली.
अन मला एकदम कोणी तरी गुदगुल्या केल्यासारखा अनुभव आला.
"ईट्स नाऊ ऑर नेव्हर माय डियर. मी नंतर कधीतरी , पुढे कधीतरी पाहु वगैरे वगैरे शब्दांवर विश्वास ठेवत नाही. 'नंतर' ह्या शब्दाचा अर्थच माझ्यासाठी 'कधीच नाही' असाच आहे !"
"अरे पण कुठे? कधी?? कसे ???"
"म्हणजे काय ? हे आज , आत्ता , इथे ह्या क्षणी ! "
"आर यु मॅड? आपण , असे इथे मोकळ्या आभाळाखाली, कोणी कुठुन पाहिलं तर काय ? कोणी अचानक टेरेसवर आलं तर काय ? तुझ्या घरचे गावाला गेलेत माझ्या घरी आई आहे. ती आली तर तिला एक्स्प्लेन करणार का तू हे? " ती हसत हसत म्हणाली.
"हे बघ, आपण जवळपास एक दीड तास गप्पा मारतोय. कोणीतरी आलं का एवढ्या वेळात ? आईने हाक तरी मारली का तुला की फोन केला ? आणि कोण पाहणार आहे आपल्याला इथे? अख्खं बंगळुर लॉकडाउनमध्ये आपापल्या गावी निघुन गेलंय किंवा घरात बसुन राहिलं आहे."
"नो नो. यू आर टोटली मॅड. मॅड अ‍ॅन्ड क्रेझी. हे खुपच जास्त रिस्की आहे . नंतर कधी तरी. आता मी जाते घरी." तिने पटकन तिच्या कॉफीचा मग आणि पुस्तक उचललं चपळाईने जिन्याकडे पळत पळत गेली.

आता मात्र माझी बेकार फाटली. 'हिने हे घरी जाऊन सांगितलं तर? किंवा त्याहुन वाईट म्हणजे खुद्द आईलाच घेऊन सरळ टेरेसवर आली तर ? ' आज मार खायचा योग दिसतोय तुमचा गिरिजापंत. नशीब अजुन जास्त काही बोललो नाही नाहीतर इन्डिसेंट प्रपोजलच्या नावाखाली काही खैर नाही आपली' . असे नाही नाही ते विचार मनात यायला लागले.
असो. आता जे होईल ते होईल. यु टूक द चान्स, नाऊ फेस द कन्सिक्वेन्सेस. अशी माझ्याच मनाला समजुत घालत मी टेरेसवरील कोपर्‍यात जाऊन बसलो. भिंतीला पाठ टेकवली, दोन्ही हात गुडघ्यावर ठेउन शांतपणे सुर्यास्त पाहु लागलो ...पण काहीही केलं तरी मनातील निगेटिव्ह विचारांची ट्रेन थांबायला तयारच नव्हती . कितीही ऑल इज वेल ऑल इज वेल म्हणलं तरी मन काही शांत व्हायचं नाव घेत नव्हतं !

सुर्य आता जवळपास अर्धा क्षितिजाच्या खाली गेलेला होता, पश्चिमेच्या क्षितिजावर गुलाबी लालसर रंगाची उधळण झाली होती. पक्षांचे थवे आपापल्या घरी परतत होते , अन हे सारं पहात मी माझ्या मनाची समजुत घालत बसलेलो.

तितक्यात परत पावलांचा आवाज आला, टेरेसवर कोणीतरी परतलं होतं . माझ्या काळजाचे ठोके सोडुन मला आता काहीच ऐकु येत नव्हतं ! अर्थात मी ज्या कोपर्‍यात बसलेलो होतो तिथे सहजासहजी कोणाला दिसलो नसतोच . पण त्या पावलांच्या नाजुक आवाज जवळ येत येत स्पष्ट होत गेला... मी नजर वळवुन पाहिलं तर फक्त ती होती , तिच्या सोबत कोणी नव्हतें. हुश्श , माझा जीव भांड्यात पडला.
"तू काय लपायचा वगैरे प्रयत्न करत होतास काय ?" ती हसत हसत बोलायला लागली. आता मी काय बोलु ह्यावर ? माझ्या काळजाचं काय पाणी पाणी झालं होतं माझं मला ठाऊक आहे. काहीच बोललो नाही , नुसतं हसलो.
ती म्हणाली "सो लेटर मीन्स नेव्हर फॉर यु ? 'नंतर' म्हणजे 'कधीच नाही' ? हं ? "
मी हसत म्हणालो - "येस. आय लिव्ह इन द स्पर ऑफ द मोमेंट . लेटर मीन्स नेव्हर . आय लिव्ह इन हीयर अ‍ॅन्ड नाऊ. मी आहे हा असा आहे , आत्ता , ह्या इथे ह्या क्षणात. तुझ्यासोबत. आणि हा क्षण, हा सुर्यास्त, ही सम्ध्याकाळ. आहे हा प्रत्येक क्षण परफेक्ट आहे माझ्यासाठी!"
ती काहीच बोलली नाही, बस माझ्या उजव्या बाजुला येऊन बसली - तिने नीट आजु बाजुला वळुन पाहिलं, आपल्याला फक्त सुर्यास्त दिसतोय आणि आपण कोणालाच दिसत नाही हे तिच्याही लक्षात आलं ! मी मात्र एकटक तिच्या डोळ्यांकडे पहात होतो .

तिनेही माझ्या नजरेला नजर भीडवली आणि म्हणाली - "सो हियर अ‍ॅन्ड नाऊ हं ? "

मी म्हणालो - "येस्स , हियर अँड नाऊ ! "

ती काही बोलली नाही बस हळुच मान तिने माझ्याकडे वळवली अन ओठांवर ओठ ठेवले अन डोळे मिटुन घेतले . तिनेही अन मीही !
-----------------------

काही सेकंदानंतर ती बाजुला झाली. आता मात्र ती लाजुन चूर झालेली होती, माझ्याकडे अजिबात बघत नव्हती. पण तिच्या गालांवर पसरलेली लालीच सारे काही सांगत होती . अक्षरशः थरथरत होती ती आणि अर्थातच मीही. तिच्या केसांच्या एक दोन बटा विलग होऊन तिच्या कानामागुन पुढे आलेल्या. मी अलगद हाताने त्या मागे केल्या. तिने क्षणभरच माझ्याकडे परत पाहिलं अन लाजुन परत नजर चोरुन घेतली.
मी हसत हसत म्हणालो - "हे काय होतं?"
तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं अन म्हणाली "म्हणजे ?"
मी परत हसत हसतच म्हणालो - "हे नक्की काय होतं? मी काय २-३ वर्षांचं लहान बाळ आहे का? हे असं मुंहुं करुन पप्पी घ्यायला? यु कॉल धिस अ किस ?"
ती आश्चर्याने डोळे मोठ्ठे करुन माझ्याकडे पहातच राहिली !
"किस म्हणजे कसं की एकामेकांच्या घट्ट मिठीत, घट्ट म्हणजे किती घट्ट की दोघांच्यातुन जायला हवेलाही जागा नाही इतक्या घट्ट मिठीत, ओठांचीही तितकीच घट्ट मिठी. जणु काही आपला श्वास गुदमरत आहे अन तुझे ओठ हाच माझा प्राणवायु आहेत इतक्या प्रचंड ओढीने एकामेकांना बिलगलेले. ओठांची इतकी सरमिसळ की नक्की कोणते ओठ कोणाचे ह्याचेही विस्मरण होऊन जायला हवे. दोघांचे फुललेले श्वास एकामेकांच्यात इतके बेमालुम पणे मिसळुन जायला हवेत की कोणते श्वास कोणाचे कळायलाच नको. तू तू आहेस अन मी मी आहे ह्या द्वैताचे संपुर्ण विसर्जन. बस एक. बस एकच कॉन्शसनेस आहे जी आपला आपण उपभोग घेत आहे . जस्ट वन कॉन्शसनेस! "
"ओह स्टॉप. यु आर गिव्हिंग मी बटर्फ्लाईज इन द स्टमक." ती एकदम लाजुन म्हणाली.
"ओके , थांबतो मी. " तिने दचकुन माझ्याकडे पाहिले.
"शब्दबंबाळापेक्षा प्रत्यक्ष प्रमाण कधीही उत्तम." ती बावचळलेल्या अवस्थेत माझ्याकडे पहात असतानाच मी तिच्या कमरेभोवती हात घालुन तिला अलगदपणे उचलुन माझ्या मिठीमध्ये घेतले. आता ती पुर्णपणे माझ्या वामांकी होती , माझ्या डाव्या मांडीवर बसलेली होती. माझा डावा हात तिच्या नाजुक कमरे भोवती घट्ट लपेटलेला होता. उजव्या हाताने मी तिच्या केसातील पिन काढली अन तिचे काळेभोर केस अलगदपणे माझ्या पायांवर पसरले. तिच्या तो घनदाट केशसांभार माझ्या उजव्या हातांच्या बोटांच्या मध्ये पकडुन मी तिला जवळ खेचले. अन नक्की काय चाललंय हे कळायच्या आतच तिच्या ओठांना माझ्या ओठांच्या बंधनात गुंतवुन टाकले.
तिच्या श्वासांची वाढलेली गती , तिच्या हृदयाची धडधडही मला जाणवत होती, तिचे थरथरणारे हात आता माझ्या पाठीमागे घट्ट लपेटले गेले होते.
तिचे नाजुक ओठ आता माझ्या ओठात मिसळुन गेलेले होते. माझ्याकडुन नकळत तिच्या ओठांना हलकेच चावले गेले, अन निमिषार्धात तिच्याकडुनही तसाच प्रतिसाद आला. मला राहुन राहुन कामसुत्रातील सुत्रे आठवत होती ...
पूर्वं अधरसंपादनेन जितं इदं स्यात्. ॥ जो पहिल्यांदा खालचा ओठ पकडेल तो जिंकला ! किंवा
तस्मिन्नितरोऽपि जिह्वयास्या दशनान्घट्टयेत्तालु जिह्वां चेति जिह्वायुद्धम्. ॥
किंवा दात आणि तालु ह्यांच्यामध्ये जिव्हा पकडुन धरण्याचे असे हे जिव्हायुध्दं .... वगैरे वगैरे... तिने खचितच कामसुत्र वाचलेले नसावे पण
त्या क्षणात आम्ही एकमेकात संपुर्ण विरघळुन गेलो होतो. त्याक्षणी "शब्देविण संवादु | दुजे विण अनुवादु||" अशी काहीशी अवस्था होती ! काहीही न बोलता तिला हे सारं कळतं, आणि वळतंयही ह्याची अपरोक्ष अनुभूती मला येत होती !

आता ती नव्हती अन मीही नव्हतो . आता आम्ही बस एक होतो. जस्ट वन.

कितीतरी वेळ ती अद्वैताची अवस्था स्वतःच स्वतःला उपभोगत राहिली.

माझा हात तिच्या केसातुन बाजुला करुन मी तिच्या कमनीय कटीवरुन बस एक बोट फिरवत होतो. तिला गुदगुल्या होऊन ती अलगद कंबर हलवुन त्या गुदगुल्या टाळायचा प्रयत्न करत होती. पाण्याच्या लाटेवर अलगद तरंगत जावे तसा माझा हात तिच्या कटीवरुन तरंगत तिच्या नितंबांकडे सरकत होता तिच्या वाढलेल्या श्वासांची गतीच साक्ष देत होती तिच्या परमोच्च सुखाची. तिच्या मांडीवरुन अलगद नक्षी काढत माझी बोटे परत तिच्या कटी भोवती रेंगाळली. तिने ओठ विलग केले अन एकदम कुजबुजत्या स्वरात म्हणाली - "नको ना गुदगुल्या होतात मला."
मीही तितक्याच कुजबुजत्या स्वरात म्हणालो - "मगाशी म्हणालेलीस ना की मी तुला बटरफ्लाईज इन द स्टमक देतोय, मल बस माझी बटरफ्लाईज हवेत!"
मी झटकन तिचा तो स्वेटशर्ट वर सरकवला माझी माझी बोटे तिच्या नाभी भोवती खेळायला लागली. तिच्या तोंडातुन "स्स्स्स्स्स , आह " असा बस सुक्ष्म सीत्कार निघाला अन परत एकदा तिने माझ्या ओठांना घट्ट तिच्या ओठांच्या पाशात गुंतवले. माझे बोटे आता अनिर्बंधपणे तिच्या कटीवरुन घसरत नाभीकडे, नाभीकडुन परत वर, परत खाली अशी स्वछंदपणे फिरत होती. अन माझ्या ओठांवर चावणारे तिचे दात मला तिच्या अवस्थेची साक्ष देत होते.

"समथिंग इज राँग. काहीतरी चुकतंय." मी माझे ओठ विलग करत म्हणालो.
"काय ? काय चुकतंय ?" ती चकित होऊन म्हणाली.
मी तिच्या नजरेत नजर मिसळुन म्हणालो - "अ किस इज नॉट अ पर्फेक्ट किस विदाऊट अ ....विदाऊट अ .....
ती हसत आणि लाजत म्हणाली - "बोल ना विदाऊट अ .. काय ?"
मी संपुर्ण धैर्य जोडुन म्हणालो - "अ किस इज नॉट अ पर्फेक्ट किस विदाऊट अ लिटल स्क्वीझ !"
तिने लाजुन डोळे मिटुन घेतले अन एकदम माझ्या कानांच्या जवळ येऊन कुजबुजत्या स्वरात म्हणाली -
"मग ? तुला कोणी अडवलं आहे का परफेक्ट किस करण्यापासुन ? " अन तिने परत एकदा ओठांना मिठीत घेतले.
मी आश्चर्याच्या धक्क्यात होतो पण माझी बोटे मात्र पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिच्या नाजुक कटीवरुन वर सरकु लागली. जसे जसे मी वर सरकत होतो तसे तसे माझ्या ओठांवर मला त्याच्या प्रतिसाद मिळत होता.
वर सरकत सरकत माझी बोटे तिच्या घट्ट ब्रा स्ट्रॅप पाशी येऊन धडकली. अडखळली... जणु काही त्यांचा रस्ता अडवला गेला होता .
तिच्या चुंबनात मला हसण्याचा भाव जाणवला , त्याने मी अजुनच एक्साईट होऊन ह्या अडथळ्याला बाजुला करायचा मार्ग शोधु लागलो, माझी बोटे आता त्याच कोजागिरीच्या चंद्रावर शोधाशोध करत होती , पुढे जाण्याचा मार्ग शोधत होती !

तेवढ्यात अचानक तिचा फोन वाजला -

ती क्षणार्धात झटकन माझ्या मांडीवरुन उठली, बाजुला झाली, पटकन तिने तिचा स्वेटशर्ट निट केला अन केस सावरत बोलु लागली -
पलिकडुन आवाज स्पष्ट ऐकु येत होता
"हेमा , हेमा अगं कुठे आहेस तु ? संध्याकाळ झाली. मगाशी येऊन परत कुठे गेलीस ? धांधरटासारखी दाराला बाहेरुन कडी लाऊन गेली आहेस घराला. "
"हां आले आले. इथेच आहे. पुस्तक टेरेसवर विसरलेलें , ते घ्यायला आलेय" असे ती घाईने गडबडीत केस सावरत म्हणाली. फोन कट करत भरकन जिन्याकडे निघाली. मी मात्र बस बघतच राहिलो तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे . ती लागलीच जिन्यावरुन निघुन गेली - पण जाता जाता जराशी क्षणभर अडखळली, मागे वळुन, हसत बस इतकेच म्हणाली -

"नंतर"

ह्यावेळी मात्र माझ्या मनाने 'नंतर' ह्या शब्दाचा अर्थ 'कधीच नाही' असा न लावता 'नक्कीच ', 'लवकरच' , 'ओफ कोर्स' असा काहीसा लावला होता!

मी परत भिंतीला टेकुन आकाशाच्या गडद निळसर जांभळ्या छटांकडे पहात राहिलो ... एक गुलाबी संध्याकाळ कायमची माझ्या मनावर कोरली गेली होती !
____________

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Nov 2024 - 6:25 am | प्रचेतस

अभिनंदन एक उत्तम १८+ कथा लिहिल्याबद्दल.
कथेचा पुढचाही भाग येऊ द्यात ;)

प्रसाद गोडबोले's picture

3 Nov 2024 - 2:06 pm | प्रसाद गोडबोले

कथेचा पुढचाही भाग येऊ द्यात ;)

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद वल्ली सर.
काही सूचना असल्यास जरूर कळवा. ;)
आणि हो, पुढील भाग "तयार" आहेच, जरा वेळ मिळाला की लिहून काढतो.
#स्वांत:सुखाय ;)

मस्त खुलवली आहे कथा... आवडली