शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १
नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर आधारित सादर केलेले लेखन मिपावरील वाचकांनी वाचले आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शनातून नंतरच्या काळात ईपुस्तके बनवायला प्रेरणा मिळाली.
भारतीय नौसेनेचे स्वप्न दृष्टा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होतो. आपण अनुभवातून अनेक गोष्टी शिकतो. शिवाजी महाराजांना आपले नाविकदल कसे असावे जल दुर्गांचे महत्व काय किनाऱ्यावर राहून, म्हावरे पकडून उपजीविका करणाऱ्या सामान्य जनतेचे खडतर जीवन कसे असते अशा लोकांना मासेमारी करताना, मिठागरातील लवण उद्योग निर्धोकपणे करता यावा. भात शेती, अंबा, रातांबा, फणस, पोफळी, नारळ, ताड, वनौषधी, देशावर पाठवून कोकणात शांततामय जीवन जगता यावे. कोकणी माणसांच्या भाव विश्वात सागराला देवता मानायची संकल्पना असते. त्यांच्या वार्षिक सणाला, देवी यात्रांना जायला यायला सोई करणे वगैरे ही राज्यकर्ता म्हणून जबाबदारीची जाणीव बिंबली. विदेशी दर्यावर्दी लांबून येऊन अरबी सागरावर आपला हक्क सांगतात. मोठ्या जमिनी बळकावतात. आपला धर्म प्रचार करायला चर्च, मशीद बांधतात. गरिबीने पोळलेले सिद्दी व अन्य देशीय गुलाम म्हणून विकले जातात. चाचेगिरी करून बोटी लुटायचे साहस करतात. या वर उपाय योजना करायला हवी. बोटी बांधायला गोद्या, माल धक्के, माल वाहायला शिकवून तयार केलेली जनावरे पैदास केंद्रे, यासाठी अरबी लोकांकडून शिकायची सोय करायला हवी याचे भान त्यांना आले. यासर्वाचा आढावा त्यांना बसरूरच्या नौकानयनातील अनुभवातून आला असावा अशी संकल्पना घेऊन मांडणी केली आहे.
पुढील भागात
भीमगडावरील वास्तव्यातील विचारनधन
मुगल व मराठा सैन्याची तैनाती
वेंगुर्ला, कुडाळची लढाई, खवासखानाची पळापळ, मुधोळकर बाजी घोरपड्यांचा बंदोबस्त
प्रतिक्रिया
27 Oct 2024 - 8:29 pm | कंजूस
सुंदर.
आकर्षक मांडणी आणि सादरीकरण आवडले.
27 Oct 2024 - 8:35 pm | नठ्यारा
ओकसाहेब,
लेख वाचतांना तुमचे परिश्रम व व्यासंग ठायीठायी जाणवतो. दंडवत घ्यावा!
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
27 Oct 2024 - 9:06 pm | कर्नलतपस्वी
लेख आवडला.
लेख माले साठी शुभेच्छा.
पु.ले.शु.
28 Oct 2024 - 7:44 am | शशिकांत ओक
धन्यवाद सर तपस्वी सर. पुढील लेखन लवकरच सादर करेन.
काही स्लाईड्स मधील मजकुरावर आपले भाष्य अपेक्षित आहे.
28 Oct 2024 - 10:17 am | अनिरुद्ध प
खूप छान आवडले,
पू भा प्र,
अनिरुद्ध
29 Oct 2024 - 11:53 am | शशिकांत ओक
वरील विचारांवर वाचकांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे...
29 Oct 2024 - 7:18 pm | धर्मराजमुटके
"बोटिवर शिजवलेले भात आणी सागूची नवी चव"
यातला "सागू" म्हणजे नक्की काय ?
29 Oct 2024 - 10:23 pm | शशिकांत ओक
फणसाच्या अठळ्यांची भाजी
1 Nov 2024 - 10:08 am | शाम भागवत
मस्तच.
व्यासंग व मांडणी यांसाठी
🙏
2 Nov 2024 - 12:19 am | दुर्गविहारी
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हि एकमेव सागरी मोहीम, कदाचित या मोहीमेत त्रास झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यानंनतर सागरी मोहीम केल्याचे आढळत नाही. या मोहीमेची योजना अतिशय बारकाईने केली असणार. एकतर महाराष्ट्र , कर्नाटकाच्या सागर किनारपट्टोवर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच ( मालवण येथे फ्रेंच वखार होती ) आणि वेंगुर्ल्याचे डच अशा चारही सागरी सत्ता आणि पर्यायने शत्रु होते, समुद्रावरुन प्रवास करताना त्यांना कार्ताझ द्यावा लागे. इथे त्यांनी शिवाजी महाराजांकडून कोणताही कार्ताज घेतलेला दिसत नाही. इथे शिवाजी महाराजांची या युरोपियान सत्तांनी घेतलेली दहशत लक्षात येते.
मात्र या मोहीमेसाठी आवश्यक नियोजन खुप बारकाईने केलेले असणार. एकतर जेव्हा गुराबे रात्री किनार्यावर मुक्काम करतील तेव्हा कोठे मुक्काम करायचा तिथली सुरक्षा नेमकी कशी आखली असणार हे महत्वाचे आहे. तसेच जरी महाराजांचे सागरी दल समुद्रातून प्रवास करत असले तरी पायदळ आणि घोडदळ भुमार्गे महाराजांच्या नौदलाला समांतर जमीनमार्गे प्रवास करत असणार. त्यांचे एकमेकांशी सहसंपर्क कसा साधला असणार हे कुतुहल वाढवणारे आहे. कारण दोन्ही मार्गे प्रवास करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार. तरीही दोन्ही दले एकाच वेळी मुक्कामाला पोहचणे गरजेचे आहे. यावर अधीक चर्चा झाली किंवा काही माहीती पुढे आली तर या मोहीमेवर अधीक प्रकाश पडेल.
2 Nov 2024 - 5:53 am | प्रचेतस
हा इतिहास फारसा माहीत नाहीये, आपण जे लिहिताय ते स्तुत्य आहे.
10 Nov 2024 - 7:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
लेख आवडला, नेहमीप्रमाणे केलेले अभ्यासपपूर्ण लेखन
पैजारबुवा,
24 Nov 2024 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll
उत्तम मांडणी जमलेली आहे.