मंडळी,
मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत.
१. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको.
२. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा...
कृपया नियम मोडू नका. रेशमी वीणीसाठी चारोळ्यांची मदत कराल ही अपेक्षा आहे.
उदा.
विजेला घाबरून
ढग ढसाढसा रडत होता
लोक म्हणत होते
किती पाऊस पडत होता..
दुसरी चारोळी...
ढगात बसून कोंडलेली
ती ताडकन् निघाली
क्षणभरंच तळपून
अंधारात लुप्त झाली...
आता या दुस-या चारोळीपासून विणीला सुरूवात करूया...
ऋषिकेश, सहज, सर्किटराव, स्वाती, मुक्त सुनित, देवदत्त. विनायक राव.. छोटा- मोठा.. खरा-खोटा डॉन.. तमाम मि.पा. वासियांना ही विनंती.....
- प्राजु.
प्रतिक्रिया
5 Jan 2008 - 11:18 pm | ऋषिकेश
कोंडलेल्या आवेगाला
बंधनं नको आता कसलीच
बनसोक्त बरस तू
चिंबं होऊन जाती मने आपलीच
5 Jan 2008 - 11:32 pm | देवदत्त
व्याकरणाची बंधने झुगारून
लिहिली चारोळी
माझेच मन म्हणाले मला
तुला कसे सुचले ह्यावेळी
6 Jan 2008 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्याकरण म्हणजे असते ग्रेसची कविता,चर्चा करायची असते काहीही न समजता.
5 Jan 2008 - 11:36 pm | ब्रिटिश टिंग्या
बरसलेल्या मेघाला पाहून
धरणी उद्गारली
त्याने स्वत: रिक्त होउन
झोळी माझी भरली.
5 Jan 2008 - 11:51 pm | प्राजु
धरणीची काया
अशी काही शहारली
की रोमांच उभे राहून
हिरवी बिजे अंकुरली...
- प्राजु.
6 Jan 2008 - 1:18 am | ब्रिटिश टिंग्या
बीज अंकुरे अंकुरे
काळ्या मातीच्या कुशीत
जसे रूजावे बियाणे
तसे फुलेल शेत.
(टीप : ही चारोळी कोठेतरी ऐकली आहे.)
आपला,
('टीप'लेला) छोटी टिंगी
6 Jan 2008 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंकुर जळण्याच्या भीतीने
मी रुजणं थांबवलं नाही
कोमजण्याच्या भीतीने
मी फुलणं थांबवलं नाही.
6 Jan 2008 - 1:09 am | इनोबा म्हणे
तुझ्या भेटीसाठी मी
वाट तुडवू लागलो,
वाटच चालायला लागली
अन मी पहातच राहीलो.
हा आपला एक छोटासा प्रयत्न,बाकी आम्हाला कवितेच्या प्रांताची विशेष माहिती नाही...
(नवकवी) -इनोबा
6 Jan 2008 - 1:21 am | ऋषिकेश
पाऊस होऊन बरसावं म्हंटल
तर तु लाजुन उघडतेस छत्री
म्हणून म्हंटल ढगांना दूर व्हा....
बरसायचं आहे आज चांदणं होऊन रात्री
6 Jan 2008 - 1:39 am | इनोबा म्हणे
पावसाळा आला की मला
फक्त तू आठवतेस,
कारण ढग बनून डोळ्यामध्ये
तूच पाणी साठवतेस.
-इनोबा
6 Jan 2008 - 1:55 am | स्वाती राजेश
धरती आणि पाऊस
यांचे निस्वार्थी प्रेम....
ती झेलते पाऊसाचा
प्रत्येक थेंब...
6 Jan 2008 - 2:04 am | इनोबा म्हणे
पाऊस पाहताना मला वाटलं
ढग ही रडत असेल,
स्वार्थी जगाला मात्र
त्याचे दुखः दिसत नसेल.
6 Jan 2008 - 6:13 am | प्राजु
छोटी टींगी, विनायक राव आपण तर एकदम बादशहाच आहात चारोळी मधले... सलाम! छान विणता आहात... आवडले.
पाऊस पडाताना ती
अचानक बावरली...
विज कडाडल्यावर
मला एकदम बिलगली...
- प्राजु
6 Jan 2008 - 6:54 am | नंदन
(ग्रेसची क्षमा मागून)
सुख मनास बिलगत नाही
अदमास कशाचा घ्यावा
पथ सर्व अन्य विसरुनिया
शोधतो दु:खांच्या गावा
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
6 Jan 2008 - 7:46 am | सहज
पडतो आहे तोच एक पाऊस
एक म्हणतो शोधतो दु:खांच्या गावा
दुसरा म्हणतो जिवलग बिलगावा
भारत म्हणतो शेत आणि शेतकरी जगावा
6 Jan 2008 - 8:06 am | ऋषिकेश
तुझ मला बिलगणं
मन उंच आभाळी उडणं
आता हे रोजचंच झालाय
अशी वेडी स्वप्न पडणं
6 Jan 2008 - 8:18 am | सहज
स्वप्न आणी वास्तव
आहेत जसे दिवस-रात्र
गुंतवून तुम्हा-आम्हा
चालू ठेवतात जीवनचक्र
6 Jan 2008 - 9:12 am | नंदन
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसेना का कुठे
रुपे जरी अनंत
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
8 Jan 2008 - 12:01 am | सर्किट (not verified)
वा नंदन ! सर्वोत्कृष्ट चारोळी !
- सर्किट
6 Jan 2008 - 9:09 am | ऋषिकेश
जीवन हेच स्वप्न
की जीवन हे वास्तव?
मिठीतील जीवन स्वप्न
अन मुठीतील वास्तव?!
7 Jan 2008 - 8:17 am | झंप्या
ऋष्या, अजुनही वास्तव मुठीतच आहे म्हणजे आमच्या सारखाच बॅचलर दिसतोस.. बरोबर ओळखलं का नाही? :)
6 Jan 2008 - 9:27 am | नंदन
वास्तवाची वीण उसवते
स्वप्नांचा अन दिसे किनारा
सुषुप्सेतली गोडस धुंदी
क्लांत जिवा देतसे निवारा
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
6 Jan 2008 - 11:09 am | इनोबा म्हणे
स्वप्नांपेक्षा निराळे
वास्तवातले जग,
स्वप्नात सुखाचा ओलावा
वास्तवात असे धग.
6 Jan 2008 - 11:30 am | इनोबा म्हणे
स्वप्नास म्हटले मी एकदा
येशील का वास्तवात...
स्वप्न म्हणाले मी इथेच बरा
तू जळत रहा त्या विस्तवात.
6 Jan 2008 - 11:32 am | विसोबा खेचर
मंडळी!
चालू द्या! जळ्ळं आम्हाला काव्यात्मक दोन ओळी लिहिता येत असतील तर शपथ! :)
तात्या.
6 Jan 2008 - 11:37 am | इनोबा म्हणे
आम्हाला तरी कुठं येतंय काव्यात्मक वगैरे...आपलं सहज काहितरी लिहायचं...या मंडळींना ते चांगलं वाटलं की बास!
चला आता तुमच्या साधना कोळीण,रौशनी वगैरे महिला मंडळाला आणा रिंगणात...
6 Jan 2008 - 11:39 am | सहज
गद्यातले बादशाह आम्ही
जाणून आहे मधली आळी
पण जळ्ळं लिहता येत नाही
काव्यात्मक दोन ओळी
असे तरी लिव्हायचे कि वो! ;-) ह. घ्या.
6 Jan 2008 - 12:03 pm | इनोबा म्हणे
काव्याच्या रम्य वसंतात
काव्य खुलू लागले
लेखणी झाली मुक्त
अन काव्य बोलू लागले
च्यामारी!चांगली कविता करतोय तर करू द्या की...राव,शेठ साहेब असली विशेषणं लावून डोकं पिकवू नका.
(कवितेचा बॉयफ्रेंड) -इनोबा
6 Jan 2008 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चारोळ्यांना अलिकडेबरंच काही कळू लागलं, मनोगताच्या कुंडीकडून काव्य इथे फूलू लागलं
6 Jan 2008 - 7:42 pm | ब्रिटिश टिंग्या
कळत नकळत
फुलू लागले काव्य
जणू निरागस चेहेर्यावर
उमलले हास्य
6 Jan 2008 - 7:16 pm | विकि
चारोळी फुल्टू आवडली.
आपला
कॉ.विकि
6 Jan 2008 - 9:50 pm | प्राजु
नंदन, सहजराव, ऋषिकेश, स्वाती, विनायक, दिलीपजी, देवदत्त, छोटी टिंगी...
आपण तर वीण एकदम घट्ट विणता आहात. खूप बरं वाटतंय.
असेच चालू राहूदे.
फुलता फुलता फुलाने
काट्याला झिडकारले..
किड्यांनी ताबडतोब
झाडंच पोखरले....
- प्राजु.
16 Oct 2016 - 6:25 pm | एस
पोखरलेल्या वाशांचं
एक घर अजूनि तगून आहे
वठलेल्या झाडाचं
एक बीज अजूनि रुजून पाहे
6 Jan 2008 - 10:03 pm | सागर सुभाष राणे
काही चारोल्या प्रेमवर पण लिहा.
आम्हाला वाचायला आवाडतिल
सागर राणे
6 Jan 2008 - 10:24 pm | प्राजु
सागर,
आपणच लिहा ना.... एक शब्द घेऊन सुरू करा पुढे लिहितिल सगळी..
- प्राजु.
6 Jan 2008 - 10:29 pm | ब्रिटिश टिंग्या
राणे साहेब तुम्ही सुरूवात करा....आम्ही मंडळी पडीकच आहोत इथे पुढचं विणायला ;)
आपला,
(पडीक) छोटी टिंगी
6 Jan 2008 - 10:30 pm | सागर सुभाष राणे
खरच आम्हाला लिहिता आले असते तर कवितेचा महापुर आनला असता आज.
सागर राणे
7 Jan 2008 - 1:34 pm | नंदन
फूल, काटे, किडे, झाड
प्रेम, चारोळ्या -- फुल्टूच यार
पडीक विणती शब्द येथे
महापुरी ओळी चार
[वरच्या पाच-सहा प्रतिसादांतले शब्द निवडून रचलेली ही असंबद्ध चारोळी :). कृपया हलकेच घ्यावी.]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
7 Jan 2008 - 2:04 pm | इनोबा म्हणे
आणा भाका विसरुन
ती गेली खूप दूर...
हृदयात ठेवून आठवणी
अन नयनी महापूर...
नंद्या भन्नाट चारोळी रचलीस रे...
हि आपली अशीच...
प्राजूच्या नादाने 'इनोबा'
आता चारोळी रचू लागला...
अन हास्यात रंगलेला 'तो'
आता दूखः वेचु लागला...
-इनोबा
7 Jan 2008 - 3:50 pm | तात्या विंचू
सुख वेचता वेचता
थोडे दु:खही वेचायचे असते...
अरे बाबा,
जीवन हे असेच जगायचे असते....
7 Jan 2008 - 7:11 pm | इनोबा म्हणे
सुख क्षणभंगूर
दुखः असे निरंतर
सुख 'सुखाचा सोबती'
दुखः खरा मैतर
7 Jan 2008 - 4:12 pm | प्रकाश घाटपांडे
येथील कवींना आवाहन
चारोळी सारखा पाचोळी प्रकार यखांदा करुन पघा. अदुगर बी यकदा आम्ही ही संकल्पना मांडली होती. पन कोनी काय उचलून धरली नाही ब्वॉ.
संकल्पना- पहिल्या चारा ओळी लिहुन यकदम हवेत न्यायच, आन पाचवी ओळ लिहून दानकन जमिनीवर आदळायच. त्यो अर्जुनाचा दशांगुळे चालणारा रथ कंच्या तरी कारनान यकदम जमिनिवर आला अगदी तस्सा.
आपला
(प्रायोगिक)
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
7 Jan 2008 - 6:20 pm | इनोबा म्हणे
डॉक्टरसाहेब,तुमची कल्पना आवडली.पांडवांच्या पांचाली प्रमाणे कवितेतली पाचोळीची(की पांचोळीची?) कल्पना छान आहे.
खुलासा: अर्जुनाचा रथ कोसळला यांस त्याच्या रथाच्या चाकाला बसवलेले 'डिस्कब्रेक' कारणीभूत होते,असा आमचा निष्कर्ष आहे (या विषयावर आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहोत) त्यामुळे हे 'डिस्कब्रेक' बनवणार्या संस्थेवर दावा ठोकण्याच्या विचारात आहोत.
(अर्जुनाचा वकील) -इनोबा
7 Jan 2008 - 6:37 pm | अवलिया
रथ नक्की कुणाचा कोसळला?
आमच्या अल्प ज्ञानानुसार धर्मराजाचा रथ जमीनीला टेकला होता...
चुक भुल देणे घेणे...
(महाभारत तज्ञ) नाना
7 Jan 2008 - 7:19 pm | इनोबा म्हणे
नाना धरमपाजीचा रथ केवळ जमिनीला टेकला होता,ज्या वेळी त्याने अश्वथामा मेला अशी बोंबाबोंब केली होती ना तेव्हा...(नरो वा कुंजरो वा) मात्र अर्जुनाचा रथ खराब 'डिस्कब्रेक' मुळे आपटला होता.
(-इति'हास्य' तज्ञ) -इनोबा
7 Jan 2008 - 8:57 pm | देवदत्त
मी तर कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले होते असे वाचले होते. (कुठे ते आठवत नाही. त्याचा संदर्भ कळला नव्हता. पण आता बहुधा ते अर्जुनाच्या रथाचे असावयास पाहिजे होते असे वाटते.)
7 Jan 2008 - 9:08 pm | इनोबा म्हणे
देवा! अरे कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकले ते 'ट्यूब' फाटल्यामूळे,आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे!!!त्या ट्यूब बनवणार्या संस्थेवर आणि राज्य रस्ते प्राधिकरणावर हस्तिनापुरच्या न्यायालयात आधिच खटला चालू आहे,पण अर्जुनाचा रथ कोसळला तो खराब 'डिस्कब्रेक'मुळे.
(इति'हास्याचा' गाढा अभ्यासक) -इनोबा
7 Jan 2008 - 9:15 pm | सुनील
पंचोळीचे एखादे उदाहरण तरी द्या!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Jan 2008 - 3:51 am | चतुरंग
चारोळी वाचून हसलो
लेखणी घेऊन बसलो
चार ओळी सुचेनात
चारोळीवाचून बसलो!
चतुरंग
8 Jan 2008 - 3:58 am | इनोबा म्हणे
नको गप राहू सख्या
उठ लाग तू कामाला
सूप्त भावना रे तूझ्या
कळू दे सार्या जगाला...
(समद्यांचा जोडीदार) -इनोबा